साईमत, नांदगाव : प्रतिनिधी
पावसाची ओढ, पिकांवर पडलेली कीड आणि होणारा खर्च पाहून पानेवाडी (ता. नांदगाव) येथील निराश झालेल्या शेतकऱ्याने सोयाबीनच्या उभ्या पिकात रोटाव्ोटर फिरवला.
पेरलेल्या पिकामुळे कर्जबाजारी होण्याची व्ोळ आली असल्याचे सांगत शेतकऱ्याने हे पाऊल उचलले. पानेवाडी( ता. नांदगाव) येथील शेतकरी दगू कातकडे यांनी आपल्या दोन एकर शेतात सोयाबीनची पेरणी केली होती. पिकाची योग्य ती काळजी घेतली होती. पीक जोमात होते. परंतु पिकावर रोग पडल्याने फवारणी करावी लागली. पिकांवर आलेल्या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी महागडी कीडनाशक घेऊन फवारणी केली.
मात्र काही दिवसापासून पावसाने ओढ दिल्याने पीक येते की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. इतका खर्च करूनही सोयाबीन पिकाला पाहिजे त्याप्रमाणात फलधारणा न झाल्याने तसेच सोयाबीनच्या शेंगामधील दाणे परिपक्व होण्यापूर्वीच पीक पिवळे पडून लागल्याने फवारणी करून काहीच उपयोग होणार नसल्याने आणि पेरणी ते काढणी पर्यंतचा खर्च पाहता दुसरे पीक तरी हातात येईल या आशेने शेतकऱ्याने सोयाबीनच्या उभ्या पिकात रोटाव्ोटर फिरवला.