15 लाखांसाठी विवाहितेचा छळ

0
3

साईमत, नाशिक : प्रतिनिधी
सासरच्या मंडळींनी 15 लाखांची मागणी करत विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ तसेच, आयटी कंपनी असल्याचे भासवून विवाहास प्रवृत्त केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भद्रकाली पोलिस ठाण्यात पती, सासू- सासरे आणि नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
विवाहितेचा 9 मार्च 2022 ला धार्मिक पद्धतीने थाटामाटात विवाह झाला होता.मुलाची स्वतःची आयटी कंपनी असल्याचे सांगितले होते. प्रत्यक्षात कंपनी बंद असून पतीचे विवाहापूर्वी प्रेमसंबंध आणि विवाहानंतर संबंध असल्याचे उघड झाले. विवाहास 7 ते 8 दिवस उलटत नाही तोच सासू- सासरे आणि पतीने नवीन व्यवसायासाठी पंधरा लाखांची मागणी केली. विवाहात अधिक खर्च झाल्याने विवाहितेने रक्कम आणण्यास नकार दिला. त्यानंतर सासऱ्यांनी मुलीच्या वडीलास फोन करून 15 लाखांची मागणी केली. त्यासाठी वारंवार मारहाण आणि शिवीगाळ करत शारीरिक, मानसिक छळ केला. विवाहितेच्या तक्रारीवरून पती अमेय जगदीश परदेशी (33), सासरे जगदीश धोंडीलाल परदेशी (64), सासू सरला जगदीश परदेशी (60), नणंद प्रतिका प्रतीक भौमिक (35) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here