Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी चांगलं काम करत असताना स्वतःला रोज सिद्ध करावं लागत, मात्र या दबावाचा तुम्ही सकारात्मक विचार केला तर आयुष्यात नक्कीच यशस्वी व्हाल. तुम्ही तुमच्या क्षमता वाढवू शकले तर तुमचं भविष्य नक्कीच उज्वल आहे. दृढ निश्चय केला तर या जगात अशक्य अस काही नाही. दीपस्तंभ मनोबल चे कार्य व उभारणी बघून मी आश्चर्यचकित झालो आहे. दिव्यांग अनाथ विद्यार्थ्यांच्या संदर्भातलं काम कसं असावं याचा आदर्श या संस्थेने निर्माण केला आहे. महिन्यातून एकदा मनोबल प्रकल्पातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी नक्की येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी केले. दीपस्तंभ फाऊंडेशन मनोबल प्रकल्पात रक्षाबंधन कार्यक्रमाच्या निमित्ताने ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. या…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी शालेय स्पर्धेसाठी शासनाकडून मंजूर असलेल्या निधी पैकी अर्धी रक्कम आयोजक संघटनेला स्पर्धां सुरु होण्यापूर्वी देण्यात यावी अशी मागणी हॉकी व फुटबॉल संघटने चे फारुक शेख यांनी केली आहे. युवासेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या माध्यमातून आंतर शालेय क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली असून २२ ऑगस्ट २०२३ रोजी क्रीडा कार्यालय व एकविध क्रीडा संघटनाच्या सभेत जोपर्यंत क्रीडा अधिकारी हे खेळासाठी मंजूर असलेल्या रकमे पैकी ५० टक्के रक्कम अग्रीम स्वरूपात त्या खेळाच्या संघटनेला देणार नाही तोपर्यंत त्या स्पर्धा संबंधित संघटना घेणार नाही असे ठरले होते. १ ते २ सप्टेंबर रोजी हॉकी…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी अनेक दिवसा पासून जळगाव जिल्ह्यासह इतरत्र पाऊस नसल्याने संपूर्ण मानवजात हवालदिल झाली असून पाऊस पडावा म्हणून जळगाव शहरात दि 3 सप्टेंबर रविवार रोजी नमाज ए इस्तेसका चे आयोजन सकाळी ९ वाजता ईदगाह मैदान, अजिंठा चौक, जळगाव येथे मौलाना उस्मान कासमी यांच्या नेतृत्वात करण्याचे आयोजन ऊलमा काऊन्सिल ने केले आहे. तरी संपूर्ण जळगाव वासियांनी आपल्या कडे असलेली जनावरासह सकाळी ८.४५ वाजता इदगाह मैदानावर उपस्थीत रहावे असे आवाहन शहर ए काझी मुफ्ती अतीकुर रहेमान, इदगाह ट्रस्ट चे अध्यक्ष वहाब मलिक व जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी केले आहे.

Read More

साईमत, मुंबई ः प्रतिनिधी आशिया चषकाला दिमाखात सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने नेपाळचा पराभव करत विजयी सुरुवात केली. आशिया चषकात भारताचा पहिला सामना पाकिस्तानविरोधात शनिवारी होत आहे. या सामन्याकडे सर्व क्रीडा प्रेमींचे लक्ष लागले आहे. भारत आणि पाकिस्तान हे क्रिकेट जगतातील कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. दोन्ही संघाचा सामना म्हणजे संपूर्ण जगातील क्रिकेट रसिकांसाठी ब्लॉकबस्टर शो असतो. दोन्ही देशातील संबंध खास नसल्याने दोघेही एकमेकांचा दौरा करत नाहीत. अशात मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येच आमने-सामने येतात. आशिया चषकात शनिवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. आशिया चषकाच्या इतिहासात आतापर्यंत टीम इंडियाचे पारडे जड राहिले आहे. यंदा श्रीलंकेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार…

Read More

साईमत, मुंबई ः प्रतिनिधी भारतासह राज्यावर दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे. तीन महिन्यात पावसाची मोठी तूट दिसून आली आहे. महाराष्ट्र आणि केरळमध्ये पावसाने पाठ फिरवल्याचे दिसत आहे. ऑगस्ट महिन्यात भारतात शतकातील सर्वात कमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. आतापर्यंत ऑगस्ट महिन्यात फक्त १६० मिमीच्या जवळपास पाऊस झाला आहे. ऑगस्ट २०२३ हे मान्सून वर्ष १९०१ नंतरचा सर्वात कोरडा महिना म्हणून नोंदवला गेला आहे. त्यामुळे यंदा दुष्काळाची स्थिती ओढावली आहे. १ जूनपासून संपूर्ण देशात मान्सूनमध्ये पावसाची तूट वाढत गेली. ऑगस्टअखेरपर्यंत देशातील पावसाची तूट ९ टक्कयांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यातच पुन्हा एकदा मान्सून ब्रेकची स्थिती असल्याने ही तूट आणखी वाढण्याची…

Read More

साईमत, मुंबई ः प्रतिनिधी इंडिया आघाडीच्या गुरूवारी सुरू झालेल्या दोन दिवसांच्या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या एकजुटीचा निर्धार केला जाणार आहे. जागावाटप हा आघाडीतील कळीचा मुद्दा असला तरी केवळ जागावाटपाच्या सूत्रापुरतीच चर्चा मर्यादित ठेवली जाईल. मतभेद होतील अशी कोणतीही कृती सध्या तरी केली जाणार नसल्याची सुत्रांची माहिती आहे. इंडिया बैठकीसाठी नेतेमंडळी मुंबईत दाखल झाली आहेत. पाटणा आणि बंगळुरूनंतरची तिसरी बैठक यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे. विरोधकांची एकजूट अधिक भक्कम कशी होईल यावरच अधिक भर दिला जाणार आहे. गुरुवारी सायंकाळी इंडिया आघाडीच्या मानचिन्हाचे अनावरण झाले. विरोधी नेत्यांची अनौपचारिक चर्चा होईल. शुक्रवारी दिवसभर आगामी रणनीतीवर खल केला जाईल. आघाडीत मतभेद होतील अशी कोणतीही…

Read More

साईमत, प्रतिनिधी, जळगाव, शहरातील नेरी नाका परिसरातील पांझरापोळ संस्थेच्या मैदानात पवित्र श्रावण मासानिमित्त भव्य संगीतमय शिव महापुराण कथेचे गुरुवारी दुपारी 2 वाजता ‘श्री शिवाय नमोस्त्युभं’च्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. श्रीधाम वृंदावन येथून आलेले आंतरराष्ट्रीय कथाकार महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजी शास्त्री यांच्या श्रीमुखातून आज कथेदरम्यान भारतीय उच्च संस्कृतीचे, शिवमहापुराणचे महत्त्व त्यांनी संगीतमय कथेत विषद केले. युट्युब व फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कथेचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. शिवमहापुराण कथास्थळी महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजी यांच्या आगमनाप्रसंगी विशाल भोळे व जुही भोळे या दाम्पत्यांने शिवमहापुराणाची पोथी शिरावर घेत, हजारो भाविकांच्या पुष्पवृष्टीने श्रावण मासाच्या महिमेला सुरुवात झाली. तसेच कथेच्या सुरुवातीला संत श्री…

Read More

साईमत, नवापूर : प्रतिनिधी द नवापुर एज्युकेशन सोसायटीत द्वारा संचलित श्रीमती एस. एम. चोखावला लिटल एंजल्स अकॅडमी नवापूर येथे रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्र सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी यांना रक्षा कवच बांधून त्यांच्या कार्यप्रति कृतज्ञता व्यक्त केली. नवापूर पोलीस स्टेशनचे कार्यतत्पर पोलीस अधिकारी ज्ञानेश्‍वर वारे, उपनिरीक्षक मनोज पाटील, जगदीश सोनवणे, अ.स ई युवराज परदेशी तसेच अन्य पोलीस कर्मचारी आदींना शालेय विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने राखी बांधून समाजाप्रती असलेली आपली भावना तसेच आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना व्यक्त केली पोलीस कर्मचारी व अधिकारी यांनी देखील या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना संपूर्ण पोलीस प्रशासनाचे…

Read More

साईमत, धुळे : प्रतिनिधी जिल्ह्यात दोन व्ोगव्ोगळ्या घटनेत दोन जणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडली. याप्रकरणी संबंधित पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. धर्मीबाई एकनाथ पवार (वय 28, रा. मंडाणे, ता. साक्री) व विजय ओंकार जाधव (वय 35, रा. नागेश्‍वर बंगला, ता. शिरपूर) अशी आत्महत्या केलेल्यांची नाव्ो आहेत. साक्री तालुक्यातील मंडाणे येथील धर्मीबाई एकनाथ पवार हिने मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला साडीच्या साह्याने गळफास घेतला. तिला सरपंच भीमराव सुरेश पवार, सोमनाथ वसंत पवार, बुधाजी वारू गवळी, श्रीराम महारू पवार, हरिश्‍चंद्र तापाजी पवार यांनी खाली उतरवून पिंपळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मृत…

Read More

साईमत नरडाणा : प्रतिनिधी ‘एमआयडीसी’त उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केमिकल कंपनीला 115 एकर जागा दिल्याच्या निषेधार्थ नरडाणा एमआयडीसी संघर्ष समितीतर्फे बुधवारी (ता. 30) मोर्चातून उद्योगमंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत निर्णयाचा निषेध करण्यात आला.उद्योगमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. नरडाणा ‘एमआयडीसी’साठी शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या आहेत. तेथे औद्योगिक विकासासह स्थानिकांना रोजगार मिळावा, असा उद्देश आहे.परंतु, आधीच काही कंपन्यांमुळे शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी लालसर झाले. त्यामुळे शेतीचे नुकसान होत आहे. ‘एमआयडीसी’तील सांडपाणी तापी नदीत जाते. या नदीतून शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावांना पिण्याचे पाणी आणि शेती सिंचनासाठी पुरवठा केला जातो. केमिकल कंपनीमुळे तापी नदीचे पाणी दूषित होणार आहे. त्यामुळे स्थानिक…

Read More