साईमत, शिरपूर, प्रतिनिधी तालुक्यातील पश्चिम भागातील तऱ्हाडी- वरूळसह परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कृषी तसेच गावठाणचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची वारंवार मागणी करूनही विजेची समस्या सुटत नसल्यामुळे अखेर शुक्रवारी संतप्त शेतकऱ्यांनी सबस्टेशन गाठून वीज विभागाच्या उदासीन धोरणाविषयी रोष व्यक्त करीत निवेदन दिले. तसेच विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारादेखील यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला. तालुक्यातील परिसरातील जनतेची व शेतकऱ्यांची विजेची समस्या कायमस्वरूपी सुटावी, यासाठी वरुळ येथे 33 के.व्ही.क्षमतेच्या उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली. या उपकेंद्रावरून परिसरातील तऱ्हाडीसह वरुळ, भटाणे, जवखेडा, तऱ्हाड कसबे, भामपूर, टेकवाडे नवे -जुने, अंतुली…
Author: Saimat
साईमत, जळगाव : प्रतिनिधी तुमचे जीएसटी रेकॉर्ड योग्य नसल्याचे सांगत आपल्याकडे जीएसटीची धाड टाकली जाणार आहे. असा बागुलबुवा दाखवत उद्योजकांना गंडविणाऱ्या एका तोतया जीएसटी अधिकाऱ्याचा उद्योजकांच्या एकजुटीमुळे पर्दाफास झाला असून या तोतयाविरूध्द एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील एमआयडीसी परिसरातील जी सेक्टरमध्ये गेल्या दोन, तीन महिन्यापासून एक ५० वर्षीय इसम ‘महाराष्ट्र शासन ’असे लिहिलेली गाडी (एमएच १९ सीवाय ००२५) घेऊन फिरत होता. हा इसम उद्योजकांना या ना त्या कारणाने तुमच्या हिशेबात त्रुटी आहेत. त्यामुळे तुमच्यावर जीएसटीची रेड होणार आहे. असे सांगत उद्योजकांना भीती दाखवत त्यांच्याकडून मोठ्या रक्कमा उकळत असल्याचा उद्योग…
साईमत, जालना : प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये रेटारेटी झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू होते. उपोषण करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि हव्ोत गोळीबार केला. या घटनेनंतर जिल्ह्यात तणावाची स्थिती आहे. घटनास्थळी दगडांचा खचही असल्याचे दिसून आले आहे. उपोषण आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या लाठी हल्ल्याचा निषेध केला आहे. २९ ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषणकर्त्या आंदोलकांची प्रकृती खालावण्याची…
साईमत, मुंबई ः प्रतिनिधी इंडिया आघाडीतले सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणूक आणि शक्य तितक्या विधानसभा निवडणुका एकत्र लढतील. सर्व पक्षांनी तसा संकल्प केला आहे. निवडणुकांसाठी व्ोगव्ोगळ्या राज्यांमध्ये जागावाटपाची प्रक्रिया सुरू करून ती लवकरच पूर्ण केली जाईल, यासह तीन महत्त्वपुर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या बैठकीत १४ सदस्यांच्या केंद्रीय समन्वय समितीची घोषणा करण्यात आली. सर्वच प्रमुख नेत्यांचा मोदी सरकार आणि त्यांच्या कार्यपध्दतीवर टिका केली. केंद्रातल्या मोदी सरकारविरोधात एकत्र आलेल्या इंडिया आघाडीची मुंबईतली बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात मल्लिकार्जुन खरगे यांनी…
साईमत जळगाव प्रतिनिधी स्पर्धेच्या युगात प्रत्येकात विविध गुंणकौशल्य असणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक पातळी वेगवेगळी असल्याने विद्यार्थ्यांना जर शैक्षणिक प्रगती साधायची असेल तर त्यांच्या जवळ प्रखर स्मरणशक्ती व एकाग्रता मोठ्या प्रमाणात असणे गरजेचे आहे. त्या अनुसरून विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती व एकाग्रता वाढावी, त्यांचे महत्व कळावे या उद्देशाने एसडी-सीड तर्फे “स्मरणशक्ती व एकाग्रता विकास” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन नंदिनीबाई वामनराव मुलींचे ज्युनियर कॉलेज येथे करण्यात आले. कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. विवेक काटदरे हे होते. शक्ती पेक्षा बुद्धी श्रेष्ठ ही म्हण आज पण शंभर टक्के खरी आहे. कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळविण्यासाठी कुशाग्र बुद्धिमतेला पर्याय नाही. त्यांनी सागितले की, प्रत्येक विद्यार्थ्याची…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील उर्दू लेखक, पत्रकार सईद पटेल यांच्या ‘सामने आईना है’ या कथासंग्रहाचे प्रकाशन मालेगाव येथील प्रसिद्ध लेखक शिक्षणतज्ञ अशफाक उमर यांच्या हस्ते खान्देश उर्दू कौन्सिलच्या संयुक्त विद्यमाने मेहरूण मधील ममता हॉस्पिटल जवळील टिक्की हॉल येथे रविवार ३ सप्टेंबर रोजी दुपारी २: ३० वाजता होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार हे असतील तर उद्घाटक म्हणून मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड.जमील देशपांडे राहतील. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता खलील देशमुख,जमीयत उलेमा हिंदचे जिल्हाध्यक्ष व व्हायरल न्यूजचे संचालक मुफ्ती मुहम्मद हारून नदवी, मनीयार बिरादरी चे जिल्हाअध्यक्ष फारुख शेख, नगरसेवक इब्राहिम पटेल, नगरसेवक रियाज बागबान, शैक्षणिक विद्वान डॉ.बी.ए.पटेल…
साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. ब.गो.शानभाग विद्यालय, सावखेडा येथे संस्कृत दिनानिमित्त दि. 31 ऑगस्ट ते 04 सप्टेंबर दरम्यान इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृतसप्ताह पाळण्यात येत असून या सप्ताह निमित्ताने बहुपर्यायी प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा अतिशय सोपी वाटावी व त्यांच्यात या भाषेविषयी गोडी निर्माण व्हावी हाच उद्देश या सप्ताहा मागे आहे. या सप्ताह अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहासाठी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या संस्कृत सप्ताहात विद्यार्थ्यांसाठी संस्कृत एकल गीत गायन स्पर्धा, संस्कृत व्याकरण बहुपर्यायी प्रश्न स्पर्धा, संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धा, संस्कृत गप्पांचा कार्यक्रम या स्पर्धा घेण्यात येणार आहेत…
साईमत जळगाव प्रतिनिधी श्री साईबाबा संस्थान शिर्डी आयोजित श्री साईसतचरित पारायण सोहळा शिर्डीतील श्री साई समाधी शताब्दी महोत्सव मंडप येथे केसीई सोसायटी चे कान्ह ललित कला केंद्र जळगाव निर्मित ‘भावयात्रा’ या कार्यक्रमाचा ७ वा प्रयोग नुकताच सादर करण्यात आला. दरवर्षी श्रावण महिन्यात पारंपरिक अशा श्री साई सतचरित पारायण सोहळा निमित्त सात दिवस विविध नामवंत कलाकारांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.यात जळगावच्या भावयात्रा या कार्यक्रमास संधी देण्यात आली होती.यावेळी भाविक भक्तांनी सदर कार्यक्रम बघुन समधान व्यक्त केले . यावेळी कलाकार संकल्पना लेखन सादरकर्ते शशिकांत वडोदकर, ईशा वडोदकर , कपिल शिंगाने सर, देवेंद्र गुरव , रेडिओ मनभावन ९०.८ एफ एम चे आर जे…
साईमत जळगाव प्रतिनिधी गोदावरी फाऊंडेशनतर्फे मोफत हृदयरोग निदान व संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आले होते. या शिबिरात हृदयविकाराचे लक्षणं आढळून आलेल्या १६० जणांची टू डी इको तपासणी तर ३१४ शिबिरार्थींची ईसीजी कार्डिओग्राफ तपासणीही यावेळी करण्यात आली. शिबिरासाठी डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयाच्या हृदयालयातील डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, मेडिसीन तज्ञ डॉ.तुषार पाटील, निवासी डॉ.विशाल चव्हाण, सर्जरी विभागातील डॉ.गजानन गवळी, नेत्ररोग निवासी डॉ.नेहा नारखेडे, ऑर्थोचे निवासी डॉ.गौतम कुंभार यांनी शिबिरार्थींची आरोग्य तपासणी केली. याशिवाय ज्यांना हृदयविकाराचा त्रास होता किंवा हृदयविकारासारखी लक्षणे किंवा शंका असलेल्या शिबिरार्थींची टू डी इको तपासणी अर्थात हृदयाची सोनोग्राफीही मोफत करण्यात आली. टू डी इको…
साईमत जळगाव प्रतिनिधी नुकतेच भारताने चांद्रयान ३ हे अवकाशयान चंद्राच्या दक्षिण भागात सुखरूप पणे उतरवून एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.याचा यशोत्सव सुधर्मा संस्थेच्या वतीने येथील विविध झोपडपट्टीतील ५० विद्यार्थ्यांसमवेत “भाऊचे उद्यान” येथे साजरा केला. कार्यक्रम प्रसंगी मराठी विज्ञान परिषदेचे सचिव दिलीप भारंबे उपस्थित होते. त्यांचे स्वागत सुधर्मा चे अध्यक्ष हेमंत बेलसरे यांनी भगवतगीता देउन केले. याप्रसंगी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले. दिलीप भारंबे यांनी, न्युटनचा सिद्धांत, दाबाची संकल्पना स्पष्ट करण्यासाठी ३०० पिनांवर एका पायावर उभे राहणे, पाणबुडीत वापरले जाणारे पॅरीस्कोप, भुपृष्ठिय तणावाचे मापन,सेंन्ट्रिफ्युगल फोर्स एनर्जीचा उपयोग,केंद्रगामी ऊर्ध्वगामी बल, उर्जा अक्षयता नियम,तुतारीचा उपयोग करून ध्वनी तिव्रता वाढविणे, आर्किमिडीज सिद्धांत…