साईमत, धुळे, प्रतिनिधी नृत्यांगना गौतमी पाटील हिचे वडील धुळे शहरात बेवारस, मरणासन्नावस्थेत आढळले.त्यांना स्वराज्य फाउंडेशनचे प्रमुख दुर्गेश चव्हाण यांनी हिरे मेडिकल कॉलेजच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. श्री. चव्हाण यांना संबंधित रुग्ण कोण हे माहीत नव्हते. त्यांनी रुग्णाच्या आधारकार्डव्दाद्वारे सोशल मीडियावर मेसेज व्हायरल केल्यावर ओळख पटू शकली. स्वराज्य फाउंडेशनचे प्रमुख चव्हाण बेवारस व्यक्तींच्या मदतीसाठी धडपडत असतात. त्यांना शहरातील सुरत बायपासजवळ अजळकरनगरात गुरुवारी एक व्यक्ती निपचित पडून असल्याची माहिती मिळाली. सायंकाळनंतर त्या व्यक्तीला श्री. चव्हाण व गणेश ढापसे यांनी वाहनातून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. नंतर वॉर्ड क्रमांक ३५ मध्ये संबंधित व्यक्तीवर उपचार सुरू झाले. खिशात आढळलेल्या आधारकार्डच्या आधारे त्या व्यक्तीचे नाव…
Author: Saimat
साईमत, धुळे, प्रतिनिधी येथील सुरत – नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर सुरतकडून नागपूरकडे येणारा अवजड मालवाहतूक कंटेनर (एनएल ०१, एई ७७७०) व नेर येथील दुचाकी (एमएच ४१, एएच ५५७९) यांचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीचालक पित्यासह चिमुरडीचा मृत्यू झाला, तर एक महिला जखमी झाली.दुचाकीस्वार देवा भिल (वय ४२), भटाबाई श्रीराम सूर्यवंशी (वय ६६), पूनम छोटू माळीच (वय १४) हे महालकाळी शिवारात वास्तव्यास होते. ते बाजारासाठी नेर येथे आले होते. घरी परतीच्या मार्गावर असताना रस्ता ओलांडताना राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव येणाऱ्या मालवाहतूक कंटेनरने त्यांना ओढत नेले. यात दुचाकीचालक देवा भिल, मुलगी पूनम माळीच जागीच ठार झाले. वृद्ध भटाबाई श्रीराम भिल गंभीर…
साईमत, नवापूर, प्रतिनिधी ब्राह्मणगाव तालुका अक्कलकुवा जिल्हा नंदुरबार येथील ग्रामसभेत ग्रामसेवकाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन नवापूर तालुका शाखेतर्फे नवापूर पंचायत समिती आवारा धरणे आंदोलन करण्यात आले. ब्राह्मणगाव येथे कर्तव्यावर कार्यरत असलेल्या ग्रामसेवकास ग्रामसभेत झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ एक दिवशीय धरणे आंदोलन करुन घटनेचा निषेध करण्यात आला. तसे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. ग्रामपंचायत ब्राह्मणगांव ता.अक्कलकुवा जि.नंदुरबार येथे कर्तव्यावर असलेले ग्रामसेवक बांधवास घरकुल विषयावरुन ग्रामसभेत मारहाण झालेली आहे. याआधीच काही दिवसांपूर्वी घरकुल विषयावरुन ग्रामपंचायत रामपूर ता.अक्कलकुवा येथे देखील एका ग्रामसेवक बांधवावर खोटे अन्यायकारक गुन्हे दाखल झालेले आहेत. ग्रामसेवक बांधवावर नेहमीच अन्याय होत असून ते कर्तव्यावर असतांना त्यांना ग्रामसभा…
साईमत, नवापूर, प्रतिनिधी नंदुरबार जिल्ह्यातील शंभर गणित व विज्ञान शिक्षक कुप्पम येथील अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशनला प्रशिक्षणासाठी ३० ऑगस्टला अहमदाबाद ते यशवंतपुरम या रेल्वेने रात्री २ वाजेला रवाना झाले. प्रशिक्षणासाठी एवढ्या मोठ्या संख्येने प्रथमच जिल्ह्यातून शिक्षक रवाना झाले ही अभिमानास्पद बाब आहे; असे प्रशिक्षण जिल्हा समन्वयक अधिव्याख्याता डॉ. राजेंद्र महाजन यांनी सांगितले. राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था, प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर यांचे पत्रानुसार शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि अगस्त्या आंतरराष्ट्रीय फाउंडेशन यांचेमध्ये शिक्षक व प्रशिक्षकांकरिता विज्ञान विषयाच्या प्रशिक्षणाबाबत सामंजस्य करार झालेला आहे. त्यानुसार सन २०२३ -२०२४ मध्ये विज्ञान शिक्षकांसाठी या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन १ ते ४ सप्टेंबर या कालावधीत…
साईमत, शिरपूर, प्रतिनिधी तालुक्यातील पश्चिम भागातील तऱ्हाडी- वरूळसह परिसरात गेल्या काही महिन्यांपासून कृषी तसेच गावठाणचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची वारंवार मागणी करूनही विजेची समस्या सुटत नसल्यामुळे अखेर शुक्रवारी संतप्त शेतकऱ्यांनी सबस्टेशन गाठून वीज विभागाच्या उदासीन धोरणाविषयी रोष व्यक्त करीत निवेदन दिले. तसेच विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारादेखील यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला. तालुक्यातील परिसरातील जनतेची व शेतकऱ्यांची विजेची समस्या कायमस्वरूपी सुटावी, यासाठी वरुळ येथे 33 के.व्ही.क्षमतेच्या उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली. या उपकेंद्रावरून परिसरातील तऱ्हाडीसह वरुळ, भटाणे, जवखेडा, तऱ्हाड कसबे, भामपूर, टेकवाडे नवे -जुने, अंतुली…
साईमत, जळगाव : प्रतिनिधी तुमचे जीएसटी रेकॉर्ड योग्य नसल्याचे सांगत आपल्याकडे जीएसटीची धाड टाकली जाणार आहे. असा बागुलबुवा दाखवत उद्योजकांना गंडविणाऱ्या एका तोतया जीएसटी अधिकाऱ्याचा उद्योजकांच्या एकजुटीमुळे पर्दाफास झाला असून या तोतयाविरूध्द एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शहरातील एमआयडीसी परिसरातील जी सेक्टरमध्ये गेल्या दोन, तीन महिन्यापासून एक ५० वर्षीय इसम ‘महाराष्ट्र शासन ’असे लिहिलेली गाडी (एमएच १९ सीवाय ००२५) घेऊन फिरत होता. हा इसम उद्योजकांना या ना त्या कारणाने तुमच्या हिशेबात त्रुटी आहेत. त्यामुळे तुमच्यावर जीएसटीची रेड होणार आहे. असे सांगत उद्योजकांना भीती दाखवत त्यांच्याकडून मोठ्या रक्कमा उकळत असल्याचा उद्योग…
साईमत, जालना : प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये रेटारेटी झाली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू होते. उपोषण करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि हव्ोत गोळीबार केला. या घटनेनंतर जिल्ह्यात तणावाची स्थिती आहे. घटनास्थळी दगडांचा खचही असल्याचे दिसून आले आहे. उपोषण आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या लाठी हल्ल्याचा निषेध केला आहे. २९ ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह १० जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषणकर्त्या आंदोलकांची प्रकृती खालावण्याची…
साईमत, मुंबई ः प्रतिनिधी इंडिया आघाडीतले सर्व पक्ष आगामी लोकसभा निवडणूक आणि शक्य तितक्या विधानसभा निवडणुका एकत्र लढतील. सर्व पक्षांनी तसा संकल्प केला आहे. निवडणुकांसाठी व्ोगव्ोगळ्या राज्यांमध्ये जागावाटपाची प्रक्रिया सुरू करून ती लवकरच पूर्ण केली जाईल, यासह तीन महत्त्वपुर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, या बैठकीत १४ सदस्यांच्या केंद्रीय समन्वय समितीची घोषणा करण्यात आली. सर्वच प्रमुख नेत्यांचा मोदी सरकार आणि त्यांच्या कार्यपध्दतीवर टिका केली. केंद्रातल्या मोदी सरकारविरोधात एकत्र आलेल्या इंडिया आघाडीची मुंबईतली बैठक पार पडली. या बैठकीनंतर सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यात मल्लिकार्जुन खरगे यांनी…
साईमत जळगाव प्रतिनिधी स्पर्धेच्या युगात प्रत्येकात विविध गुंणकौशल्य असणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक पातळी वेगवेगळी असल्याने विद्यार्थ्यांना जर शैक्षणिक प्रगती साधायची असेल तर त्यांच्या जवळ प्रखर स्मरणशक्ती व एकाग्रता मोठ्या प्रमाणात असणे गरजेचे आहे. त्या अनुसरून विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती व एकाग्रता वाढावी, त्यांचे महत्व कळावे या उद्देशाने एसडी-सीड तर्फे “स्मरणशक्ती व एकाग्रता विकास” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन नंदिनीबाई वामनराव मुलींचे ज्युनियर कॉलेज येथे करण्यात आले. कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. विवेक काटदरे हे होते. शक्ती पेक्षा बुद्धी श्रेष्ठ ही म्हण आज पण शंभर टक्के खरी आहे. कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळविण्यासाठी कुशाग्र बुद्धिमतेला पर्याय नाही. त्यांनी सागितले की, प्रत्येक विद्यार्थ्याची…
साईमत जळगाव प्रतिनिधी शहरातील उर्दू लेखक, पत्रकार सईद पटेल यांच्या ‘सामने आईना है’ या कथासंग्रहाचे प्रकाशन मालेगाव येथील प्रसिद्ध लेखक शिक्षणतज्ञ अशफाक उमर यांच्या हस्ते खान्देश उर्दू कौन्सिलच्या संयुक्त विद्यमाने मेहरूण मधील ममता हॉस्पिटल जवळील टिक्की हॉल येथे रविवार ३ सप्टेंबर रोजी दुपारी २: ३० वाजता होत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार हे असतील तर उद्घाटक म्हणून मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड.जमील देशपांडे राहतील. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता खलील देशमुख,जमीयत उलेमा हिंदचे जिल्हाध्यक्ष व व्हायरल न्यूजचे संचालक मुफ्ती मुहम्मद हारून नदवी, मनीयार बिरादरी चे जिल्हाअध्यक्ष फारुख शेख, नगरसेवक इब्राहिम पटेल, नगरसेवक रियाज बागबान, शैक्षणिक विद्वान डॉ.बी.ए.पटेल…