साईमत, धुळे, प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यशैली पाहून भाजपमध्ये प्रवेश केला. याद्वारे शेती समस्या सोडविण्याचा प्रयत्न करेल. सध्या निवडणूक लढविण्याचा विचार नाही. मात्र, पक्षाने संधी दिल्यास लोकसभेची उमेदवारी करेल, असे नाशिक परिक्षेत्राचे निवृत्त विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी शनिवारी (ता.3) पत्रकार परिषदेत सांगितले. श्री.दिघावकर म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात देश वेगाने प्रगती करीत आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता भाजपत प्रवेश केला आहे. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू. धुळे लोकसभा मतदारसंघात सिंचनाची मोठी समस्या आहे. शेतकऱ्यांचे भाग्य सिंचनामुळे पलटू शकते. पश्चिम वाहिनी नद्या, नदीजोड प्रकल्प, नार- पार प्रकल्प यातून जलऑडिट करायचे ठरविले आहे. नार-पार प्रकल्पाची 1956 पासून चर्चा…
Author: Saimat
साईमत, शिरपूर, प्रतिनिधी तालुक्यातील भाटपुरा गावासारख्या ग्रामीण भागातून आयएस पदावर एक युवक पोहोचला. हा फक्त भाटपुऱ्याचा नव्हे तर तालुक्याचा गौरव आहे आणि खऱ्या अर्थाने हा गौरव शिक्षणामुळे शक्य झाला आहे. त्यामुळे आजच्या काळात शिक्षणाशिवाय माणूस पुढे जाऊ शकत नाही याचे उत्तम उदाहरण आहे, असे प्रतिपादन आमदार अमरीशभाई पटेल यांनी केले. ते शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथे आयएएस कॅडरपदी नियुक्ती झालेले भूमिपुत्र डॉ.प्रवीणकुमार पीतांबर देवरे याां गौरव सोहळ्याप्रसंगी बोलत होते. देवरे यांचा भाटपुरा ग्रामस्थांच्या वतीने हृदय स्पंदन गौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी आ.काशीराम पावरा,चोपड्याच्या आ.लताताई सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, निवृत्त…
साईमत जळगाव प्रतीनिधी माता पार्वतीने भगवान शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. कारण माताने लग्नाआधीच शिवजींना पती म्हणून स्वीकारले होते. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या अद्भुत प्रेमाची आणि विवाहाची ही रंजक कथा आंतरराष्ट्रीय कथाकार महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजी (बापू) यांनी कथन केली आहे. तसेच यावेळी शिव पार्वती विवाह सोहळा हर्षोल्हासात झाला. शहरातील नेरी नाका परिसरातील पांजरापोळ संस्थानच्या मैदानात सुरू असलेल्या भव्य संगीतमय शिव महापुराण कथेचा आज (दि. 2) तिसरा दिवस होता. महामंडलेश्वर संत श्री बृजभूषणजींचे स्वागत अरुण भोळे यांनी सपत्नीक केले तर मनीष बाहेती यांनी सपत्नीक शिवमहापुराण ग्रंथाचे पूजन केले. तिसर्या दिवसाच्या कथाप्रारंभावेळी कथामंचावर अविनाश बोरोले, मनिष…
साईमत जळगाव प्रतीनिधी डॉक्टरांचे कार्य हे परमेश्वरी कार्य आहे. त्यांच्या कौशल्यामुळे जनसामान्यांना मोठा आधार मिळतो. मुंबईचे मणकारोग तज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज हे रुग्णांसाठी आधारवड असून त्यांच्या वैद्यकीय कौशल्याचा फायदा जळगावच्या रुग्णांसाठी आपण उपलब्ध करून दिला आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज, पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले. तर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विविध ग्रामीण रुग्णालयासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आपण आरोग्यक्षेत्रासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. कलियुगातील परमेश्वर म्हणजे डॉक्टर असून आता जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात शिशूंसाठी “मदर मिल्क बँक” स्थापन करणार असल्याची घोषणा पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…
साईमत, मुंबई ः प्रतिनिधी अब्दुल करीम तेलगी स्टँप पेपर घोटाळ्यातील हा आरोपी. त्याच्या आयुष्यावर संजय सिंग यांनी पुस्तक लिहिले आहे. २००१ मध्ये तेलगीचा हजारो कोटी रूपयांचा स्टँप पेपर घोटाळा उघडकीस आला. त्यानंतर आता संजय सिंग यांच्या पुस्तकावर आधारीत ‘स्कॅम २००३’ ही वेबसीरिज आली आणि अब्दुल करीम तेलगीचे नाव पुन्हा चर्चेत आले. अब्दुल करीम तेलगीची कहाणी या सिरीजमधून मांडण्यात आली आहे. त्याचे वडील रेल्वे स्टेशनवर काम करायचे. अब्दुल तरुण होता तेव्हाच त्याचे वडील वारले. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी अब्दुलच्या खांद्यावर येऊन पडली. अब्दुलने उदरनिर्वाहासाठी पडेल ते काम केली. फळविक्रेता म्हणून तेलगी काम करायचा. हिंदी, मराठी, उर्दू आणि कन्नड या चारही भाषा…
साईमत जळगाव प्रतीनिधी अभिवाचनाचे कौशल्य शिक्षकांसाठी प्रभावी अस्त्र असून त्याचा सुयोग्य वापर केल्यास शिक्षण प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन डॉ. शमा सुबोध सराफ यांनी केले. रोटरी क्लब जळगावतर्फे शालेय शिक्षकांसाठी आयोजित अभिवाचन कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. याप्रसंगी रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष मनोज जोशी, मानद सचिव ऍड. हेमंत भंगाळे, लिटरसी कमिटी चेअरमन डॉ. शुभदा कुलकर्णी व प्रकल्प प्रमुख सुबोध सराफ मंचावर उपस्थित होते. त्या पुढे म्हणाल्या की, एखादी कथा, लेख किंवा कोणत्याही प्रकारचे लिखाण वाचून दाखवताना त्याला वाचिक अभिनयाची जोड दिली की ते अभिवाचन होते. आपल्या आवाजातील अभिनयातून वाचन प्रभावी आणि उठावदार करणे हे ह्यातून अभिप्रेत…
साईमत, जालना ः वृत्तसंस्था जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये तुफान मारहाण झाली होती.या घटनेचे पडसाद शनिवारी राज्यभरात दिसून आले.जालना शहरात मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या दरम्यान आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी हवेत गोळीबार करत,अश्रूधुराच्या नळकांड्याचा मारा केला. त्यामुळे जालना शहरात आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे. सध्या जालना शहरात तणावपूर्ण शांतता आहे. जालना शहरातील प्रमुख भाग असलेल्या अंबड चौफुली येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यात अंतरवाली सराटी येथे झालेल्या लाठीचार्जचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात शहरासह परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलन सुरू होताच हा जमाव अनियंत्रित…
साईमत जळगाव प्रतीनिधी नवविवाहित स्त्रीयांच्या आनंदाला उधाण आणणारा श्रावणातील प्रमुख सण म्हणजे मंगळागौर होय.. आधुनिक जगतात वावरतांनाही मंगळागौरसारखे धार्मिक विधी पार पाडत आधुनिक जगातील सत्यता शब्दबद्ध करुन त्यावर मंगळागौरीचे खेळही उत्साहाने खेळले जातात… असाच एक मंगळागौर सोहळा पार पडला तो व्यावसायाने डॉक्टर असलेल्या गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांच्या कुटूंबात… नाच गं घुमा कशी मी नाचू…, पोरी पिंगा ग पोरी पिंगा गं… ह्यासारख्या गाण्यांचे बोल आणि विविधरंगी जरी काठापदराच्या साड्या नेसून सोळा-श्रृंगार करत पायी ठेका धरण्याचा मोह महिलावर्गाला आवरला गेला नाही. त्याचे कारणही तसेच काहीसे होते. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील व डॉ.वर्षा पाटील यांचे चिरंजीव डॉ.अनिकेत…
साईमत,बंगळुरू ः वृत्तसंस्था चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-३ च्या यशस्वी लँडिंगनंतर, इस्रोने शनिवारी सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आपली पहिली मोहिम पाठवली.आदित्य एल-१ नावाची ही मोहीम पीएसएलव्ही-सी ५७ च्या आवृत्ती रॉकेटचा वापर करून श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी ११.५० वाजता प्रक्षेपित करण्यात आली. हे चार टप्प्यातील रॉकेट आहे. रॉकेटने ६३ मिनिटे १९ सेकंदानंतर आदित्यला २३५ १९५०० किमीच्या कक्षेत सोडले. सुमारे ४ महिन्यांनंतर ते पॉइंट-१ वर पोहोचेल.या ठिकाणी ग्रहणाचा कोणताही प्रभाव दिसत नाही, त्यामुळे येथून सहजपणे सूर्यावर संशोधन करता येते. आदित्य यानला सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असलेल्या हॅलो ऑर्बिटमध्ये ठेवण्यात येणार आहे. इस्रोचे म्हणणे आहे की, १ बिंदूभोवती प्रभामंडल कक्षेत ठेवलेला उपग्रह…
साईमत जळगाव प्रतीनिधी विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी केले. त्या जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील प्रथम वर्ष बीसीए-एमसीए विभागात प्राध्यापक-पालक सभे प्रसंगी बोलत होत्या. व्यासपीठावर अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत, एमसीए विभागप्रमुख प्रा. रफिक शेख, बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे उपस्थित होते. पालकांना मार्गदर्शन करतांना प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी नमूद केले कि, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांची प्रगती उत्तम असून तंत्रज्ञानाबाबत त्यांना बऱ्याच गोष्टी न शिकवता ते स्वतः शिकतात. हीच बाब त्यांनी अभ्यासातही केली पाहिजे. यामुळे त्यांची शैक्षणिक…