Author: Saimat

साईमत जळगाव प्रतिनिधी होय, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक असून मी येणारी निवडणूक धनुष्यबाणावरच लढणार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते , पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. ते धरणगाव तालुक्यातील पिंपळे गावातील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन प्रसंगी आयोजित जाहीर सभेत बोलत होते. पिंपळे खु. ते धरणगाव हा मधला उर्वरित रस्त्याचा प्रश्न मार्गी लावणार असून पिंपळे व परिसरातील गावाच्या मागणीनुसार निधी उपलब्ध करणार असल्याचे सांगून गाव विकासासाठी पिंपळे गावाची एकजूट कौतुकास्पद आहे. पिंपळेकरांनी कायमच माझ्यावर निवडणुकीतही भरभरून प्रेम केलं आहे. तुमचे आशीर्वाद आयुष्यभर विसरू शकणार नाही, अशा भावना ना. पाटील यांनी व्यक्त केल्या. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश पाटील, कृ.…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल पूर्व प्राथमिक विभागात शनिवार दि .२सप्टेंबर रोजी नर्सरी ची सहल भाऊंचे उद्यान व ज्युनिअर व सीनिअर केजी ची सहल कुसुंबा येथील गो शाळेत आयोजित करण्यात आली. गोशाळा तील सहलीत विद्यार्थ्यांना सुरुवातीस गो शाळेमधील कबूतर खाना, वेगवेगळ्या जातीच्या गाई दाखवण्यात आल्या . गाई- म्हशीच्या दुधापासून दही, ताक,लोणी,तूप कसे बनते याची माहिती देण्यात आली. याठिकाणी उंट देखील बघावयास मिळाल्याने विद्यार्थी खुश झाले. परिसर भटकंती झाल्यानंतर विद्यार्थी निसर्गरम्य परिसरात मनसोक्त खेळले. नर्सरीच्या सहलीत”भाऊंचे उद्यान” येथे सुरवातीला विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रथम उद्यानातील निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांनी प्रार्थना म्हटली. विद्यार्थ्यांना उद्यानातील म्युझियम…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी दि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेचा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा रविवार दि. 3 सप्टेंबर रोजी यशवंतराव पाटील मुक्तांगण सभागृहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना बँकेचे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, ‘गुरुजी तु मला आवडला’ हे पुस्तक असा संच प्रत्येक विद्यार्थ्यास भेट देण्यात आला. 168 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. बँकेचे चेअरमन अनिकेत पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, बँके तर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या गुणवंत विद्यार्थी सत्कारासाठी सर्व विद्यार्थी आतुर असतात, कारण त्यांनी वर्षभर केलेल्या अभ्यासाला व मेहनतीला कौतुकाची थाप मिळते. बँक गेल्या जवळपास 30 वर्षांपासून गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करत आहे. बँकेचे…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी विचार, भावना आणि कृती ह्या एकमेकांशी बांधील आहेत आणि म्हणूनच मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ह्या तिघांचा योग्य संगम साधणे गरजेचे आहे. सतर्क राहून भावना ताब्यात ठेवता आल्या पाहिजेत. आपण काय करीत आहोत? त्याचा परिणाम काय होणार आहे? ह्याचा सतत विचार केला पाहिजे. चांगले विचार ऐकणे, चांगली पुस्तके वाचणे, रोजच्या दिवसाचे योग्य ते व्यवस्थापन करणे आणि विश्वातील अदम्य अश्या शक्तीवर श्रद्धा ठेवणे हे भावनिक व्यवस्थापनासाठी आणि एकूणच मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी महत्वाचे आहे, असा महत्वाचा सल्ला क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट आणि कॉऊन्सेलर डॉ. प्रतिभा हरनखेडकर यांनी विद्यार्थ्यांना दिला. के. सी. ई. सोसायटीच्या मॅनॅजमेण्ट अँड रिसर्च जळगावच्या ‘बदलत्या युगातील मानसिक आरोग्य’…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट सदस्य व नेत्ररोग तज्ञ डॉ. दर्शना पंकज शाह यांची रोटरी मेडिकल मिशन अंतर्गत काश्मीर येथे होणाऱ्या मेगा सर्जिकल प्रोजेक्टसाठी निवड झाली आहे. काश्मीरचे राज्यपाल लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या पुढाकाराने काश्मीर सरकार व रोटरी यांच्या संयुक्त विद्यमाने या सर्व शस्त्रक्रिया मोफत केल्या जाणार आहे. 3 ते 13 सप्टेंबर असे दहा दिवस हे शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गतवर्षी नऊ दिवसात 2499 शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या होत्या. डॉ. दर्शना शाह यांचे पती रोटरी जळगाव इलाईटचे माजी अध्यक्ष डॉ. पंकज शाह यांनी देखील रोटरी मेडिकल मिशन मध्ये विदेशात जाऊन मोफत शस्त्रक्रिया करीत…

Read More

साईमत जळगाव प्रतिनिधी राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्याने कोरडया दुष्काळा सारखी भयावह स्थिती निर्माण झाली आहे. त्यासाठी पाऊस पडावा म्हणून सर्व शक्तिमान, निसर्ग चालवणारी शक्ती म्हणजे एकमेव ईश्वर – अल्लाह यांना साकडे घालण्यासाठी जळगाव शहरातील हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन नमाज ए ईस्तेस्का अदा करून दुआ केली. मौलाना उस्मान कासमी यांनी खास दुवा करत अल्लाह ला साकडे घातले की, आमच्याकडून झालेल्या चुका माफ कर, आम्ही कोणाचेही हक्कावर गदा आणणार नाही, एकमेका सहाय्य करू, कोणाची चेष्टा करणार नाही परंतु तू पाऊस दे अशी प्रार्थना करीत असताना उपस्थित हजारोच्या संख्येने उपस्थित समुदायाने आपले दोघी हात उलटे करून दुवा मागितली. उलटे हात…

Read More

साईमत, नंदुरबार, प्रतिनिधी  गेल्या काही दिवसांपासून कुठेही पाऊस पडलेला नाही. जिल्ह्यात देखील मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. यामुळे पिकांना वाचविण्यासाठी वरुण देवाला आराधना केली जात आहे. याचदरम्यान जिल्ह्यातील प्रकाशा येथे पावसासाठी देवाला साकडे घालण्यात आले. साधारण महिनाभरापासून जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे. पिकांना पाण्याची आवश्यकता असताना पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे आहेत. पाऊस नसल्याने पीक करपण्यास सुरुवात झाली असून ग्रामीण भागात पाणीटंचाईची समस्या ही समोर येऊ लागली आहे. आता पाऊस आला नाही तर आगामी काळात परिस्थिती गंभीर होणार आहे. पिकांना जीवदान मिळावे आणि ग्रामीण भागातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटावा, म्हणून प्रकाशा येथील गावकरी आणि शेतकऱ्यांनी पुरातन नीळकंठेश्वर महादेव…

Read More

साईमत, धुळे, प्रतिनिधी,  एसटी महामंडळाच्या चालकांची 3 ऑगस्ट व 1 सप्टेंबरला ‌‘अल्को टेस्ट‌’ मशिनद्वारे तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात चालकांच्या तपासणीत धुळे विभागातील 9चालक मद्यप्राशन करून कामावर आढळले. सर्व मद्यपी चालकांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणार असल्याचे एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी म्हटले आहे. एसटी चालकांनी मद्यप्राशन करून कामावर राहणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्या हातून अपघात घडण्याची दाट शक्यता असते. काही एसटी बसचालक मद्यपान करून वाहन चालवीत असल्याच्या तक्रारी झाल्या. विशेषत: ज्या बस रात्री मुक्कामी जातात अशांच्या बसचालकांबाबत या तक्रारी जास्त होत्या. त्याची गंभीर दखल घेत एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक चन्ने यांनी…

Read More

साईमत, शिरपूर, प्रतिनिधी   भारतीय जनता पार्टीची शिरपूर शहर मंडळ, सांगवी मंडळ, शिरपूर ग्रामीण मंडळ अध्यक्षपदासाठी मुलाखती घेण्यात आल्या. प्रदेश उपाध्यक्षा तथा धुळे जिल्हा प्रभारी माजी आ. श्रीमती स्मिताताई वाघ, धुळे ग्रा.जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, आ. काशिराम पावरा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर उद्योगपती चिंतनभाई पटेल, धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, शिरपूर कृउबा समिती सभापती के. डी. पाटील, बोराडी उपसरपंच राहुल रंधे आदी उपस्थित होते. बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना धुळे भाजपा जिल्हा प्रभारी श्रीमती स्मिता वाघ म्हणाल्या की, येणारा काळ निवडणुकीचा असून अध्यक्षपदाला न्याय देण्याची अनेक कार्यकर्त्यांत क्षमता आहे. मात्र पद एकालाच देता…

Read More

साईमत, धुळे, प्रतिनिधी सहा महिन्यांपासून रखडलेल्या शिक्षक पदभरतीला अखेर सुरवात झाली आहे. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 परीक्षा दिलेल्या उमेदवारांचे स्वप्रमाणपत्र तयार करण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारपासून सुरवात झाली. येत्या 15 सप्टेंबरपर्यंत स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. पात्रताधारक उमेदवारांचे शिक्षक होण्याचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022 परीक्षा 22 फेब्रुवारी ते 3 मार्चदरम्यान ऑनलाइन माध्यमातून झाली. उमेदवारांना आवश्यक सूचना https://mahateacherrecruitment.org.in/ या संकेतस्थळावरील पोर्टलवर देण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेनंतर शिक्षकांच्या रिक्त जागांची जाहिरात पोर्टलवर प्रदर्शित केली जाईल. णवत्तेनुसार उमेदवारांचे पसंतीक्रम घेण्यात येतील आणि…

Read More