Author: Saimat

साईमत, मुंबई : प्रतिनिधी ऑगस्टमधील मोठ्या मान्सून खंडानंतर राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, पुढील तीन ते चार दिवसांमध्ये राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुढील अंदाजे १० दिवस पाऊसदिलासा मिळण्याची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यांमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र वायव्येकडे सरकत असल्याने राज्याला त्याचा फायदा होईल, असे निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी स्पष्ट केले. या प्रणाली अंतर्गत १५ सप्टेंबरपर्यंत राज्यात चांगला पाऊस पडेल असा अंदाज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मध्यम ते मुसळधार तर मुंबईसह कोकण आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार…

Read More

साईमत, मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यासाठी ३५० रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. या अनुदान वितरणाच्या पहिल्या टप्याचा शुभारंभ आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्या टप्प्यात तीन लाख कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ३०० कोटी रुपये एवढा निधी ऑनलाईन वितरित होणार आहे. उर्वरित अनुदान वितरणासाठी दुसरा टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. कांदा अनुदानासाठी १० कोटी पेक्षा कमी अनुदानाची मागणी असलेल्या…

Read More

साईमत, मुंबई : प्रतिनिधी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारकडून ‌‘इंडिया‌’ नावाचा वापर टाळला जात आहे. त्यावर सडकून टीका केली. देशातील विरोधी पक्षांनी इंडिया नावाची आघाडी स्थापन केली, म्हणून इंडियाचे नाव पुसून टाकण्यासारखा दुसरा घाबरटपणा, कद्रुपणा, विकृतपणा नाही, असे म्हणत संजय राऊतांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ते बुधवारी (६ सप्टेंबर) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते. संजय राऊत म्हणाले, आम्ही ‌‘इंडिया‌’ आघाडी स्थापन केल्यापासून त्यांना इंडिया या शब्दाचंच भय वाटायला लागलं. एखाद्या पक्षाला, एखाद्या सरकारला देशाच्या घटनेतील नावाविषयी भय वाटू लागतं हा विचित्र प्रकार आहे. घटनेत इंडिया नाव आहे. घटनेत भारत हेही नाव आहे. मात्र,…

Read More

साईमत, मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी उपोषण, आंदोलन सुरु आहे. त्याची दखल आम्ही घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांची मागणी होती की निजामकालीन नोंदी ज्यांच्याकडे असतील त्यांना कुणबी जात प्रमाणपत्राचा दाखला दिला पाहिजे. त्याप्रमाणे बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीत आम्ही निर्णय घेतला आहे. ज्यांच्या महसुली, शैक्षणिक आणि निजामकालीन नोंदी असतील त्यांना कुणबी दाखले देणार. त्याची पडताळणी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची समिती गठीत केली आहे. त्यात पाच सदस्यांचा समावेश करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ िंशदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ज्यांच्या पूर्वीच्या महसुली, शैक्षणिक निजामकालीन नोंदी आहेत, त्याच्या पडताळणीचं काम ही समिती करणार आहे. महसूल सचिव समिती या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीला मदतही…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी गणेशोत्सव येत्या काही दिवसांवर पोहोचला असून संपूर्ण तालुक्यात या उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. या संपूर्ण गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह शांततामय वातावरणात उत्सव साजरा होणे आवश्यक आहे. यामुळेच जळगाव तालुक्यात सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्व नागरिक, गणेश मंडळ, सरपंच, शहरातील नगरसेवक व विविध संस्था, सर्व पदाधिकारी यांनी ‌‘एक गाव, एक गणपती‌’ तसेच शहरात ‘एक वार्ड, एक गणपती’ साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा व प्रशासनास मदत करावी, असे आवाहन जळगाव तालुका युवासेनेच्या वतीने उपतालुका प्रमुख स्वप्निल सोनवणे यांनी केले आहे. राज्यात दरवर्षीप्रमाणे १९ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीत सार्वजनिक गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा होणार आहे.…

Read More

साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील सर्वाधिक फि घेणाऱ्या वकिलांमध्ये ज्यांच्या नावाचा समाव्ोश होतो. ते प्रमूख नाव म्हणजे हरीश साळव्ो. हरीश साळव्ो यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. अर्थात, ही चर्चा आहे त्यांच्या तिसऱ्या लग्नाची. भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळव्ो यांचे वय ६८ आहे. लंडनमधील एका भव्य दिव्य कार्यक्रमात हरीश साळव्ो यांनी त्रिना हिच्याशी लग्न केले. या लग्न सोहळ्याला नीता अंबानी, ललित मोदी, सुनील मित्तल यांच्यासह उद्योग जगतातील दिग्गज लोकांची उपस्थिती होती. हरीश साळव्ो यांनी पहिले लग्न मीनाक्षी यांच्यासोबत केलं होतं. त्यांना दोन मुली आहेत. त्यानंतर त्यांनी २०२० मध्ये कॅरोलिन ब्रासार्ड हिच्याशी लग्न केले. मात्र, दुसरे लग्न देखील फार…

Read More

साईमत, जालना : प्रतिनिधी मंत्र्यांच्या शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतरही मनोज जरांगे यांनी उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आंदोलन मागे घेणार नाही, पण सरकारला चार दिवसांचा व्ोळ देत असल्याचे शिष्टमंडळाच्या चर्चेनंतर जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मराठा आरक्षणावर अध्यादेश काढण्यासाठी आपण सरकारला चार दिवसांची मुदत देत आहोत. तोपर्यंत आपण उपोषण सुरुच ठेवणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे यांनी सांगितलं की, आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी संपर्क होत नाही. पण त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्य सरकारचे हे शिष्टमंडळ उद्या पुन्हा एकदा आपली भेट घेणार आहेत आणि या प्रश्नी चर्चा करणार आहेत. मनोज जरांगे यांनी…

Read More

साईमत, जळगाव ः प्रतिनिधी मराठा समाजावर झालेल्या लाठीचार्जवर देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागितली म्हणजे त्यांनी एक प्रकारे गुन्ह्याची कबुली दिली आहे. आता फडणवीसांनी राजीनामा देण्याबाबत मागील घटनांमधून प्रेरणा घ्यावी असे सुचक विधान शरद पवार यांनी केली आहे. शरद पवार यांची मंगळवारी जळगावात सभा होती. त्याआधी त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. शरद पवार म्हणाले की, गोवारींवर लाठी हल्ला झाला नव्हता, तिथे चेंगराचेंगरी झाली होती. या घटनेनंतर त्या खात्याचे मंत्री मधुकर पिचड यांनी ताबडतोब राजीनामा दिला होता. त्यानंतर मुंबईतील एका घटनेनंतर गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी राजीनामा दिला होता. पूर्वीच्या या २…

Read More

साईमत, जळगाव : प्रतिनिधी जालना येथील उपोषण करणाऱ्या लोकांवर लाठीहल्ला करण्यात आला. पुरुष, महिला, लहान मुले जखमी झाले. शेतकरी, शेतमजूर अनेकांवर लाठीहल्ला केला. राजकारण्यांकडून सत्तेचा गैरवापर करण्यात आला. आया बहिणींवर लाठीहल्ला करण्याची ज्यांची नीती असेल त्यांच्या हातात सत्ता ठेवणार नाही, या सगळ्यांचा आपण शंभर टक्के पराभव करू, या लढाईसाठी आपण सगळ्यांनी तयार राहिले पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, एकनाथराव खडसे, महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे, गुलाबराव देवकर, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, ॲड. रविद्रभैय्या पाटील, सतिष पाटील, रोहीत पवार यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मंगळवारी शहरातील सागरपार्क मैदानावर जाहीर सभा…

Read More

साईमत, मुंबई ः प्रतिनिधी बीसीसीआयने आगामी वनडे वर्ल्डकपसाठीच्या टीमची घोषणा केली आहे.येत्या ५ ऑक्टोबरपासून आयसीसी वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी १५ जणांच्या स्क्वॉडची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा वनडे वर्ल्डकप भारतात आयोजित केला जात असल्याने टीम इंडिया जिंकण्यासाठी प्रबळ दाव्ोदार मानली जात आहे. याव्ोळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला हा वर्ल्डकप खेळायचा आहे. रोहित शर्मा कर्णधारपदी टीम इंडिया प्रबळ दाव्ोदार म्हणून वर्ल्डकपमध्ये उतरणार आहे. ओपनर रोहित शर्माकडे टीमचे कर्णधारपद सोपवण्यात आले असून हार्दिक पांड्याला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. केएल राहुल आणि इशान किशन यांचा विकेटकीपर म्हणून टीममध्ये समाव्ोश करण्यात आला आहे.याशिवाय नुकतीच सर्जरी झालेल्या केएल राहुललाही संघात स्थान…

Read More