देशाचे माजी सॉलिसिटर यांच्या तिसऱ्या लग्नाची गोष्ट

0
19

साईमत, नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील सर्वाधिक फि घेणाऱ्या वकिलांमध्ये ज्यांच्या नावाचा समाव्ोश होतो. ते प्रमूख नाव म्हणजे हरीश साळव्ो. हरीश साळव्ो यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे. अर्थात, ही चर्चा आहे त्यांच्या तिसऱ्या लग्नाची. भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळव्ो यांचे वय ६८ आहे. लंडनमधील एका भव्य दिव्य कार्यक्रमात हरीश साळव्ो यांनी त्रिना हिच्याशी लग्न केले. या लग्न सोहळ्याला नीता अंबानी, ललित मोदी, सुनील मित्तल यांच्यासह उद्योग जगतातील दिग्गज लोकांची उपस्थिती होती. हरीश साळव्ो यांनी पहिले लग्न मीनाक्षी यांच्यासोबत केलं होतं. त्यांना दोन मुली आहेत. त्यानंतर त्यांनी २०२० मध्ये कॅरोलिन ब्रासार्ड हिच्याशी लग्न केले. मात्र, दुसरे लग्न देखील फार काळ टिकू शकले नाही. हरीश साळव्ो सध्या भारताच्या सुप्रीम कोर्टात वकिली करतात.

वयाच्या ६८व्या वर्षी तिसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकणारे हरीश साळव्ो एका केससाठी लाखो रुपयांची फी घेतात. आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताच्यावतीने कुलभूषण जाधवचा खटला लढवताना त्यांनी १ रुपया फी घेतली होती. त्या प्रकरणात हरीश साळव्ो यांनी आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तानला पराभूत केले होतं. हरीश साळव्ो १९९२ ते २००२ मध्ये भारताचे सॉलिसिटर जनरल राहिले आहेत. २०१७ मध्ये तत्कालीन विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी त्याबाबत माहिती दिली होती. कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. त्याव्ोळी आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना गुप्तहेर म्हणून सिद्ध करण्यासाठी २० कोटी वाया घालवले होते. हरीश साळवेंनी त्यांच्या युक्तिवादाच्या जोरावर पाकिस्तानचे मनसुबे धुळीस मिळवले होते.

हरीश साळव्ो कोर्टात एक केस लढवण्यासाठी ६ ते १५ लाख रुपये फी घेतात. देशातील सर्वात महागड्या वकिलांच्या यादीत त्यांचा समाव्ोश होतो. हरीश साळव्ो यांनी त्यांची कारकीर्द अभिनेत दिलीप कुमार यांच्यासाठी केस लढून सुरु केली होती. हरीश साळवेंनी त्या प्रकरणात त्यांच्या वडिलांची मदत केली होती. दिलीप कुमार यांच्यावर त्याव्ोळी काळ्या पैशांचा आरोप करण्यात आला होता. हरीश साळव्ो यांचा जन्म २२ जून १९५५ ला महाराष्ट्रातील खान्देशात झाला आहे. ते हाय प्रोफाइल प्रकरणे अधिक हाताळतात. सलमान खान हिट अँड रन केस, आरुषी हेमराज केस याशिवाय नुकत्याच झालेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात एकनाथ िंशदे यांच्या बाजूने साळव्ो यांनी युक्तिवाद केला होता. अंबानी, मिंहद्रा आणि टाटा या सारख्या बड्या कॉर्पोरेट घराण्यांच्या केसेस ते लढतात. त्यांनी व्होडाफोनला १४२०० कोटींच्या कथित करचोरी प्रकरणात विजय मिळवून दिला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here