जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात, फेब्रुवारीत मतदानाची शक्यता साईमत /जळगाव/प्रतिनिधी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा हंगाम जोरात सुरू झाला असून, शहरी भागानंतर आता ग्रामीण भागातील सत्तासंघर्षाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. नगर परिषद व नगर पालिका निवडणुका पार पडल्यानंतर सध्या महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकांनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी जाहीर होणार, मतदान कधी होणार, याबाबत इच्छुक उमेदवार, राजकीय पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. अशातच या निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली असून ग्रामीण राजकारण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक प्रक्रियेला गती सुप्रीम कोर्टाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…
Author: saimat
डिप्लोमाच्या एकुलत्या एक विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू साईमत /पाचोरा – वेरुळी बुद्रुक/प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील वेरुळी बुद्रुक येथे डिप्लोमाचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (दि. ५) दुपारी उघडकीस आली. प्रणव संजय महाजन (वय १८, रा. वेरुळी बुद्रुक) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून या घटनेने कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्रणव हा जळगाव येथील गोदावरी कॉलेजमध्ये डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. संजय महाजन यांचा तो एकुलता एक मुलगा होता. अभ्यासू, शांत स्वभावाचा आणि सर्वांशी मिळून मिसळून वागणारा विद्यार्थी म्हणून त्याची ओळख होती, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास प्रणव ‘शेतात जाऊन…
राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी त्यांची निवड झाली साईमत /जळगाव/प्रतिनिधी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी आयोजित राज्यस्तर युवा महोत्सवाच्या वक्तृत्व स्पर्धेत डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) ची विद्यार्थीनी कु. दीपाली विनोद सोनी (तृतीय वर्ष – कला) यांनी प्रथम पारितोषिक प्राप्त केले. वक्तृत्व स्पर्धेचा विषय ‘आणीबाणीचा काळ आणि संविधानाचे उल्लंघन’ असा होता. क्रीडा व युवक सेवा मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने दिनांक ९ ते १२ जानेवारी २०२६ रोजी, नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी त्यांची निवड झाली असून त्या देशाच्या राजधानीत…
सुप्रीम कॉलनीतील घटना, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल साईमत /जळगाव/प्रतिनिधी जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात किरकोळ कारणावरून रिक्षाचालकाला लाकडी धोपट्याने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (३ जानेवारी) दुपारी सुमारे २ वाजता घडली. या प्रकरणी रविवारी (४ जानेवारी) दुपारी १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सचिन राजू राठोड (वय ३२, रा. रायपूर फाटा, कुसुंबा, ता. जळगाव) हा आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतो. नेहमीप्रमाणे शनिवारी दुपारी तो सुप्रीम कॉलनी परिसरात रिक्षासह उभा असताना मोहित जयसिंग बागडे (रा. सिंधी कॉलनी, जळगाव) याने त्याच्याशी किरकोळ कारणावरून वाद घातला. वादाचे रूपांतर शिवीगाळ…
जनता कला व वाणिज्य महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त साईमत /मलकापूर/प्रतिनिधी प्रत्येक स्त्रीने आपल्यातील स्त्रीशक्ती ओळखून आत्मभानाने वागले पाहिजे. सावित्रीबाई फुले यांचे विचार केवळ स्मरणात न ठेवता ते आपल्या कृतीत उतरवले पाहिजेत, असे प्रतिपादन प्रा.शारदा खर्चे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.शारदा खर्चे होत्या. येथील जनता कला व वाणिज्य महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व वैचारिक विकासासाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा.डी.ए.डहाके व प्रा.ए.बी.बर्डे उपस्थित होते. स्पर्धेत “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन व कार्य” या विषयावर १२ विद्यार्थ्यांनी वक्तृत्व सादर केले.…
संघटीत गुन्हेगारीवर पोलिसांचा घाव, गुन्हेगारी विश्वात खळबळ साईमत /मलकापूर /प्रतिनिधी जिल्ह्यात वाढत चाललेल्या संघटीत गुन्हेगारीला आळा घालण्याच्या निर्धाराने बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठी व धडाकेबाज कारवाई करत मलकापूर येथील सतीश झाल्टे खून प्रकरणातील टोळीचा म्होरक्या संकेत सुनील उन्हाळे याच्यासह त्याच्या आठ साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मकोका) अंतर्गत कारवाईचे आदेश देण्यात आले. या निर्णयामुळे बुलढाणा जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्वात एकच खळबळ उडाली आहे. जळगाव (खां.) जिल्ह्यातील पिंप्राळा येथील सतीश गजानन झाल्टे या युवकाची किरकोळ कारणावरून चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येतील आरोपी टोळीवर यापूर्वीही खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी…
तार चोरीमुळे पिकांचे मोठे नुकसान; दोषींवर कठोर कारवाईची मागणी साईमत /मलकापूर /प्रतिनिधी: भालेगाव शिवारात अज्ञात व्यक्तींनी वीज तार चोरी केल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले. तार चोरीमुळे पिकांना वेळेवर पाणी मिळाले नाही आणि परिणामी उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संबंधित वीज विभागाकडून चोरीस गेलेली वीज तार पुन्हा बसवण्यात आली असली, तरी शेतकऱ्यांनी केलेले आर्थिक नुकसान भरून न निघणारे असल्याची भावना व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे भालेगाव परिसरातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडले असून, वारंवार होणाऱ्या तार चोरीमुळे शेती करणे अधिकच कठीण बनले आहे. पिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पाण्याचा पुरवठा खंडित झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शेतकऱ्यांनी केवळ वीज तार पुन्हा…
जळगावात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे येणार साईमत /जळगाव/प्रतिनिधी: जळगाव महापालिका निवडणुकीचा प्रचार आता पूर्ण गतीने सुरू होणार आहे. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ आज, रविवार, ४ जानेवारी रोजी पिंप्राळा येथील भवानी मंदिरापासून होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते मंदिरात नारळ फोडून या महायुती प्रचार अभियानाची औपचारिक सुरुवात केली जाणार आहे. भवानी मंदिरापासून सुरु होणाऱ्या प्रचार मोहिमेत स्थानिक कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे. आ. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम जिल्ह्यातील विविध भागांमध्ये रिंगणभर प्रसारित केली जाईल. याप्रसंगी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ जानेवारीला जळगावात येणार आहेत. आमदार सुरेश भोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार,…
१२ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; तस्करांमध्ये खळबळ साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी अवैध गुटखा तस्करीवर पोलिसांची धडक कारवाई आज सकाळी मुक्ताईनगरमध्ये पार पडली. मुक्ताईनगर पोलीस आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने १० ते १२ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. या कारवाईमुळे आंतरराज्य गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. सापळा रचला आणि कार थांबवली मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरकडून छत्रपती संभाजीनगरकडे मोठ्या प्रमाणात गुटखा वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली होती. यावरून मुक्ताईनगरजवळील खामखेडा पुलावर पहाटेपासून नाकाबंदी करण्यात आली. संशयास्पद वाटणारी ‘आर्टिका’ कार थांबवून झडती घेतली असता, गोण्यांमध्ये भरलेला प्रतिबंधित गुटखा सापडला. मोठा मुद्देमाल ताब्यात पोलिसांनी कारमधील गुटखा आणि वाहन ताब्यात घेतले. सध्या…
“तांबापूरातील दुर्दैवी अपघात; कुटुंबाचा आधार हरपला” साईमत /जळगाव/प्रतिनिधी: जळगाव शहरातील तांबापूरा परिसरात रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास एका धक्कादायक अपघातात सलीम चिरागोद्दीन खाटीक (वय ४५) यांचा मृत्यू झाला. घटनास्थळ बजरंग बोगद्याजवळील रेल्वे पटरीवर होते. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली असून, त्यांच्या कुटुंबीयांचे जीवन एका क्षणीच उदासीनतेत बुंधले आहे. सलीम खाटीक हे आपल्या कुटुंबासह तांबापूरा भागात वास्तव्य करत होते आणि चिकन व्यवसाय करून घर चालवत होते. रविवारी सकाळी धावत्या रेल्वेतून पडल्याने ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत केली, परंतु रेल्वे अपघाताच्या गंभीरतेमुळे त्यांचा मृत्यू घटनास्थळीच झाला. घटना समजताच रेल्वे पोलीस तसेच स्थानिक नागरिक घटनास्थळी धावले. पोलीसांनी पंचनामा करून…