होलागढ : भारताचा स्वातंत्र्य दिन नुकताच साजरा झाला. आपला तिरंगा ध्वज हा आपल्या देशाचा आणि प्रत्येक भारतीयाचा अभिमान आहे. मात्र याच तिरंग्याचा अपमान केल्याची घटना उत्तर प्रदेशातल्या प्रयागराजमध्ये घडली. एकीकडे स्वातंत्र्य दिवस साजरा होत होता आणि प्रयागराजमधल्या एका मदरशात तिरंग्यावर नाश्ता ठेवण्यात आला. या संदर्भातला फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई पोलिसांनी व्हायरल फोटोच्या आधारे मदरसा प्रमुखासह चार जणांच्या विरोधात राष्ट्रध्वजाच्या अपमानाचा गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रीय ध्वज अपमान प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांन्वये प्राथमिक तपास सुरु करण्यात आला आहे. ही घटना गौसिया इस्लामिया जिंतुल उलूम या मदराशात घडली आहे असं सांगितलं जातं आहे. होलागढ पोलीस…
Author: saimat
दिल्ली : दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या विस्तारा विमानात बॉम्ब असल्याची धमकी आज सकाळी मिळाली होती. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. सकाळी साडेसात वाजता प्रवाशांचे बोर्डिंग सुरू असताना बॉम्बची धमकी मिळाली होती. त्यामुळे प्रवाशांना तत्काळ दिल्ली विमानतळावर विमानातून बाहेर काढण्यात आले. “१८ ऑगस्ट २०२३ रोजी दिल्ली ते पुण्याला जाणारे विमान UK971 ला अनिवार्य सुरक्षा तपासणीमुळे उशीर झाला आहे. आम्ही यासाठी संबंधित सुरक्षा यंत्रणांना सहकार्य करत आहोत”, विस्ताराच्या प्रवक्त्याने एका निवेदनात ही माहिती दिली. दिल्ली विमानतळावरील आयसोलेशन बेमध्ये विमानाची तपासणी करण्यात येत आहे. सर्व प्रवासी आणि त्यांचे सामान विमानातून सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे. “आम्ही आमच्या ग्राहकांना अल्पोपहार दिला असून त्यांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न…
बेंगळुरू : टेलिग्रामच्या माध्यमातून धर्मांतरासाठी सेक्सटॉर्शन रॅकेट चालवणाऱ्या मुंबईतील एका मॉडेलला कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी मॉडेलने तिच्या काही साथीदारांसह टेलिग्रामवर काही लोकांना ‘हनी ट्रॅप’मध्ये फसवले. त्यानंतर त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्याची आणि खतना करण्याची धमकी देत मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. ही घटना बेंगळुरूमधील पुट्टेनहल्ली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. २० ते ५० वयोगटातील पीडितांना केले टार्गेट नेहा ऊर्फ मेहर, असे अटक केलेल्या मॉडेलचे नाव असून, प्राथमिक तपासात ती या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नेहा ऊर्फ मेहर टेलिग्रामवरून बेंगळुरूमधील २० ते ५० वयोगटातील अनेकांशी रोमँटिक संवाद साधायची. अशा प्रकारे ती तरुणांना ‘हनी ट्रॅप’मध्ये फसवून, त्यांना…
इंदूर : सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत बँकेचा एक सुरक्षा रक्षक गोळ्या झाडताना दिसतो आहे. ज्यानंतर एकच गोंधळ उडाल्याचंही दिसतं आहे. या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला. तर सहा जण जखमी झाले. गोळी चालवणाऱ्या सुरक्षा रक्षकाचा व्हिडीओ कुणीतरी मोबाईलवर चित्रित केला आणि व्हायरल केला. व्हायरल व्हिडीओत काय? व्हायरल व्हिडीओतल्या बँकेच्या सुरक्षा रक्षकाचं नाव राजपाल सिंह राजवत आहे असं समजतं आहे. इंदूर येथील खजराना भागातल्या कृष्ण बाग कॉलनी ११७ बी मध्ये दोन कुत्रे फिरवण्यावरुन वाद-विवाद झाला. त्यानंतर चिडलेल्या राजपाल राजवतने घरातल्या गॅलरीतून आपल्या बंदुकीतून गोळीबार केला. या गोळ्या लागल्याने विमला आचला आणि राहुल आमचा या दोघांचा…
मुंबई : कॅगच्या अहवालात मोदी सरकारच्या सात योजनांमधील भ्रष्टाचारावरून ताशेरे ओढण्यात आले. यानंतर विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली आहे. आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी कॅगच्या अहवालातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा काटा काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. ते शुक्रवारी (१८ ऑगस्ट) मुंबईत शरद पवारांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते. विजय वडेट्टीवार म्हणाले, “कॅगचा रिपोर्ट दोन गोष्टींसाठी महत्त्वाचा आहे. एक म्हणजे भाजपाच्या अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी कॅगच्या रिपोर्टचा वापर होत आहे. प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार होत असताना कॅगने केवळ गडकरींवर ताशेरे ओढले. यातून हे स्पष्ट होत आहे.” “कॅगच्या अहवालामागे…
साईमत पाचोरा प्रतिनिधी सद्यस्थितीत राज्यात शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे सरकार आहे. आता पळवाट न काढता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी अखिल भारतीय मराठा युवक महासंघाचे तालुकाध्यक्ष तथा मराठा सेवा संघाचे शहर कार्याध्यक्ष गणेश जनार्दन शिंदे हे गुरुवारी, १७ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजेपासून पाचोरा तहसील कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषणास बसले होते. अखेर सायंकाळी ४:४५ वाजता तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी उपोषणस्थळी येवून आपली मागणी शासनापर्यंत तात्काळ पोहचवू, असे आश्वासन दिल्यानंतर गणेश शिंदे यांनी उपोषण सोडले. उपोषणाला येथील सकल मराठा प्रतिष्ठान, मराठा सेवा संघ, अखिल भारतीय युवक मराठा महासंघ, पाचोरा तालुका पत्रकार संघ,…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी येथील गोदावरी नगरात अधिकमास समाप्तीनिमित्त कावड यात्रेचे आयोजन केले होते. यासाठी महिलांसह मुलांची सकाळपासूनच धावपळ सुरू होती. संपूर्ण गोदावरी नगरचा रस्ता रांगोळ्यांनी सजविला होता. परिसरातील सर्व मंडळींचा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कावड यात्रा फुलांनी सजवून गोसावी वकील यांच्या घरासमोरील महादेव मंदिरापासून तर सार्वजनिक उड्डाणजवळील दत्तात्रय महादेव मंदिरापर्यंत ‘हर हर महादेव जय भोले’ बाबाच्या जल्लोषात मिरवणूक निघाली. यावेळी तरुण, वृद्ध मंडळी सोबतच बालगोपालांची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. महादेव मंदिरात पूजा जलाभिषेक करण्यात आला. आरती झाल्यानंतर सर्व उपस्थित भाविकांना प्रसाद व केळी देण्यात आली. यशस्वीतेसाठी गोदावरी कॉलनीतील श्रीमती कासार, श्रीमती बळवीर यांनी परिश्रम घेतले.
मुक्ताईनगर : प्रतिनिधी शहरातील युनिक इंटरनॅशनल प्ले स्कूल येथे ७७ वा स्वातंत्र्य दिवस चिमुकल्यांनी अत्यंत उत्साहाने साजरा केला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार शेखर पाटील, तुषार वाघुळदे, शरद भालेराव, शाळेचे संस्थापक अध्यक्ष मासुळे, मुख्याध्यापिका जयश्री मासुळे, पंकज कपले यांच्यासह सर्व पालक, शिक्षिका उपस्थित होते. यावेळी शेखर पाटील, तुषार वाघुळदे यांनी पालकांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन प्रतीक्षा काटे यांनी केले.
मुक्ताईनगर : प्रतिनिधी परदेशातील शिक्षणाकरीता ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्याकडून मुक्ताईनगर येथील रहिवासी सनी निलेश बढे यांना एक लाखाचा धनादेश नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. सध्या बढे हा विद्यार्थी बारामतीतील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी महाविद्यालय येथे ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट येथे शिक्षण घेत आहे. जे नेदरलँड्समधील व्हॅन हॉल लॅरेन्स्टाईन विद्यापीठाशी संलग्नित आहे. पुढील दोन वर्षाच्या शिक्षणाकरीता तो रविवारी, २० ऑगस्ट रोजी नेदरलँडला रवाना होत आहे. सनीचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला असून त्याच्या कुटुंबीयांना शेतीची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. सनीचे आजोबा नेहमी शेती कामात व्यस्त असायचे. त्याला शेतात घेऊन जायचे. त्यामुळे त्याला कृषी शिक्षणाची आवड निर्माण…
सोयगाव : प्रतिनिधी गावातून येणारी आणि सोयगाववरून वरसाडा तांड्याकडे जाणाऱ्या दोन्ही मोटारसायकलची धडक होवून झालेल्या अपघातात निंबायती येथील चाळीस वर्षीय युवक गंभीर जखमी झाल्याची घटना सोयगाव-चाळीसगाव राज्यमार्गाला लागून असलेल्या निंबायती फाट्यावर गुरुवारी, १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. अपघाताची माहिती मिळताच सोयगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक हुसेन शेख यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. सविस्तर असे की, सोयगाव-चाळीसगाव राज्यमार्गावर लगतच निंबायती फाटा आहे. या फाट्यावरून गावातून निंबायती तांडा येथील प्रकाश उखा चव्हाण (वय ४०) हा मोटारसायकलने (क्र.एमएच-१५ सीपी-३९३२) सोयगावच्या दिशेने येत होता. सोयगावकडून येणाऱ्या मोटारसायकलवरील (क्र.एमएच-१९, डीजी-४२५४) लकी संतोष बडगुजर (वय २२) या दोघांची धडक होवून त्यात प्रकाश चव्हाण हा…