विदर्भात ऑरेंज अलर्ट, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन साईमत / मुंबई राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात झपाट्याने बदल होत असून त्याचे परिणाम आता स्पष्टपणे जाणवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने रविवारी, ५ एप्रिल रोजी राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण पट्ट्यातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांत दिवसभर उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे. मुंबईत कमाल तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान राहील, असा अंदाज आहे. दरम्यान, मराठवाड्यातील…
Author: saimat
मंजुषा हाउसिंग सोसायटीत चोरीची घटना; एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल, तपास सुरू साईमत /जळगाव / प्रतिनिधी शहरातील मध्यवर्ती भागात पुन्हा एकदा घरफोडीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंजुषा हाउसिंग सोसायटी परिसरातील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ५७ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रमोद नामदेव अटाळे (वय ५४, रा. नंदनवन कॉलनी, गणेश कॉलनी रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या वहिनी वंदना या मंजुषा हाउसिंग सोसायटीत वास्तव्यास आहेत. त्या दि. २५ मार्च ते ४ एप्रिल २०२६ या कालावधीत घराबाहेर असल्याने घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा…
“फोन आला म्हणून कोणी गुन्हेगार नाही” – महाजनांचा उघड आव्हान साईमत /जळगाव / प्रतिनिधी मंत्री गिरीश महाजन यांनी नुकतेच संजय राऊत, एकनाथ खडसे आणि इतर राजकीय नेत्यांवर आपले स्पष्ट मत व्यक्त केले आहे. महाजन म्हणाले, “संजय राऊतांनी माझ्याबद्दल एवढा पुळका का केला, ते मला कळत नाही. मी राज्यातच आहे, नाशिक किंवा जळगाव जिल्ह्यात शेतकऱ्यांना भेटतो आहे, बोलतो आहे.” महाजनांनी राऊत यांना सल्ला दिला की, “तुमचे संपर्कातील आमदार जास्तीत जास्त सांभाळून ठेवा. आपले आमदार आणि खासदार कसे टिकून राहतील, याकडे लक्ष द्यावे. तुमचा पक्ष सांभाळून ठेवा, आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत विजय कसा मिळेल याकडे विचार करा.” त्यांनी या विधानात स्पष्ट केले…
‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’ संकल्पनेतून मोहीम यशस्वी साईमत /जळगाव / प्रतिनिधी शहराच्या मध्यवर्ती बी.जे. मार्केटमध्ये गेल्या १५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्वच्छता, अतिक्रमण आणि पायाभूत सुविधा समस्यांवर महापौर दीपमाला काळे यांनी आक्रमक पाऊल उचलले आहे. ‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’ या संकल्पनेअंतर्गत गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांत विशेष स्वच्छता मोहीम राबवून मार्केट परिसराला नवजीवन दिले गेले आहे. महापौरांच्या आदेशानंतर आरोग्य विभागाने २ आणि ३ एप्रिल रोजी मार्केटमधील प्रसाधनगृहांची संपूर्ण स्वच्छता केली. तसेच, कर्तव्यपाळू ठेकेदारास ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. स्वच्छतेसोबतच अतिक्रमण निर्मूलन आणि पायाभूत सुविधा सुधारण्यावरही भर देण्यात आला. अतिक्रमण विभागाने अनधिकृत अडथळे हटवून परिसर मोकळा केला, तर…
पूर्वपट्टा हादरला; कांदा, गहू, हरभरा, टरबूज पिकांचे मोठे नुकसान साईमत /नंदुरबार/ प्रतिनिधी नंदुरबार शहर आणि तालुक्याच्या पूर्व भागाला २ एप्रिल २०२६ रोजी अवकाळी वादळी पाऊस आणि गारपीटाने जोरदार झोडपले. शहरात मंगल बाजार आणि कृषी बाजार समितीतील धान्य वाहून गेले, तर बाजार विक्रेत्यांची मोठी धावपळ सुरु राहिली. अनेक ठिकाणी झाडे पडली, विजेच्या तडाख्यांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली, तसेच उन्हाळ्यात तडाखापासून काही काळ दिलासा मिळाला तरी अवकाळी पावसामुळे नागरिक हैराण झाले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ३० व ३१ मार्च रोजी पूर्वीच्या पावसामुळे नंदुरबार तालुक्याच्या पूर्वपट्ट्यात गारपीट झाली होती. काही मिनिटांच्या या तडाख्यात कांदा, गहू, हरभरा आणि टरबूज यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान…
साईमत / जळगाव जिल्ह्यातील हवामानात एप्रिलमध्ये अनपेक्षित बदल झाला आहे. कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर अचानक पाऊस आणि दमट हवामान निर्माण झाल्याने नागरिकांचे आरोग्य डळमळीत झाले आहे. त्याचा थेट परिणाम रुग्णसंख्येवर दिसून येत असून शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णालये पूर्णपणे हाऊसफुल्ल झालेली आहेत. सध्या ताप, सर्दी, खोकला, उलट्या-जुलाब, अंगदुखी, त्वचारोग आणि श्वसनासंबंधी तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आर्द्रतेमुळे विषाणू आणि जीवाणूंना पोषक वातावरण मिळाले असून संसर्गजन्य आजारांचा फैलाव जलद होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रांवर रुग्णांची गर्दी वाढली असून औषधांचा तुटवडा आणि डॉक्टरांची कमतरता जाणवत आहे. आरोग्य विभागाने गावोगावी आरोग्य शिबिरे आणि जनजागृती मोहिमा राबवल्या आहेत. नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून…
साईमत / नवी दिल्ली आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेच्या उपनेते पदावरून हटवण्यात आले आहे. राघव यांची जागा पंजाबमधून अशोक मित्तल यांनी घेतली आहे. या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे, तसेच माजी मुख्यमंत्री व वरिष्ठ नेते आतिशी यांनी यावर टीका केली आहे. आतिशी म्हणाल्या, “भाजपची पद्धत अशी आहे की, आधी नेत्यांना घाबरवतात, नंतर धमकी देतात आणि काही वेळानंतर आमिष देतात. विरोधी पक्षातील अनेक नेते घाबरून भाजपमध्ये प्रवेश करतात. आता राघव देखील यासाठी तयार असू शकतात.” आतिशी यांनी पुढे आरोप केला की, “देश सध्या संकटातून जात आहे. लोकशाहीवर हल्ला होतोय. दिल्लीत मतदारांची नावे कमी केली जात आहेत,…
मध्यपूर्वेतील संघर्षामुळे आणि डॉलरच्या वाढत्या किमतीमुळे जळगाव बाजारात सोनं-चांदीचे दर घसरणीकडे साईमत / जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरु आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा मोठा उलटफेर नोंदवला गेला. मध्यपूर्वेतील अमेरिका, इस्रायल–इराण संघर्षामुळे जागतिक आर्थिक बाजारपेठेत अस्थिरता वाढली असून त्याचा थेट परिणाम मौल्यवान धातूंवर दिसून येत आहे. तज्ज्ञांच्या मते, सुरुवातीला युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याची मागणी वाढली होती. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर पुढील दोन–तीन आठवड्यांत कारवाईचा इशारा दिल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या. त्याचबरोबर डॉलरमध्ये ०.५ टक्क्यांची मजबुती आल्यामुळे सोन्यासारख्या धातूंवर दबाव निर्माण झाला आहे. जळगाव बाजारात बुधवारी सोन्याचे दर प्रति १०…
कौटुंबिक वादातून टोकाचे पाऊल; मंचरमध्ये खळबळजनक घटना साईमत / पुणे जिल्ह्यातील मंचर (ता. आंबेगाव) येथे एका महिलेने अत्यंत धक्कादायक कृत्य केल्याची घटना उघडकीस आली असून, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वादातून संतप्त झालेल्या आईने स्वतःच्या १४ वर्षीय मुलीचा गळा दाबून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केला. मुलगी मृत झाल्याचा समज करून घेतल्यानंतर तिने सहा वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन विहिरीत उडी मारत आत्महत्येचाही प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. ३ एप्रिल) सकाळी सुमारे सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास तपनेश्वर स्मशानभूमीजवळ घडली. नेहाल आशिष बाणखेले (वय ६) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव असून, परिज्ञा बाणखेले (वय १४) व हर्षदा बाणखेले या…
साईमत / दिल्ली देशाची राजधानी दिल्लीमध्ये केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने मोठी कारवाई करत दोन वेगवेगळ्या लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये चार सरकारी अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक केली आहे. या कारवाईमुळे महानगरपालिका आणि पुरातत्व विभागातील कथित भ्रष्टाचार उघडकीस आला असून शहरात खळबळ उडाली आहे. पहिल्या प्रकरणात, ३१ मार्च रोजी दिल्ली महानगरपालिकेच्या शाहदरा उत्तर विभागातील एका अधिकाऱ्याविरोधात तक्रार दाखल झाली होती. तक्रारदाराचे नुकतेच नूतनीकरण केलेले घर पाडू नये यासाठी संबंधित अधिकाऱ्याने ८०,००० रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता. या तक्रारीची दखल घेत सीबीआयने १ एप्रिल रोजी सापळा रचत संबंधित अधिकारी आणि त्याच्या शिपायाला लाच घेताना रंगेहाथ पकडले. दुसऱ्या प्रकरणात, ३० मार्च रोजी जंतर मंतर उप-मंडळात कार्यरत भारतीय…