फैजपूर, ता. यावल : वार्ताहर येथील प्रा. चेतन वसंत चौधरी यांना ‘कॉम्प्युटर सायन्स ॲण्ड इंजिनिअरिंग’ शाखेत पी.एचडी. मिळाली. त्यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यापीठात “प्रतिमा प्रक्रिया वापरून विविध परिस्थितीमध्ये पृष्ठभाग दोष शोधणे” या विषयावर शोधनिबंध सादर केला. शोधनिबंध सादर करण्यासाठी डॉ. रवींद्र कुमार गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. डॉ. चेतन चौधरी हे व्ही.डी.चौधरी (सेवानिवृत शिक्षक आदर्श विद्यालय, दहिगाव) याचे चिरंजीव तर गिरीजा हॉस्पिटलचे डॉ. निलेश चौधरी (भुसावळ) यांचे लहान बंधू आहेत.
Author: saimat
नवीदिल्ली ः मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे दर गगनाला भीडत आहेत. आता काही प्रमाणात दर उतरले आहेत मात्र मधल्या काळात टोमॅटोचा दर २५० ते ३०० रुपये प्रतिकिलो इतका होता. त्यामुळे टोमॅटो खाणे सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याच्या बाहेर गेले होते. यावरून देशभर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. वाढत्या महागाईविरोधात आंदोलनेही झाली. दरम्यान, एका हिंदी वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने टोमॅटोच्या वाढत्या दराबाबत प्रश्न विचारला असता केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अजब प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा टोमॅटोचा दर २५० ते ३०० रुपये प्रतिकिलो इतका झाला तेव्हा तुमच्या घरात यावर चर्चा होत होती का? असा प्रश्न विचारला असता स्मृती इराणी यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी टिव्ही पत्रकार सुधीर चौधरींना प्रतिप्रश्न…
मुंबई ः प्रतिनिधी ‘आई कुठे काय करते’ या छोट्या पडद्यावरील मालिकेच्या माध्यमांतून अभिनेत्री राधा सागर घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेत राधाने ‘अंकिता’ हे पात्र साकारले होते. आता अभिनेत्री खऱ्या आयुष्यतही आई होणार आहे. तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. राधाने लग्नाच्या १० वर्षानंतर आई होण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. या वेळी राधाने गर्भधारणा, पती आणि कुटुंबाकडून मिळणारा पाठिंबा याबद्दल बरेच काही सांगितले. राधा सागर गरोदरपणाबद्दल सांगताना म्हणाली, सध्या माझ्या गरोदरपणाचा शेवटचा आठवडा सुरु आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आमच्या घरी नवा पाहुणा येण्याची शक्यता आहे. पहिल्या दिवसापासून मी…
लातूर : विविध जिल्ह्यांतील ग्राम पंचायती आता गावकऱ्यांच्या प्रश्नावर जागृक झालेल्या पाहायला मिळत आहेत. ग्रामसभेमध्ये किरकोळ कारणावरुन वाद घालण्यापेक्षा गावकऱ्यांच्या मूळ प्रश्नांना हात घातला जात आहे. असाच एक निर्णय लातूरच्या यरोळ ग्रामपंचायतीने घेतला होता. आई-वडिलांचा काळजी न घेणाऱ्या, त्यांना त्रास देणाऱ्या मुलांना यामुळे मोठी चपराक बसली आहे. अशा मुलांविरुद्ध कारवाईचा निर्णय एकमताने घेण्यात आला. याआआधी कोल्हापूरच्या माणगाव ग्रामपंचायतीने असा निर्णय घेतला होता. आता यरोळ ग्रामपंचायतीने हा स्तुत्य असा निर्णय घेतला आहे. अलिकडच्या काळात आई-वडिलांचा सांभाळ करण्यास टाळाटाळ करणारे मुलं-मुली अनेकदा तुम्ही पाहीली असतील. अशा मुला-मुलीला चाप बसवणारा आदेश लातूर जिल्ह्यातील ग्रामपंचायतीनं काढला आहे. आई वडिलांनाचा सांभाळ जर कोणी करत नसेल…
मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच केलेल्या भाषणातून मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक आणि कोकणातील रस्त्यांचा प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर आता मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेकडून रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘जागर यात्रा’ काढली जाणार आहे. यावरून अभिनेत्री व शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी टीका केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी टोलनाके आणि गाड्या फोडण्यापेक्षा खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घ्यावी, असा खोचक सल्ला दीपाली सय्यद यांनी दिला. दीपाली सय्यद यांच्या वक्तव्याची मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खिल्ली उडवली आहे.दीपाली सय्यद यांच्याबाबत प्रश्न विचारताच संदीप देशपांडे म्हणाले, “आहो सोडा ओ कोण दीपाली सय्यद? कोण विचारतंय तिला? त्या नेमक्या…
मुंबई ः प्रतिनिधी ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका सुरू झाली आहे. या टीकेनंतर छगन भुजबळ आज (२० ऑगस्ट) स्पष्टीकरण देण्यासाठी प्रसारमाध्यमांसमोर आले. यावेळी कुठल्याही समजाचा अपमान करण्याचा माझा हेतू नाही असे भुजबळ म्हणाले. तसेच त्यांनी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर टीकास्त्र सोडले तसेच काही प्रश्नही उपस्थित केले. महापुरुषांविषयी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांना अटक झाल्याशिवाय ते सरळ होणार नाहीत. भिडे यांना कोणीही पाठीशी घालू नये. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास महाराष्ट्रात गोंधळ होईल,असा इशारा छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी दिला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी भिडे यांच्याबद्दल वक्तव्य…
मुंबई : प्रतिनिधी दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी केली होती मात्र नियम व तांत्रिक बाबींमुळे हे अशक्य असल्याने प्रशासनाने विरोध केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेची वर्षभरात अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. दहीहंडी उत्सवात तरुणांचा मोठा सहभाग असतो. ते एक-दोन महिने आधी त्याचा सराव करीत असतात. दहीहंडीचा प्रसार होऊन हा खेळ म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत लोकप्रिय व्हावा, यासाठी त्याला खेळाचा दर्जा देण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे शिंदे यांनी १८ ऑगस्ट २०२२ रोजी दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्याची घोषणा केली होती मात्र खेळाचा दर्जा मिळण्यासाठी अनेक निकष असतात. तो खेळ वर्षभर खेळला जाणे आणि तो खेळ खेळणाऱ्यांची…
परभणी ः परभणीचे शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय जाधव यांनी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली आहे. निधीबाबत तानाजी सावंत कोणालाही विश्वासात घेत नाही. पैसे दिल्यावरच निधी दिला जातो, असा गंभीर आरोप संजय जाधव यांनी केला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. संजय जाधव पुढे म्हणाले की, “परभणी जिल्ह्याच्या निधीबाबत पालकमंत्री तानाजी सावंत कोणालाही विश्वासात घेत नाहीत. गेल्यावर्षीचा एक दमडीही निधी मिळाला नाही. कररुपातून उभा राहिलेला तो निधी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसल्याने निधीचे मालक पालकमंत्री झाले आहेत.ते कोणालाच मोजायला तयार नाहीत.पैसे दिले, तरच निधी दिला जातो, अशी परिस्थिती जिल्ह्यात सुरु आहे. “जे शिंदे…
नागपूर : राज्यात तलाठी भरतीची पहिल्या टप्प्यातील परीक्षा सुरू आहे. यात पेपरफूट झाल्याचा दावा माध्यमांनी केला तर पेपरफूट झालीच नाही, असे महसूल विभागाने स्पष्ट केले मात्र या प्रकरणात नाशिकमध्ये पकडलेल्या उमेदवारांकडे प्रश्नपत्रिका सापडल्या आहेत. त्याचा अर्थ काय? असा सवाल केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. रोहित पवार यांनी ट्विटरवर सांगितले की, “तलाठी भरतीच्या पहिल्याच दिवशी नागपूर आणि नाशिकमध्ये पेपर फुटल्याच्या घटना समोर आल्या.नोकरीच्या अपेक्षेने सामान्य कुटुंबातील मुले-मुली मोठ्या मेहनतीने अभ्यास करतात परंतु शासनाच्या निष्काळजीपणामुळे पेपरफूट होते आणि या सर्व युवा वर्गाच्या स्वप्नांवर पाणी फिरवले जाते.वन विभागाच्या परीक्षांचे पेपर फुटल्यावर…
पुणे : पुण्याच्या शिक्रापूर परिसरात दोन मुलींनी एका ज्येष्ठ महिलेला निर्दयीपणे मारहाण केल्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.पोलिसांनी याप्रकरणी दोन्ही तरुणींविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु केला आहे. दरम्यान, वृद्ध महिलेच्या अंगावर बसून तरुणीने तिला मारहाण केल्याचे व्हिडीओमधून समोर आले आहे. प्राप्त माहितीनुसार, मारहाण करणाऱ्या दोन बहिणी असून त्यांना त्यांची आईदेखील यामध्ये साथ देताना दिसत आहे तर मारहाण झालेली वृद्ध महिला ही शेजारी राहत असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये दोन मुली आणि त्याच्या आई विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात…