भोपाळ ः सातवीत शिकणाऱ्या एका १३ वर्षांच्या मुलावर शाळेच्या हॉस्टेलमध्ये बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यात ही घटना घडली आहे. गंभीर बाब म्हणजे हा प्रकार उघड झाल्यानंतर तक्रार करण्यासाठी शाळेत आलेल्या मुलाच्या पालकांना भेटायलाही शाळेच्या मुख्याध्यापकांनी नकार दिला. अखेर पालकांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर विकृत शिपायाला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी केली जात आहे. सतना जिल्ह्यातल्या सरस्वती विद्यापीठ उच्च माध्यमिक निवासी विद्यालयात ही गंभीर घटना घडली. शाळेचा ४३ वर्षीय शिपाई रवींद्र सेन याने शाळेतल्या एका सातवीत शिकणाऱ्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघड झाल्यानंतर परिसरात आणि शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.पोलिसांनी…
Author: saimat
अमरावती : गेल्या नऊ वर्षांच्या भाजपा सरकारच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील कामगिरी पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचेही लवकरच मतपरिवर्तन होईल आणि ते खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह मोदींच्या नेतृत्वाला मदत करतील, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला. बावनमुळे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाचा विचार घेऊन भाजपाला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनीदेखील नरेद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे समर्थन करून २१ व्या शतकातील समर्थ भारत निर्माण करण्याची क्षमता केवळ मोदींमध्येच आहे, असे स्पष्ट केले आहे. अनेक राजकीय पक्षातील नेते मोदींच्या नेतृत्वावर विश्वास प्रकट करीत आहेत. त्यामुळे शरद पवार यांचेही मतपरिवर्तन होणार आहे. इंडिया…
मुंबई ः प्रतिनिधी राज्यात भाजपाबरोबर आपण तडजोड (पॅचअप) करू शकलो असतो, पण ते आपल्या नीतिमत्तेत बसणारे नाही, असे विधान शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. मी मुख्यमंत्री असताना फुटलेल्या सर्व आमदारांना एका खोलीत डांबून ठेवू शकलो असतो, पण ते अगोदरच मनाने फुटले होते,त्यांना खोलीत डांबून ठेवण्यात काय अर्थ होता,असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. माजी नगरसेवकांच्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. “जुने निष्ठावंत जेव्हा पक्ष सोडून जातात तेव्हा खूप वाईट वाटते. तुमच्यापैकी कोणाला आजही पक्ष सोडून जावेसे वाटत असेल तर खुशाल जा,” असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना दिला. “ज्या निष्ठावंत सैनिकांनी गेली अनेक वर्षे…
कोल्हापूर : कोल्हापुरातील चंदगडमधील कानूर खुर्दपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या धनगरवाड्यावर पल्लवी भागोजी झोरे या महिलेला सोमवारी रात्री बाराच्या सुमारास प्रसुतीकळा सुरू झाल्या. त्यानंतर यशवंत क्रांतीचे संघटनेचे कोडीबा येडगे, चिचू येडगे, कविता येडगे, जयश्री झोरे, पती भागोजी झोरे, कोडिबा झोरे आणि धोंडूबाई झोरे यांनी वेळ न दवडता चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधला. पण, धनगरवाड्यापासून मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचण्यास पक्का रस्ताच नसल्यामुळे रुग्णवाहिका पोहोचू शकत नव्हती. त्यामुळे पल्लवीला घेऊन मुख्य रस्त्यावर या असे रुग्णवाहिकेच्या चालकाने सांगितले. यांनतर तिला घोंगड्याच्या झोळीत घालून बॅटरीच्या उजेडात चार किलोमीटर जंगलातून पायपीट करून मुख्य रस्ता गाठला. मुख्य रस्त्यावर असलेल्या रुग्णवाहिकेतून पल्लवीला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.…
मुंबई ः कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत नुकतीच उमराहला जात असताना पापाराझीसोबत दिसली. मक्का येथील पवित्र मशिदी अल-हरम येथे मुस्लिमांद्वारे केलेली तीर्थयात्रा तिथे असते.जेव्हा शटरबग्सने तिला तिचा माजी पती आदिल खान दुर्रानी सोबत सुरू असलेल्या कायदेशीर लढाईबद्दल बोलण्यास सांगितले तेव्हा तिने त्याच्यावर आणि त्याची मैत्रीण राजश्रीवर तिचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक केल्याचा आरोप केला. दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेले राखी सावंतचे इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाले आहे.ती म्हणाली की, माझ्याकडे अक्सेस नाही. आदिल आणि राजश्रीने माझे अकाउंट हॅक केले आहे, ते मला जेवू देत नाहीत आणि झोपू देत नाहीत. मी घरी जातो आणि ते माझा छळ करतात. राखी सावंतचे इन्स्टाग्राम हॅक राजश्रीने राखीविरुद्ध…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून गावात डेंग्यू विरोधी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. किनगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.मनीषा महाजन, तालुका आरोग्य पर्यवेक्षक विजय नेमाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत उपकेंद्र किनगाव बुद्रुक, किनगाव खुर्द व डांभुर्णी येथे अति संवेदनशील भागात डेंग्यू विरोधी मोहीम सुरू केली आहे. मोहिमद्वारे गावात डेंग्यूू ताप रुग्ण सर्वेक्षण, कंटेनर सर्वेक्षण, हस्तपत्रिका वाटण्यासह गाव पातळीवर डेंग्यू तापाची लक्षणे, उपचार, डेंग्यू ताप प्रतिरोधक उपाययोजनाबद्दल माहिती ग्रामीण पातळीवरील नागरिकांना देण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी आपापल्या घरातील पाणीसाठे झाकून ठेवणे, घरासमोरील नाल्या वाहत्या करणे, खिडक्यांना जाळ्या बसविणे, शौचालयाच्या वेंट पाईपला जाळी बसविणे, घरासमोर पाणी साचू न देणे,…
सोयगाव : प्रतिनिधी तालुक्यातील तिडका आणि वाडी या दोन गावात गुरुवारी चार तास रेस्क्यू मोहीम राबवून चार सर्पमित्रांनी एक भला मोठा अजगर आणि एक मण्यार जातीचा साप पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे. वाडी गावात रंगनाथ जंजाळ यांच्या केळीच्या बागेत दबा धरून बसलेला दहा फुटांचा अजगर पकडण्यासाठी सर्पमित्र सलमान पठान, ज्ञानेश्वर जाधव, रवि राठोड़, मोहन चौधरी, रितेश चव्हाण अशा पाच जणांनी तीन तास रेस्क्यू मोहीम हाती घेत अजगरला पकडले. त्याला वाडीच्या जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. त्यानंतर सर्पमित्रांना तिडका गावात मनोज तडवी यांच्या घरात भिंतीत मण्यार साप असल्याचे कळाले. त्यानंतर सलमान तडवी आणि ज्ञानेश्वर जाधव यांनी तिडका गाव गाठून एक…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात गांजाचा नशा करणाऱ्या तरूणावर कारवाई केल्याची घटना बुधवारी, २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. याप्रकरणी रात्री उशीरा भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरात शेख अन्वर शेख अकबर (वय ३२, रा. आगाखान वाडा, भुसावळ) हा बेकायदेशीर गांजाचा नशा करत असल्याची गोपनिय माहिती भुसावळ शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी २३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजता गांजाचा नशा करणाऱ्या शेख अन्वर याच्यावर कारवाई केली. त्याच्याकडून गांजा ओढण्याचे साहित्य हस्तगत केले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल शैलेंद्र बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शेख अन्वर शेख अकबर…
रावेर : प्रतिनिधी एकाच रात्री तीन वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. रावेर तालुक्यात पाल-खरोदा दरम्यान दोन ४०७ गाड्यांवर तर रावेर शहरात एका ट्रॅक्टर-ट्रॉलीवर अवैध वाळू वाहतूक करतांना महसूल विभागाने धडक कारवाई केली आहे. तहसीलदार बंडू कापसे, निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यरात्री वेगवेगळे पथक तयार करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांविरुध्द धडक मोहीम राबविण्यात आली. त्यात पाल-खिरोदा दरम्यान एमएच १० एक्यू ५५०० नंबरची ४०७ पिकअप, एमएच २० सियु ०२७९ ४०७ पिकअप दोन्ही गाड्यांमध्ये वाळू भरलेली होती. एमएच २८ डी ११४५ नंबरचे ट्रॅक्टर-ट्रॉली डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात पकडण्यात आले. महसूल पथकाने…
मलकापूर : प्रतिनिधी मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी, डीपी पथकाचे प्रमुख स.पो.नी. करुणाशील तायडे, स.पो.नी. लेडीज सिंघम स्मिता महसाये, पो.नि. सुरेश रोकडे, आसिफ शेख, संतोष कुमावत, प्रमोद राठोड, आनंद माने, ईश्वर वाघ, पंजाबराव शेळके, गोपाल तारूडकर, गोपाल इंगळे, मंगेश चारखे, प्रवीण गवई, राहुल वाघ, मुळे, एल.पी.सी. प्रियांका डहाके, निता वाढे यांनी विविध दाखल गुन्ह्यांचा यशस्वी तपास लावून उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन महानिरीक्षकांनी सन्मानित केले. यावेळी बुलढाणा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बीबी महामुनी, खामगाव अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, पाचही विभागाचे विभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी सर्वांचे कौतुक केले आहे.