Author: saimat

सावंतवाडी : पर्वरी गोवा येथील फ्लॅटवर एका युवतीचा खून करून मृतदेह आंबोली घाटात फेकून देण्यात आला होता. आज सावंतवाडी आणि गोवा पोलिसांच्या पुढाकाराने सुमारे ७० फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. या स्त्री जातीच्या मृतदेहाचा एक हात व पाय आढळून आला नसल्याचे शोध पथक व पोलिसांनी म्हटले आहे. या प्रकरणी गोवा पोलिसांनी दोघा संशयितांना घटनास्थळी आणले होते. त्यांनी दाखविलेल्या अंदाजाने सावंतवाडी पोलीस व आंबोलीच्या रेक्सु टीम ने शोध घेत मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. प्रेयसीने पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून म्हापसा येथील कामाशी शंकर उडपनव (२८) युवतीचा प्रियकराने खून करून तिचा मृतदेह आंबोली घाटात फेकल्याचा प्रकार गोवा पोलिसांच्या तपासात शुक्रवारी…

Read More

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जवर प्रतिक्रिया दिली आहे. “जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात काल मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांकडून लाठीमार झाला आणि गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबारही झाला. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि मी याचा निषेध नोंदवतो,” असे मत राज ठाकरेंनी व्यक्त केले तसेच इथं सरकार चुकले हे निश्चित, असे म्हणत शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर हल्लाबोल केला. राज ठाकरे म्हणाले, “या घटनेवर मी कालपासून लक्ष ठेवून आहे आणि या घटनेवर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहत होतो. मुळात मराठा समाजाने आरक्षणासाठी जी आंदोलने केली,…

Read More

मुंबई ः प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे नेते हिंदुत्वाच्या मुद्यावर सातत्याने शिवसेनेच्या ठाकरे गटाला आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत असतात. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसशी युती करून बाळासाहेबांचे (शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे) हिंदुत्व सोडले अशी टीका त्यांच्यावर होत असते. या टीकेला उद्धव ठाकरे यांनी आज उत्तर दिले. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमात केलेल्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, परवा पत्रकार परिषदेत मला एकाने प्रश्न विचारला त्यावर मी उत्तर दिले की, आमच्याकडे (इंडिया आघाडी) पंतप्रधानपदासाठी अनेक चेहरे आहेत, महिला आहेत, शिक्षण आणि वयोमानानुसार वेगवेगळे पर्याय आहेत…

Read More

कोल्हापूर : कोल्हापूरातील शिरोलीमध्ये एका अल्पवयीन प्रेमी युगालाने सोशल मीडियावर स्टेटस ठेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोघांच्या घरातून प्रेमाला विरोध होत असल्याने प्रेमी युगुलाने नायलॉनच्या दोरीने गळफास घेवून जीवन संपवले. त्यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी सीपीआर रुग्णालयात आणले असून नातेवाईकांची रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणत गर्दी झाली आहे. ज्याच्यावर प्रेम करता, त्याच्यासोबत मरायला ही तयार व्हा, अन्यथा प्रेम करू नका. प्रेम करताना जात धर्म बघू नका, अशा प्रकारचा स्टेटस ठेवत कोल्हापुरातील शिरोली पुलाची येथील राहणाऱ्या एका अल्पवयीन जोडप्याने आपले जीवन संपवले असून आत्महत्या केलेला तरुण हा मुस्लिम तर युवती ही हिंदू समाजातील आहे. आत्महत्या…

Read More

पुणे ः हौसिंग प्रोजेक्टवेळी बहुतांश नागरिकांना बिल्डरच्या त्रासाला सामोरे जावे लागते.वारंवार तक्रार करुन ही बिल्डरवर कारवाई होत नाही. त्यामुळे घर मालकांचे पैसे बुडाल्याचे अनेक प्रकार समोर येत असतात. दरम्यान पुण्यातील एका घटनेत ग्राहकांचे पैसे बुडवणाऱ्या बिल्डरना दणका देण्यात आला आहे.जिल्हा प्रशासनाकडून बिल्डरविरोधात ही कठोर कारवाई करण्यात आली आहे. या घटनेत बिल्डरकडून तीस कोटींची वसुली करण्यात आली आहे. रेरा कायद्यामुळे हौसिंग प्रकल्पातील घर मालकांना हा दिलासा मिळत असल्याचे सांगितले जात आहे. अनेक बिल्डर घराचे खूप मोठमोठे स्वप्न दाखवतात. पण प्रत्यक्षात तसे काहीच होत नाही.घरांचे प्रकल्प वेळेत पूर्ण न झाल्याने ग्राहक हवालदिल होतात. पुण्यातील एका घटनेत बिल्डरांकडे अडकलेले तीस कोटी रुपये जिल्हा…

Read More

मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘इंडिया’च्या तिसऱ्या बैठकीनंतर केंद्र सरकार विचलित झाले आहे. यामुळेच एक देश, एक निवडणूक हा प्रयोग राबवण्याचा विचार आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी विजय वडेट्टीवार म्हणाले की, “‘इंडिया’च्या तिसऱ्या बैठकीनंतर केंद्रातील सरकार विचलित झाले आहे. ‘एक देश, एक निवडणूक’साठी केंद्र सरकारला बहुमताचा आकडा गाठणे शक्य आहे का? सध्या १२ राज्यातील मुख्यमंत्री विरोधी पक्षांचे आहेत. अशा स्थितीत त्यांच्याशी चर्चा करणे आणि बहुमताचा आकडा गाठणे सरकारला शक्य आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखालील समितीला यावर…

Read More

पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरण्यात आला आहे मात्र उच्च शिक्षणात विद्यापीठांकडून विविध विद्याशाखांतील पाठ्यपुस्तकांचे मराठीत भाषांतर करण्याबाबत काहीच हालचाली करण्यात आल्या नसल्याचे समोर आले आहे त्यामुळे आता विद्यापीठांना सर्व पाठ्यपुस्तकांचे मराठीत भाषांतर करण्यासाठी सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी या संदर्भातील निर्देश परिपत्रकाद्वारे दिले.राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण मिळण्यासाठी अनुषंगाने राज्यातील तंत्रनिकेतनांमध्ये मराठीतून अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच अभियांत्रिकी विद्याशाखेची पाठ्यपुस्तके मराठीत करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ स्तरावरील इंग्रजी भाषेत असलेली पाठ्यपुस्तके मराठीतून उपलब्ध करण्याबाबत झालेल्या…

Read More

मुंबई ः प्रतिनिधी दिड वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गट वेगळा झाला आणि उद्धव ठाकरेंचे सरकार कोसळले. तेव्हापासून शिंदे गट व ठाकरे गट यांच्यात सातत्याने आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे व टोलेबाजीचे राजकारण रंगताना पाहायला मिळत आहे. मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये सध्या इंडिया आघाडीची बैठक चालू आहे.या बैठकीवरून शिंदे गटाच मंत्री दीपक केसरकर यांनी खोचक शब्दांत टीका केल्यानंतर त्यावरून आता ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे तसेच त्यांनी अजित पवारांचाही उल्लेख केला आहे. काय म्हणाले होते केसरकर? इंडिया आघाडीच्या निमित्ताने शिवसेनेवर टीका करणाऱ्या काँग्रेससोबत सध्या ठाकरे गट बसल्याचा मुद्दा उपस्थित करत दीपक केसरकरांनी टीका केली होती. “बाळासाहेबांच्या मुंबईत चालू असलेली लाचारी…

Read More

यावल : प्रतिनिधी कोणतीही अधिकृत पदवी नसताना यावल तालुक्यात बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी यावल तालुक्यातील वैद्यकीय व्यावसायिकांनी यावल तहसीलदार आणि यावल गटविकास अधिकाऱ्यांना गुरुवारी, ३१ ऑगस्ट रोजी निवेदन दिले. गेल्यावर्षी २१ जून २०२२ रोजी तालुक्यात बनावट वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध अर्ज दाखल केला होता. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. कार्यवाही करण्यात आली असती तर कोरपावली येथील घटना घडली नसती. विशेष म्हणजे अद्याप गेल्या दोन दिवसात कोरपावली येथील घटनेचा गुन्हा नोंद झालेला नाही. कार्यालयाअंतर्गत गुन्हा नोंद व्हावी व इतर बनावट डॉक्टरांवर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, असे नमूद केले आहे. निवेदन देतेवेळी यावल व तालुक्यातील…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील बामणोद येथील महिला मंडळ अधिकारी तथा सर्कल यांची साकळी, शिरसाड परिसरात वाळूसाठा देखरेखसाठी पर्यवेक्षक म्हणून नेमणूक केली होती. त्याठिकाणी त्या जात असताना रस्त्यात एक वाळू तस्कर ट्रॅक्टरसह ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये अवैध वाळू वाहतूक करीत असताना आढळून आला. त्यामुळे त्यांनी त्याला थांबवून विचारपूस केली. वाळू वाहतुकीचा परवाना आहे किंवा नाही, याबाबतची माहिती त्याच्याकडून घेत असताना वाळू तस्कराने मंडळ अधिकारी तथा सर्कल बबीता चौधरी यांना दमदाटी व शिवीगाळ करून ढकलून दिले. तसेच वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीसह पलायन केले. साकळी मंडळात वाळू तस्कराकडून मंडळ अधिकाऱ्यांवर हल्ला करण्याची ही तालुक्यातील दुसरी घटना घडली आहे. त्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी शासकीय कामे कसे करावे?…

Read More