भाविकांनी केली मरीमातेच्या दर्शनासाठी गर्दी
साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी
येथील ग्रामदैवत मरीमातेच्या बारागाड्या उत्सवात चिमुकल्यांसह भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आनंद घेतला. शुक्रवारी सायंकाळी बाराखड्या उत्सवाचे आयोजन केले होते. सुरुवातीला मरीमातेचे पूजन करण्यात आले. वाघूर नदीच्या तीरावर ग्रामदैवत मरीमाता देवीचे मंदिर आहे. येथे नवरात्रनिमित्त विद्युत रोषणाई केली होती. तसेच भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केली होती.
यशस्वीतेसाठी मरीमाता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्रावण कुमावत, भगत भागवत भडांगे, दिनकर पवार, राजाराम पवार, धनराज पवार, संतोष पवार, मधुकर पवार, भानुदास जाधव, मयूर करंकार, बंडू चौधरी, शेषराव पाटील, सचिन कुमावत, पुंडलिक कुमावत, संतोष पवार, धनराज गोरे, भिकन कुमावत, रवी पाटील, रतिलाल कुमावत, अमृत कुमावत, मुरलीधर चौधरी, समाधान शिंदे, ज्ञानेश्वर बावस्कर, सुनील बावस्कर यांच्यासह भाविकांचे सहकार्य लाभले. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.