सोशल मीडियाच्या काळात अगदी घरगुती कामांना पण ग्लॅमरस लुक आल्यामुळे अनेकजण जेवण बनवण्याकडे आपला मोर्चा वळवतात. यापैकी काहींना खरोखरच जेवण बनवायची आवड सुद्धा असते पण जेवण बनवणं म्हणजे फक्त वेगवेगळ्या पद्धतीने फोडण्या देणं नाही. स्वयंपाकासाठी पूर्वतयारी ज्या व्यक्तीला वेगाने करता येते ती व्यक्ती खरी मास्टरशेफ म्हणता येईल. सुदैवाने हल्ली सोशल मीडियावर अशा अनेक सुगरणी सुद्धा आहेत ज्यांनी इतरांचे त्रास कमी करण्यासाठी पदार्थांची पूर्वतयारी कशी करावी याच्या टिप्स शेअर केल्या आहेत. आजची आपली टीप असणार आहे लसूण कसा सोलावा, याविषयी. लसूण सोलताना अनेकदा नखं दुखू लागतात पण आज आपण अशा सहा पद्धती पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही ३० सेकंदात चक्क वाटीभर लसूण…
Author: saimat
भारतीय लोकांनी तिखट पदार्थ खायला आवडतं असले तरी एका मर्यादेपेक्षा जास्त तिखट सर्वजण खाऊ शकत नाही. त्यामुळे स्वयंपाक करता कोणताही पदार्थाला चांगली चव यावी म्हणून त्यात मिरची, तिखट किंवा मसाले टाकले जातात. पण जर याचे प्रमाण चुकूनही जास्त झाले तर सर्व पदार्थाची चव बिघडते. जास्त तिखट असल्यामुळे कितीही चांगला चव असली तरी कोणी तो पदार्थ खाऊ शकत नाही. स्वयंपाक करता अशा चुका वारंवार होत असतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. आम्ही तुम्हाला काही सोपे घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे भाजीतील तिखटपणा कमी होईल. तूप जर भाजीमध्ये कधीही तिखट जास्त झाले तर त्यात तूप टाका. हा उपाय अत्यंत प्रभावी…
विविध आजारांवर उपयुक्त असणाऱ्या ‘पॅशन फ्रुट’या नवख्या फळ पिकाचा प्रयोग पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कचरवाडी येथील अमर पांडुरंग बरळ या युवा शेतकऱ्याने यशस्वी केला आहे. विशेष बाब म्हणजे ‘पॅशन फ्रुट’ या फळ लागवडीचा या परिसरातील पहिलाच प्रयोग आहे.’पॅशन फ्रुट’या फळांमध्ये मानवी आरोग्यासाठी लाभदायक गुणधर्म आहेत. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कचरवाडी येथील प्रयोगशील युवा शेतकरी अमर पांडुरंग बरळ यांनी राजस्थान, मध्यप्रदेश सीमेवरील किसान गड येथून बिया आणून नैसर्गिक रोपे तयार केली. तयार झालेली शंभर रोपांची त्यांनी आपल्या पाऊण एकर क्षेत्रात नियोजनबद्ध पद्धतीने लागवड केली. म्हणजेच ओळीतील अंतर दहा फूट आणि रोपातील अंतर सात फूटवर बांबूच्या साह्याने लागवड केली. ‘पॅशन फ्रुट’हे वेलवर्गीय…
शेतकरी सातत्याने आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. यामध्यमातून चांगले उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण कधी कधी नैसर्गिक संकटांचा फटका पिकाला बसतो. दरम्यान, शेतकरी स्वीट कॉर्न मकेची लागवड करुन चांगला नफा मिळवू शकतात. हंगाम कोणताही असला तरी स्वीट कॉर्न मकेला मोठी मागणी असते. स्वीट कॉर्न मका देशाबरोबरच परदेशातील लोकांना देखील आवडते. त्यामुळं देशातील शेतकरी या मकेच्या लागवडीतून चांगल उत्पन्न मिळवू शकतात. स्वीट कॉर्नच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळते स्वीट कॉर्नची लागवड ही मक्याच्या लागवडीसारखीच आहे. स्वीट कॉर्नच्या लागवडीत मका पक्व होण्याआधीच काढली जाते. त्यामुळं शेतकऱ्यांना लवकरच चांगले उत्पन्न मिळते. स्वीट कॉर्नसह शेतकरी फुलांची लागवड करूनही चांगला नफा मिळवू शकतात. तसेच मसाला…
सध्या टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली आहे. दीडशे ते दोनशे रुपये किलोने विक्री होणारा टोमॅटोचे दर सध्या तीन ते पाच रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. या पार्श्वभूमीवर टोमॅटो उत्पादक शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत. रस्त्यावर टोमॅटो ओतून सरकारचा निषेध केला जातोय. दरम्यान, या परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांना काही दिलासा देणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. ऑक्टोबरमध्ये टोमॅटोचं उत्पादन वाढणार देशात टोमॅटोच्या किंमती वाढल्यानंतर सरकारने किंमती नियंत्रणात आणण्यासाठी पावले उचलली. सरकारने नेपाळहून टोमॅटोची आयात केली. परिणामी टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे…
ठाणे ः वृत्तसंस्था सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरु असून सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांकडेही बाप्पाचे आगमन झाले आहे.अशात सेलिब्रिटी असो किंवा राजकीय नेते एकमेकांच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी जात आहे.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन बाप्पाचं दर्शन घेतले. त्यानंतर ते ठाण्यातील आमदार निरंजन डावखरे यांच्या घरी गेले. तिथे एका चिमुकलीने त्यांना राजकारणातील इतके प्रश्न विचारले की, त्यांना सळो की पळो करुन सोडले. आठ वर्षांच्या या चिमुकलीने पहिला प्रश्न देवेंद्र यांना विचारला की, जपानला जाऊन आमच्या दीदीसाठी काय गिफ्ट आणलं? तिने हा प्रश्न विचारल्यावर फडणवीस यांना हसू आवरलं नाही. या चिमुकलीने गोड आवाज एका मागोमाग अनेक प्रश्न वाचून देवेंद्र फडणवीस…
नागपूर : राज्य सरकारच्या तिजोरीवरील खर्चाचा भार कमी करण्यासाठी विविध शासकीय कार्यालयातील कामे बाह्ययंत्रणेच्या माध्यमातून करून घेण्याचा आणि त्यासाठी अनेक कामांचे (आऊटसोर्सिग) करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्यभरातून या निर्णयाला विरोध होत आहे. यामुळे संतापलेल्या नेटकऱ्यांनी आता थेट कंत्राटी पद्धतीने आमदार भरतीची जाहिरात काढली आहे. हा विषय सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एकीकडे मेगाभरती निघाल्याचा आनंद होत असतानाच दुसरीकडे मात्र सरकारने यापुढे शासकीय नोकर भरती कंत्राटी पद्धतीने केली जाईल आणि याकरिता नऊ कंपन्यांना कंत्राट देण्यात आले असल्याची घोषणा केली आहे. नेटकऱ्यांकडून आमदार भरतीसाठी विविध अटी आणि शर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत. खोके घ्यायची क्षमता असावी, सुरत गुवाहाटी प्रवासाची क्षमता असावी,…
साईमत नागपूर : एखाद्या कंपनीने शासनाला कंत्राटी नोकरदार पुरवठा केला तर शासनाने त्या कंपनीला सर्विस चार्ज किती द्यायला पाहिजे? आपले काटकसर करणारे सरकार खाजगी कंपन्यांना १५ टक्के सेवा शुल्क देणार आहे. एखाद्या कंत्राटी नोकरदाराला १० हजार रुपये वेतन शासन देणार असेल तर त्यापैकी कंपनीला १५०० रुपये द्यावे लागतील, म्हणजे महिनाभर काम करायचे पोरांनी आणि कंपनीवाल्यांनी फुकटात दलाली खायची. समजा शासनाने वर्षभरात १०००० कोटींचे पगार केले तर १५०० कोटी खाजगी कंपन्यांना जातील. हे कुठले गणित आहे? आणि ही कुठली काटकसर आहे? यामध्ये पीएफसाठी २२०० रुपये कट होतील, म्हणजेच शासन पगार देईल १०००० रुपये आणि युवकांच्या हातात पडतील ६००० रुपये. यामध्ये ना…
मुंबई : प्रतिनिधी देशात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही बाजुंनी वेगवेगळी रणनीती आखली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून पक्षबांधणीसाठी बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना सध्या ‘सनातन धर्म’ हा चर्चेेच्या केंद्रस्थानी आला आहे. अलीकडेच तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र आणि क्रीडामंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी खळबळजनक विधान केले. मलेरिया, डेंग्यू, कोरोना किंवा अन्य रोगांप्रमाणे सनातन धर्माचे उच्चाटन झाले पाहिजे, असे विधान उदयनिधी स्टॅलिन यांनी केले. स्टॅलिन यांच्या विधानानंतर देशभरात विविध राजकीय पक्षांनी यावर आक्षेप घेतला. सनातन धर्मावरील…
मुंबई : प्रतिनिधी नवसाला पावणारा आणि सर्वात लोकप्रिय सार्वजनिक गणपती अशी ख्याती असणाऱ्या लालबागचा राजाच्या मूर्तीची झलक नुकतीच सर्वांना पाहायला मिळाली. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या आधी काहीवेळासाठी लालबागचा राजाची मूर्ती सर्वांना दाखवण्यात आली. काहीवेळातच लालबागचा राजाची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर एका गोष्टीमुळे वादंग निर्माण झाला आहे.लालबागचा राजाच्या चरणांपाशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रतिमा साकारण्यात आली आहे.ही बाब अनेकांना खटकली.त्यानंतर सकल मराठा समाजाने आक्रमक पवित्रा घेत लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सकल मराठा समाज महाराष्ट्र यांच्याकडून मुंबई पोलिसांना एक पत्र पाठवण्यात आले आहे. या पत्रात लालबागचा राजा मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.…