Author: saimat

एस.टी.चेआरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर समाज आक्रमक साईमत।पहुर, ता.जामनेर।प्रतिनिधी। येथे सकल धनगर समाजाच्यावतीने पंढरपूर येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातून अंमलबजावणी करण्यासाठी समाजाचे नेते उपोषण करीत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सोमवारी सकाळी पहूर बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी धनगर समाज जामनेर तालुक्याच्यावतीने साखळी उपोषणाची सुरुवात करण्यात आली.साखळी उपोषणाची सुरुवात येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळ्याचे पूजन करून समाज बांधवांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर, उभी गल्ली, बाजार पट्टा मार्गे बस स्थानकावर येऊन ढोल ताशाच्या निनादात रॅली काढून या ठिकाणी साखळी उपोषणास सुरुवात केली. येथे अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. साखळी उपोषणाच्या पहिल्या दिवशी किरण भास्कर पाटील, अमोल अजय पांढरे या धनगर बांधवांनी…

Read More

वक्तृत्व, निबंध, पोस्टर लेखन स्पर्धेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद साईमत।पाचोरा।प्रतिनिधी। येथील एम.एम.महाविद्यालयात हिंदी दिनानिमित्त १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर ‘हिंदी सप्ताह’ चे आयोजन केले होते. सप्ताह अंतर्गत वक्तृत्व, निबंध लेखन, पोस्टर लेखन आदी स्पर्धांचे आयोजन केले होते. वक्तृत्व स्पर्धेत १५, निबंध लेखन स्पर्धेत ६० तर पोस्टर लेखन स्पर्धेत ५२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सप्ताह समापन व पारितोषिक वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातील लेखक, कवी डॉ. शशिकांत सोनवणे ‘सावन’ उपस्थित होते. पोस्टर प्रदर्शनीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले होते. मंचावर डॉ.शरद पाटील, नितीन पाटील, ऋषिकेश ठाकूर, डॉ. जे.डी.गोपाळ, डॉ. के.एस.इंगळे, डॉ.एस.बी.तडवी, डॉ. वाय.बी.पुरी, डॉ.…

Read More

महानगरपालिकेला कर भरुनही नागरी सुविधांचा अभाव साईमत/जळगाव/प्रतिनिधी : पिंप्राळा परिसरातील प्रल्हाद नगरातील गटारी, रस्ते, पथदिवे,ओपन स्पेसला सरंक्षक भिंत बांधून मिळावे, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, यासाठी पिंप्राळा परिसरातील वार्ड दहाच्या नगरसेविका शोभाबाई बारी यांना रविवारी नागरिकांनी साकडे घालून आम्ही महानगरपालिकेला कर भरुनही नागरी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे त्वरित सुविधा करुन द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. शोभाबाई बारी यांचे चिरंजीव अतुल बारी यांना प्रल्हाद नगरमधील नागरिकांनी विविध समस्यांबाबत निवेदन दिले. अतुल बारी यांनी आ.सुरेश भोळे यांच्या निधीतून रस्ते व गटारी करण्याचे आश्वासन दिले. निवेदन देतांना अपर्णा निकम, सविता पाटील, अंजली बडगुजर, मंगलाबाई पाटील, मीना पाटील, दीपाली चौधरी, संगीता जाधव,…

Read More

 राष्ट्रीय लहुजी ब्रिगेडतर्फे आमरण उपोषणाचा ईशारा साईमत / जळगाव / प्रतिनिधी येथील पिंप्राळा परिसरातील शिंदे नगर भागातील रहदारीच्या जागेवर एक ठेकेदार अनधिकृत बांधकाम करीत असून ते त्वरित थांबवावे अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा ईशारा राष्ट्रीय लहुजी ब्रिगेड संघटनेचे प्रदेश चिटणीस कैलास अप्पा सोनवणे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.   या बाबत त्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पिंप्राळा परिसरातील शिंदे नगर भागातील गट नं 2/2 ब चा समोरील पूर्व दिशेला रहदारीच्या रस्त्यावर या परिसरातील कोणीतरी ठेकेदार हा सदर जागा बळकावण्याच्या उद्देशाने सार्वजनिक जागेवर अनधिकृत व बेकायदेशीर पणे बांधकाम करीत आहे.  त्या जागेवर बांधकाम झाल्यास परिसरातील नागरिकांना येण्या जाण्याचा वापर…

Read More

वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे बसणार चाप साईमत।मालेगाव।प्रतिनिधी। शहरात विनाहेल्मेट, विना लायसन्स, फोनवर बोलणे, विना सिटबेल्ट, अवजड वाहने, बेशिस्त वाहन चालविणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. १ जानेवारी २०२४ ते १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत वाहतूक शाखेने १३ हजार ५२७ वाहनांवर कारवाई केली होती. या कारवाईपैकी १६९ वाहनांकडून दंड वसूल केला आहे. वाहतूक शाखेला ६ लाख ४४ हजार ६०० रुपये दंड जमा झाला आहे. शहरात बेशिस्त वाहन चालविणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. येथे मनमर्जीने वाहने चालविणाऱ्यांवर ई-मशिनद्वारे ऑनलाईन दंड दिला जातो. ५०० रुपयांपासून ते २ हजारापर्यंत दंड ठोठावला जातो. येथे दुचाकी, चारचाकी, तीनचाकी रिक्षा, अवजड वाहने, अवैध पार्किंग, विनाहेल्मेट, मोबाईलवर बोलणे, विरुद्ध बाजूने वाहन…

Read More

माजी तालुकाप्रमुखाचा पक्षत्याग साईमत।मालेगाव।प्रतिनिधी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख रामा मिस्तरी यांनी पक्ष सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे ठाकरे गटाला मालेगावात धक्का बसला आहे. अविभाजित शिवसेनेत मिस्तरी यांनी अनेक वर्षे मालेगाव महानगरप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती. शिवसेनेतील फुटीनंतर मालेगावातील बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मिस्तरी हे मात्र ठाकरे गटातच राहिले. ठाकरे गटाने त्यांना तालुकाप्रमुख केले. अलीकडेच, ठाकरे गटाने अचानक मिस्तरी यांचेकडील पद काढून जितेंद्र देसले यांना दिले. यामुळे मिस्तरी आणि समर्थकांमधील नाराजी उफाळून आली आहे. या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिला. पत्रकार परिषद घेऊन मिस्तरी यांनी राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे उपनेते…

Read More

महायुती आणि मविआच्या उमेदवारांचे टेन्शन वाढणार साईमत।नाशिक।प्रतिनिधी। प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू नाशिक दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी मेळावा घेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फिल्डिंग लावल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी जिल्ह्यातील १५ पैकी दोन मतदारसंघातील उमेदवार देखील जाहीर केले आहेत. त्यामुळे महायुती आणि मविआच्या उमेदवारांचे टेन्शन वाढणार आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने निफाड येथे घेण्यात आलेल्या मेळाव्यात भाजप ओबीसी राज्य सरचिटणीस व माजी निफाड पंचायत समिती उपसभापती गुरुदेव कांदे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यानंतर कडू यांनी निफाड मतदारसंघातून गुरुदेव कांदे यांना तर चांदवड मतदारसंघात प्रहार संघटनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली.…

Read More

परिसरात निर्माण झाले भावूक वातावरण साईमत। लोहारा, ता.पाचोरा।प्रतिनिधी। येथे दरवर्षीप्रमाणे श्री गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात शांततेत पार पडला. अनंत चतुर्थीच्या दिवशी गावासह घराघरातून ‘गणपती बाप्पा मोरया….पुढच्या वर्षी लवकर या…’ असा जयघोष निनादला होता. सर्व घरगुती गणपती मंडळ व सार्वजनिक मित्र मंडळ यांनी शांततेत ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. यावेळी गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. महिला, पुरुष मंडळी गणपतीची विधीवत पूजाअर्चा करीत होते. गणपती बाप्पा जात असल्याने सर्वत्र भावूक वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीत शांतता सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील यांच्यासह लोहारा पोलीस दुरुक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Read More

साईमत विशेष प्रतिनिधी रावेर विधानसभा मतदारसंघातून २००९ आणि २०१९ अशा दोन्हीवेळी विजयश्री खेचून आणणाऱ्या आ.शिरीषदादा चौधरी यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत गेल्या महिन्यात राजकीय निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, त्यांच्या पश्चात या परिवाराची चौथी पिढी म्हणून ओळख असणाऱ्या युवा नेते व एन.एस.यु.आय.चे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय चौधरी हे आगामी विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार असतील यावर सुध्दा यानिमित्त शिक्कामोर्तब झाले आहे. रावेर विधानसभेच्या या लढतीत धनंजय चौधरी यांच्यासमोर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, डॉ. कुंदन फेगडे,  फैजपूरचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ यांच्यासह डॉ.केतकी पाटील यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा आहे. सोबत गतवेळी अपक्ष रिंगणात असलेले भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी हे यावेळी सुध्दा आपले नशिब…

Read More

साईमत विशेष प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या तयारीच्या दृष्टीने शिवसेना नेते अनिल देसाई यांच्यावर विधानसभानिहाय प्रभारी नेमण्याची जबाबदारी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सोपविली आहे. त्यानुसार उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीची चाचपणी सुरु झाली असली तरी जळगाव जिल्ह्यात त्यातल्यात्यात जळगाव लोकसभा मतदार संघाच्या क्षेत्रात ठाकरे गटाच्या शिवसेना पदाधिकाऱ्यात कमालीची सामसूम दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाला म्हणून ही सामसूम दिसत असली तरी जळगाव लोकसभा मतदार संघातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना लेखाजोखा मागितला जात असल्याने अनेकांना अडचणी उभ्या राहिल्या आहेत. जळगाव लोकसभा मतदारसंघात जळगाव ग्रामीण, एरंडोल व पाचोरा या तीन विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी करुन शिंदे…

Read More