भुसावळ प्रतिनिधी : दिपनगर निंभोरा (ता.भुसावळ) येथे वैकुंठवासी निवृत्ती छन्नु चौधरी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ संगीतमय श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा निंभोरा बु. (ता.भुसावळ) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज मंगळवार दि.९ ते १६ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत दैनंदिन श्रीमद् भागवत कथा सकाळी नऊ ते ११ दुपारी २ ते ५ या वेळेत कथेचे प्रवक्ते हभप गजानन महाराज धानोरा वाल्मीक आश्रम (चिंचखेडा, जामनेर) हे लाभले असून दररोज काकड आरती सकाळी ५ ते ६.३०, विष्णुसहस्त्रनाम सकाळी ६.३० ते ७.३०, हरिपाठ सायंकाळी ५.३० वाजता व किर्तन दररोज रात्री ९ ते १० या कालखंडात होणार असूनन काल्याचे कीर्तन…
Author: saimat
बोदवड प्रतिनिधी : येथील जिल्हा परिषद जि.प.कन्या नंबर दोन मधील उपशिक्षिका संगिता देविदास शेळके यांना यावर्षीचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व आ.राजू मामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला यावर्षीचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संगीता देविदास शेळके यांनी किशोरवयीन मुलींच्या समस्या व त्यांचे निराकार करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अध्यापन करून त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण केली. संगिता शेळके यांनी विविध स्वरचित कवितांचा संग्रह केला. मनूर बुद्रुक येथील संगीता शेळके या बोदवड येथील बरडिया शाळेतील उपशिक्षक संजय देवकर यांच्या पत्नी असून वरणगाव येथील उपशिक्षक संतोष शेळके यांच्या भगिनी…
मुक्ताईनगर प्रतिनिधी : ग्रामसभा न घेणे, पदाचा दुरुपयोग करणे आदी कारणांवरून काकोडा (ता.मुक्ताईनगर) ग्रामपंचायतीचे सरपंच तुळशीराम रामा कांबळे यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यांना पदावरून अनार्ह (अपात्र ) ठरविण्यात आलेले असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ३ ऑगस्ट रोजी काढलेला आहे. कांबळे हे २०२१ पासून काकोडा ग्रामपंचायतचे सरपंच होते. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३६ नुसार सरपंच तुळशीराम कांबळे यांनी ग्रामसभेच्या बैठका घेतल्या नाहीत. तसेच तीन वर्षात केवळ एकच ग्रामसभा घेतली. सरकारी पैशांचा गैरवापर, ग्रामनिधी तसेच विविध योजनांचा निधीचा गैरवापर, पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा गैरवापर, सदस्यांना विश्वासात न घेणे तसेच बोगस बिले काढून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात…
अजित पवारांकडून अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकासावर भरीव तरतूद मुंबई : प्रतिनिधी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत आपला ११ वा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०४७पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या संकल्पपूर्तीला बळ देणारा वर्ष २०२५ – २६ चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’ असे सांगत शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद…
शिवजयंतीत जिल्हाधिकाऱ्यांचा भूतदये’चा प्रत्यय येतो तेव्हा… जळगाव। विशेष प्रतिनिधी जळगाव शहरात बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती जल्लोषात साजरी होत असतांना, रथावर निघालेली मिरवणूक सर्वत्र उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरण… अचानक रथाला जुंपलेल्या घोड्याकडे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे लक्ष वेधले जाते. रथाला जुंपलेला घोडा काहीसा अस्वस्थ त्यांना वाटला. त्यांनी घोड्याजवळ जावून त्याचे निरीक्षण केले, पशूवैद्यकीय डॉक्टरांना ही त्यांनी घोड्याच्या प्रकृतीची माहिती घेण्याविषयी सांगितले. पशूवैद्यकीय डॉक्टरांनी तपासणी केली असता घोडा आजारी असल्याचे निष्पन्न झाले. तातडीने घोड्यावर उपचार करण्यात आले आणि रथातून घोड्याला वेगळे केले. ही घटना किंवा हा प्रसंग ‘ भूत दया परमोधर्म याची प्रचिती आणून देणारा ठरला. भारतीय संस्कृतीत ‘भूतदया परमो धर्माचे…
महाराष्ट्र ई-स्पोर्ट्स ओपन चॅम्पियनशिपचे उद्घाटन पुणे ( प्रतिनिधी) – केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज महाराष्ट्र ई-स्पोर्ट्स ओपन चॅम्पियनशिपचे उद्घाटन करताना त्याला ऐतिहासिक टप्पा म्हणून संबोधित केले. ही चॅम्पियनशिप एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे आयोजित केली आहे, जी राज्याच्या क्रीडा इतिहासातील आणि देशाच्या वाढत्या ई-स्पोर्ट्स उद्योगात महत्त्वाचा टप्पा ठरते. केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी पुण्यातील भाषणात सांगितले की, ई-स्पोर्ट्समध्ये केवळ उत्तम तांत्रिक कौशल्यच नाही, तर मानसिक दृढता, जलद निर्णय क्षमता आणि संघभावना आवश्यक आहे, जे पारंपारिक क्रीडांमध्ये देखील आवश्यक आहेत.२०१८ च्या जाकार्ता-पलंबांग आशियाई क्रीडा स्पर्धेत एक डेमो क्रीडा म्हणून ई-स्पोर्ट्सचा समावेश झाला होता. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने…
जय शिवराय, जय भारत जिल्हास्तरीय पदयात्रेचे आयोजन जळगाव ( प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती१९ फेब्रुवारीरोजी साजरी करण्यात येत आहे. जळगाव शहरात जिल्हास्तरीय जय शिवराय, जय भारत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.केंद्र शासनाच्या वतीने देशपातळीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त जय शिवराय, जय भारत पदयात्रा राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही पदयात्रा सकाळी ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरु होईल. पदयात्रेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल -कोर्ट चौक – पंडित जवाहरलाल नेहरु स्मारक – डॉ. बाबासाहेब अंबेडकर स्मारक – टॉवर चौक – चित्रा टॉकिज – शिवतीर्थ असा राहणार आहे.…
सहयोग कॉलनी पिंप्राळा परिसरात श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाची सांगता जळगाव – शहरातील सहयोग कॉलनी पिंप्राळा परिसरात कै.रविंद्र बाजीराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त इस्कॉनच्या सहयोगाने पाटील परिवारातर्फे आयोजित सात दिवसीय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ उत्साहात पार पडला. श्रीमद भागवत कथा प्रवक्ता श्रीमान उद्धव प्रभुजी (भागवत शास्त्री, वृंदावन) होते. कथेचे आयोजन दि.११ ते १७ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलेले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणूनन जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, इस्कॉन जळगावचे अध्यक्ष पार्थसारथी प्रभुजी, श्रीमान चैतन्य जीवन प्रभुजी, आदित्य वामनदास, उत्तम मोहन दास, डॉ.माधव दास व समस्त पिंप्राळा हरे कृष्ण भक्त उपस्थित होते. शेवटी मधुर कीर्तनाने कथेची सांगता झाली. कथा कै.रविंद्र पाटील यांच्या…
सौर पंपासाठी १५ दिवसात विज जोडणी; शेंदुर्णी परिसरातील चित्र बदलविणार शेंदुर्णी , ता. जामनेर । प्रतिनिधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादित माल घरातच राहणार नाही, याची काळजी राज्य शासन घेईल. या परिसराचे चित्र बदलण्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.दी शेंदुर्णी सेकंडरी को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त अमृत ग्रंथ प्रकाशन आणि नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता…
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीकडून उत्कृष्ट मिरवणुकीला पुरस्कार देणार जळगाव (प्रतिनिधी )- सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शहरात १६ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त पूर्वतयारीसाठी विष्णू भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली हाउसिंग सोसायटी हॉल येथे बैठकीचे आयोजन केले होते. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीकडून यंदा उत्कृष्ट मिरवणुकीला पुरस्कार दिला जाणार आहे. यावर्षी शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा म्हणुन प्रतिभाताई शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. २० वर्षापासून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शहरात सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे. सामाजिक ऐक्य, शिवाजी महाराजांचा इतिहास याबाबत बौद्धिक प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे केले जाते . यावर्षीही शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने विविध उपक्रम राबवण्याचे निर्णय घेण्यात आले. यावर्षी 18 फेब्रुवारीरोजी सायंकाळी…