सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ७ वीची विद्यार्थीनी वृषाली सुनिल पवार हिने आज साईमत/पहूर ता जामनेर/प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ७ वीची विद्यार्थीनी वृषाली सुनिल पवार हिने आज चाळीसगाव येथील क्रीडा संकुलात झालेल्या शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत चमकदार खेळ करत द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील नामांकित शाळांमधील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. तगड्या प्रतिस्पर्ध्यांशी सामना करत वृषालीने आपल्या चपळतेने, तंत्राने आणि धैर्याने उत्कृष्ट कुस्ती सादर केली. उपांत्य फेरीत तिने प्रतिस्पर्धी खेळाडूवर वर्चस्व गाजवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यातही तिने दमदार खेळ दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि द्वितीय क्रमांकावर समाधान मानले. वृषाली ही शिपाई सुनिल पवार…
Author: saimat
आ.अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. साईमत/ फैजपूर/प्रतिनिधी : सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने शहरातील ४ हजार नागरिकांना मोफत आयुष्मान कार्ड उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाची सुरुवात रविवारी शुभ दिव्य मंगल कार्यालयात करण्यात आली. हा उपक्रम सिद्धेश्वर वाघुळदे यांच्या पुढाकाराने आणि आ.अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. आरोग्य संरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त असलेले हे कार्ड नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. नागरिकांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी आयुष्मान कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन श्री.वाघुळदे यांनी केले. शिबिराच्या प्रारंभीपासूनच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष निलेश राणे, सिद्धेश्वर…
कारवाई संशयास्पद? ; सागवान लाकूड तस्कर फरार झाले की केले?, नागरिकांमध्ये चर्चा साईमत/यावल/प्रतिनिधी : यावल वनविभाग गस्ती पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शुक्रवार दि.३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री यावल पूर्व आणि पश्चिम कार्यालयापासून १० कि.मी.अंतराच्या आत असलेल्या कोरपावली गावाजवळ सापळा रचून सागवान लाकूड तस्करांवर कारवाई करण्यात आली.५१ हजार २०० रुपयाच्या साग चौपाटासह मोटरसायकली जप्तची कारवाई करण्यात आली. त्यातील २ आरोपी फरार झाले की फरार करण्यात आले? याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहे. ही कारवाई ३ रोजी रात्री १२.४५ वाजेच्या सुमारास करण्यात आली. याबाबत सातपुड्यातील तथा वनक्षेत्रातील सागवान व आडजात लाकूड व्यवसाय करणाऱ्यांमध्ये व वनविभागातील काही मोजक्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये केलेल्या कारवाईबाबत संशय व्यक्त…
बऱ्हानपूर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात ५० वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : तालुक्यातील खामखेडा येथील बऱ्हानपूर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात ५० वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू रामा वाघ (वय ५०, रा.खामखेडा) असे मयताचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजू वाघ हे रात्री खामखेडा येथील बसस्थानकाजवळ रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी बाळू बुधा भोई (वय २८, रा. मेळसांगवे) यांच्या ताब्यातील बजाज पल्सर (क्र. एमएच १९ ईएन ६६३०) या दुचाकीने जोरदार धडक दिली. अचानक झालेल्या या धडकेत राजू वाघ यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघातानंतर…
शेतकऱ्यांना मानवी साखळी करून जावे लागतेय शेतात साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील धिंगापूर शिवारात शेतात जाण्यासाठीचा रस्ता शनिवारी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसात पूरात वाहून गेल्यामुळे तीन दिवसापासून निंबायती, जरंडी शिवारातील तीनशेच्यावर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे महत्वाच्या कामासाठी शेतकरी मानवी साखळीने जीव धोक्यात घालून जनावरांना चारा पाणी करण्यासाठी जात आहे धिंगापूर शिवारात जाण्यासाठी निंबायती आणि जरंडी शिवारातील शेतकऱ्यांना एकमेव सुकी नदीच्या पात्रातून रस्ता आहे. परंतु शनिवारी रात्री आलेल्या पुरामध्ये हा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे ३०० शेतकऱ्यांना या शिवारात जाता येत नाही. परंतु दूध काढणे, जनावरांना चारा पाणी करण्यासाठी या शिवारात जाणे आवश्यक झाले असून शेतकरी गटागटाने मानवी साखळी तयार करून…
लखनऊ–मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये भुसावळ आणि भादली दरम्यान ब्रेक सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : १ ऑक्टोबर रोजी लखनऊ – मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये भुसावळ आणि भादली दरम्यान ब्रेक सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने स्लीपर कोचमधून धूर निघाल्याची घटना घडली. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि संभाव्य अपघात टळला. प्रवाशांचा प्रवास सुरक्षीतपणे पुढे सुरू ठेवण्यात आला. ही घटना १ ऑक्टोबर २०२५ रोजी घडली. पुष्पक एक्सप्रेस नियोजित वेळेत भुसावळ स्थानकावरून सुटल्यानंतर भुसावळ–भादली दरम्यान असताना एस-४ क्रमांकाच्या स्लीपर कोचच्या चाकांजवळ अचानक धूर दिसून आला. ब्रेक सिस्टीममधील घर्षणामुळे ही समस्या उद्भवली असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे.घटना लक्षात येताच ट्रेन मॅनेजर आणि रेल्वे कर्मचारी…
इनरव्हील क्लबतर्फे वीटभट्टी कामगारांच्या मुलींना फ्रॉक, गोडधडीसह शालेय साहित्य भेट साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : भुसावळ येथील इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी यांनी आपल्या दत्तक घेतलेल्या नगरपालिका शाळा क्रमांक २ मधील कुमारींचे विधिवत पूजन साजरे केले. या शाळेत मुख्यत्वे वीट भट्टी कामगारांची मुले शिक्षण घेतात. त्यामुळे या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाला चालना मिळाली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील मुलींचे पूजन करून झाली. मुलींना फ्रॉक, सफरचंद, राजगिऱ्याचे लाडू, चिप्स, शृंगारसामग्री आणि हेअर पिन भेटवस्तू म्हणून दिल्या गेल्या. तसेच सर्व मुलं, मुलींना आणि शिक्षकांना क्लबच्या वतीने अल्पोपहार प्रदान करण्यात आला, ज्यामुळे कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे आनंद वाढवला गेला.कार्यक्रमासाठी क्लबच्या सदस्यांनी मनापासून मेहनत घेतली. यात मोना…
‘श्रीं’चे सुर्य वहन आहे साईमत/ पारोळा/प्रतिनिधी : येथे आज मंगळवारी ‘श्रीं’चे सुर्य वहन आहे. हे वहन सायंकाळी ६ वाजता श्री बालाजी महाराजांचा मंदिरापासून निघून बाजार पेठेतून नगरपालीकेजवळून पूर्वेस तलाव गल्लीतून महामार्गाने माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या घराजवळून बसस्थानकापासून पोलीस लाईनीत जाऊन तेथून पूर्वेस महावीर कॉलनीत माजी खासदार मोरेकाका यांचे घराजवळून परत हायवेने मा. आमदार आबासो चिमणराव पाटील यांचे घराजवळून न्यू बालाजी नगर तेथून माजी आ.चिमणराव पाटील यांच्या कार्यालयामार्गे गजानन कॉलनीतून महामार्गाने बोरी कॉलनीत माजी आ.डॉ.सतिष पाटील यांचे घराजवळून, माजी खा.ए.टी.पाटील यांच्या निवासस्थाना जावून दुपारी २ वाजता येईल.
मृत महेश हा विधवा आईचा एकुलता एक मुलगा ; न. पा. चे मुख्याधिकारी, तहसीलदार, तलाठी आदींनी दिली भेट साईमत/पाचोरा /प्रतिनिधी : अतिवृष्ठीमुळे शहरातिल कृष्णापुरी भागातिल टेकडीगल्लीत धाब्याचे घर अतिवृष्ठीमुळे कोसळल्याने एक १२ वर्षाचा मुलगा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मरण पावला तर दुसरा मुलगा जखमी झाला. मरण पावलेला महेश हा विधवा आईचा एकुलता एक मुलगा असून तिच्या वृध्दपकाळाची काठी हरपल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महेश नितिन राणे (वय १२) असे मयत झालेल्या बालकाचे तर योगेश बाळू पाटील असे जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, विठ्ठल काशिनाथ पाटील हे आपल्या मुलासह धाब्याच्या घरात राहत होते. घराच्या मागच्या बाजूस महेश आणि त्याचा…
पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली साईमत/ पारोळा/प्रतिनिधी : तालुक्यातील होळपिंप्री येथील २८ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा विहिरीतून पाणी काढत असताना पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.कल्पेश गोरख पाटील असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. कल्पेश पाटील हे मका कणीस मोडनीसाठी शेतात गेले होते. यावेळी विहीरीवर ते पाणी काढण्यासाठी गेले असता त्यांचा अचानक पाय घसरून तोल जाऊन ते विहीरीत पडले. पावसामुळे विहिरीचे पाणी जास्त असल्याने व पोहता येत नसल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला. बराच वेळ होऊनही मुलगा परत न आल्याने वडील गोरख पाटील हे बघण्यासाठी विहिरीजवळ गेले असता,…