Author: saimat

युवासेनेतर्फे उद्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन 9 मुलांचे व 5 मुलींचे संघ होणार सहभागी साईमत/जळगाव/प्रतिनिधी जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने युवासेनेतर्फे उद्या मंगळवार दि. 1 ऑक्टोबर रोजी जी. एच. रायसोनी महाविद्यालय, शिरसोली रोड, जळगाव येथे सलग चौथ्या वर्षी जळगाव जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या फलकाचे अनावरण नुकतेच शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेना तथा युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, युवासेनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना कॉलेजकक्षचे जळगाव लोकसभा युवाधिकारी प्रितम शिंदे, युवासेना जिल्हा युवाधिकारी निलेश चौधरी, चंद्रकांत शर्मा, सुरज पाटील, उपमहानगर युवाधिकारी प्रशांत वाणी, राहूल चव्हाण,…

Read More

खेडी – इंदिरा नगर येथे मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद साईमत/जळगाव/प्रतिनिधी राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत उपमुख्यमंत्री( गृह/विधी व न्याय) यांचे कार्यालय व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या समन्वयाने आणि जय बजरंग मित्र मंडळ यांच्या सहकार्याने प्रभाग क्र. ३ मधील खेडी,इंदिरा नगर येथे  २८ सप्टेंबर रोजी मोफत सामुदायिक आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास  परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात विनामूल्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरास प्रभाग क्र. ३ चे नगरसेवक प्रवीण कोल्हे , भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखा वर्मा ,भाजपा महिला मोर्चा महानगर प्रमुख भारती सोनवणे, केमिस्ट…

Read More

जिल्ह्यात इफको तर्फे १२ तालुक्यात फवारणी करिता किसान ड्रोन उपलब्ध साईमत/जळगाव/प्रतिनिधी युवकांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावे.  शेती  ही शाश्वत उत्पन्न मिळण्याचे मोठे साधन आहे. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती सोबत  जोड व्यवसाय करावा.  शेती व शेतकरी हेच शाश्वत उद्योगाचे साधन असून शासन  शेती व शेतकऱ्यांच्या सोबत खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासा व्हावा या दृष्टीने वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात कापूस साठवणूक बॅग व बॅटरी चलित फवारणी पंपाचे वितरण प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा अधीक्षक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी होते. कृषी विभाग, आत्मा जळगाव व…

Read More

ज्येष्ठ मंडळी समाजाचे आधारस्तंभ, संस्काराचा ठेवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील साईमत/जळगाव/प्रतिनिधी वातानुकुलित जेष्ठ नागरिक भवन  हे जेष्ठ नागरिकांना एकत्र येण्यासाठी आणि सुसंवाद साधण्यासाठी एक विरंगुळा केंद्र आहे. आपली वडीलधारी जेष्ठ मंडळी ही आपली संपत्ती असून त्यांचे अनुभव, ज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. ज्येष्ठ मंडळी ही सुसंस्काराचा ठेवा आणि सर्व समाजाचे आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील आसोदा येथे जेष्ठ नागरिक भवनाचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक संघाचें अध्यक्ष डीगंबर भोळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आ. राजूमामा भोळे होते. पालकमंत्री ना.पाटील पुढे म्हणाले की, जेष्ठांच्या  आयुष्यात आनंद आणि समाधानाचे क्षण आणण्यासाठी…

Read More

विद्या इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिबिरात योगाचे धडे साईमत/जळगाव/प्रतिनिधी येथील मु.जे.महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग ॲण्ड नेचर थेरपी विभागाच्या वतीने विद्या इंग्लिश मिडीयम स्कूल येथे २६सप्टेंबर पर्यंत मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन प्रा.ज्योती वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले. डॉ. देवेंद्र सोनार व प्रा.ज्योती वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिक्षिका स्नेहल लष्करी (अग्रवाल) यांनी योगासने, प्राणायाम यांची प्रात्यक्षिके घेउन योगाचे फायदा व महत्त्व पटवून दिले.योग शिबिराचे आयोजन केल्याबद्दल प्राचार्य सतिष मालकर यांचे योग विभागाच्या वतीने आभार मानले.

Read More

भगीरथ शाळेत देशभक्ती गीतगायन स्पर्धा उत्साहात दहावीची विद्यार्थिनी चेतना सुतार प्रथम साईमत/जळगाव/प्रतिनिधी येथील कै.सुनिता जगन्नाथ वाणी -भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. त्यात प्रथम क्रमांक चेतना दिलीप सुतार, द्वितीय तृप्ती महेंद्र माळी, तृतीय तेजस्विनी शरद कंडारे, उत्तेजनार्थ पियुष युवराज मगरे यांनी प्राप्त केला. स्पर्धेचे परीक्षण सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षिका संगीता पवार तसेच सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक चंद्रशेखर पिंपरकर यांनी केले. स्पर्धेचे आयोजन ज्येष्ठ शिक्षक आर.डी. कोळी, आर. डी. पाटील यांनी केले. याप्रसंगी मुख्याध्यापक एस.पी. निकम, उपमुख्याध्यापक जे.एस. चौधरी, पर्यवेक्षक के.आर. पाटील, गणेशोत्सव समिती प्रमुख संगीता पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन आर.डी. पाटील तर आर.डी. कोळी यांनी आभार व्यक्त केले.

Read More

डॉ. अभिषेक बोरोले यांचा तुर्की येथील इस्तंबूल येथे परिषदेत पोस्टर प्रदर्शित साईमत/जळगाव/प्रतिनिधी मलकापूर येथील रहीवास असलेले डॉ. डी वाय पाटील वैद्यकिय महाविद्यालय तसेच गोदावरी परिवाराचे सदस्य डॉ. अभिषेक बोरोले यांनी नुकतेच तुर्कीदेशात इस्तंबूल येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मूत्रपिंड प्रत्यार्पण किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांमध्ये होणारा बुरशीजन्य संसर्ग या विषयावर पोस्टर प्रदर्शित केले.इस्तंबूल येथील द ट्रान्सप्लांट सोसायटीतर्फे आयोजित या आतंरराष्ट्रीय परिषदेत पोस्टरच्या माध्यमातून मूत्रपिंड प्रत्यार्पण शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांमध्ये होणारा बुरशीजन्य संसर्ग या विषयावर मत मांडतांना त्यांनी २९ वर्षीय महिलेचे आठ महिन्यांपूर्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले होते आणि वडील दाते होते. टॅक्रोलिमस, मायकोफेनोलेट सोडियम आणि प्रेडनिसोलोनच्या इम्युनोसप्रेशनच्या देखभालीवर ती स्थिर ग्राफ्ट…

Read More

शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांची संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी निवड साईमत/जळगाव/प्रतिनिधी येथील पंचायत समिती जळगाव चे शिक्षण विस्तार अधिकारी व विद्यमान ग स सोसायटी संचालक विजय शांतीलाल पवार यांची महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राज्य अध्यक्ष कैलास सांगळे नाशिक व राज्य सरचिटणीस दादाराव मुसदवाले  बुलढाणा यांनी नुकतीच ही निवड जाहीर केली. शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांच्या या निवडीबद्दल प्रगती गटाचे रावसाहेब पाटील, सहकार गटाचे उदय पाटील यांचे सह सर्व जिल्हा भरातील शिक्षण विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकवृन्द यांनी अभिनंदन केले आहे. शिक्षण विस्तार अधिकारी पदाच्या पदोन्नती…

Read More

१९ गावांना अखंडित विजेसाठी दिलासा ; शिरसोली १३२ के.व्ही. चे उपकेंद्र मंजुरीच्या अंतिम टप्यात साईमत/जळगाव/प्रतिनिधी म्हसावद ते नागदुली ३३ के. व्हीं. लिंक लाईनचे काम २ महिन्यात पूर्ण होणार असून यामुळे म्हसावद व परिसरातील उन्हाळ्यातील विजेचा लपंडाव कायमस्वरूपी बंद होणार आहे. तसेच  सुमारे ८० कोटीच्या शिरसोली १३२  के. व्हीं उपकेंद्र मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात असून या उपकेंद्रामुळे जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण भागातील प्रमुख उपकेंद्रांना सुरळीत दाबाने वीज पुरवठा होणार आहे. उद्योगधंदे यांच्या विद्युतीकरणाचा प्रश्न या शिरसोली उपकेंद्रामुळे सुटणार असून ३४ कोटी ५२ लक्ष निधीतून  म्हसावद व परिसरातील रुग्णांना आरोग्याची अद्ययावत सुविधा असावी यासाठी सर्व सुविधायुक्त ३० खाटांच्या ग्रामीण रूग्णालयाच्या मुख्य…

Read More

शाळा प्रशासनासह ग्रामस्थांवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव साईमत/जळगाव/प्रतिनिधी: तालुक्यातील पिलखेडे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श मराठी शाळा, पिलखेडे या शाळेने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांत जिल्हास्तर व विभागीय स्तरावर घवघवीत यश संपादित केले आहे. त्याबद्दल शाळा प्रशासन व ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या राज्यस्तरावरील आदर्श उपक्रमाचा दुसरा टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. या टप्प्यावरील मुल्यांकन जाहीर झालेले असून त्यात जळगाव तालुक्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श मराठी शाळा, पिलखेडे  जिल्हा परिषद शाळेने प्राथमिक गटातून जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नाशिक विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त करत घवघवीत यश संपादित केले आहे. पिलखेडे…

Read More