नाशिक विभागीय स्पर्धेसाठी सुमित चिंचोले, राजकुमार जोशी, क्रॉस कंट्री संघ ठरला पात्र साईमत/जामनेर/प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य क्रीडा-युवक सेवा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा परिषद-जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय शासकीय मैदानी स्पर्धा जळगावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे नुकत्याच घेण्यात आल्या. त्यात जामनेरपुरा येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयातील वयोगट १९ वर्षाच्याआतील खेळाडूंनी मैदानी स्पर्धेत विजयी घोडदौड केली आहे. सर्व विजयी खेळाडूंचा राज्य क्रीडा मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कारार्थी किशोर चौधरी, महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशनचे संचालक तथा जिल्हा सचिव राजेश जाधव, कार्याध्यक्ष डॉ.विजय पाटील, जळगाव जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत कोल्हे, प्रा.इक्बाल मिर्झा,…
Author: saimat
पहुरच्या शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीचे आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत यश, पाच खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी जळगाव कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्ही. एस.नाईक महाविद्यालयात आयोजित आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत पहुर येथील शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीच्या सहा तायक्वांदो पटुंनी सहभाग घेऊन तीन सुवर्ण पदकांसह दोन रौप्य तर एक कांस्य पदक प्राप्त केले आहे. शेंदुर्णी येथील आ. र .भा.गरुड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या गौरी विजय कुमावत, लोचना श्रीकृष्ण चौधरी, साहील बेग यांनी सुवर्ण पदकावर मोहोर उमटविली तर दिनेश वासुदेव राऊत याने रौप्य पदक तर हर्षल संतोष उदमले याने कांस्य पदक पटकाविले. जामनेर येथील सुरेशदादा…
पहुर शिवारात कपाशीचे नुकसान, पावसाचा बसतोय फटका साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पहुर शिवारात कपाशीचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. ऐन वेचणीवर आलेला कापूस पावसामुळे ओला झाल्याने गुणवत्ता खालावत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. काही प्रमाणात मका पिकाचेही नुकसान झाले आहे. कापून ठेवलेला कडबा खराब झाल्याने गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे सद्यस्थितीला चित्र आहे.
सा. बां. मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे काय? संतप्त नागरिकांमधून उमटतोय सूर साईमत/पहुर, ता. जामनेर/प्रतिनिधी शेंदुर्णी मार्गावरील पहुरजवळ जीवघेणे खड्डे मृत्यूला आमंत्रण देत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून थट्टा केली जात आहे. ग्रामीण रुग्णालयापासून श्रीक्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिरापर्यंत दोन किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम मंजूर झाले आहे. हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. दुभाजकाचे कामही अपूर्णावस्थेत आहे. खरंतरचौपदरीकरणात संपूर्ण रस्त्याचे नूतनीकरण होणे गरजेचे आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केवळ जिथे खड्डे आहे, तिथेच डांबरीकरण करून खड्डे बुजवत थट्टा केली जात आहे. जीवघेण्या खड्ड्यांमधील डांबरीकरण करण्यासाठी अत्यंत विलंब लागत असल्याने पहुर पोलीस ठाणे, आर. टी. लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय परिसरात खड्डे…
हिंदू सनातन संस्कृतीत कन्या पूजनाचे विशेष महत्त्व : महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज साईमत/फैजपूर/प्रतिनिधी भारतीय आर्य हिंदू सनातन संस्कृतीत कन्या पूजनाचे विशेष महत्त्व आहे.कन्या पूजनाचे महत्त्व नवरात्रीनिमित्त सीमित नसून वर्षभर शुभ कार्य करतेवेळी कुवारिका कन्या पूजनाने ते करावे, तिचा सन्मान करावा, प्रणाम करावा, असे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. वढोदा येथील निष्कलंक धाम तुलसी हेल्थ केअर सेंटरमध्ये परिसरातील सर्व जाती-धर्माच्या कुवारीका कन्यांचे पूजन करून त्यांना पोटभर स्वादिष्ट भोजन देण्यात आले. भोजनानंतर प्रत्येक कन्येला स्कूल बॅग शालेय साहित्य, चुनरी व श्रृंगार अशा विविध वस्तू व प्रत्येकी दक्षिणा म्हणून रोख रक्कम देण्यात आली. प्रत्येक कन्येच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहत होता.…
तेजस्विनी दुर्गोत्सव मंडळातील मुलींनी रांगोळी काढून रतन टाटा यांना वाहिली श्रद्धांजली साईमत/यावल/प्रतिनिधी येथील लहान मारोती देशमुखवाडा जवळील तेजस्विनी दुर्गोत्सव मंडळातर्फे विजयादशमीच्या दिवशी मुलींनी उत्कृष्ट आकर्षक रांगोळी काढून उद्योगपती स्व.रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. ही रांगोळी वैष्णवी भोसले, अश्विनी ढाके, तेजस्विनी सोनार, मोहिनी भोसले, दिव्या भोसले, भाग्यश्री सोनार, लावण्या भोसले, नेहा भोसले यांनी साकारली. रांगोळीची संकल्पना मंडळाचे अध्यक्ष किशोर माळी यांनी मांडली. कार्यक्रमास किशोर माळी, दत्तू पाटील, घनश्याम पाटील, दिनेश माळी, प्रकाश भोसले, यशवंत भोईटे, पंकज माळी, स्नेहल फिरके, बाळू सोनार, नितीन माळी, गुड्डू माळी, वैभव माळी, निलेश माळी, वाल्मीक भोसले, संजय फिरके यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या. देशमुख वाडा,…
१७ वर्षाची अखंड परंपरा कायम साईमत/यावल/प्रतिनिधी तालुक्यातील महेलखेडी गावात विजयादशमीनिमित्त एसटीबसची उत्कृष्ट लक्षवेधी सजावट करून पूजन करण्यात आले. ग्रामस्थ आणि राज्य परिवहन महामंडळातील यावल आगारातील संबंधित त्यादिवशी ड्युटीवर असलेल्या वाहन चालकांची कौतुकास्पद प्रेरणादायी प्रथा गेल्या १७ वर्षांपासून सुरू आहे. महेलखेडी गावात यावल एसटी आगारातील बसचे विजयादशमीनिमित्त पूजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे महेलखेडी गावात चालक व वाहक, ग्रामस्थ यांच्यावतीने हा कार्यक्रम राबविला जातो. यंदाही बस पूजनाचा मान चालक सुनील महाजन, छाया महाजन यांचा मुलगा भावेश महाजन यांची पत्नी भाग्यश्री महाजन, मोठा मुलगा काशिनाथ महाजन यांची पत्नी सपना महाजन, वाहक तुषार कपले, सोनल कपले यांचा मुलगा लक्षित पुनित या दाम्पत्याला मिळाला. त्यांच्या हस्ते…
भाजपचे विधानसभा क्षेत्र प्रमुख माजी नगरसेवक घृष्णेश्वर पाटील यांचा स्वपक्षियांवर गंभीर आरोप साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे सुशोभिकरण उद्घाटन करण्यात येत आहे. चौकास आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या नावाची संकल्पना देवून आपले नाव त्यावर प्रकाशित करुन आमदारांनी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक, शिवप्रेमी संघटना तसेच चाळीसगाव शहरातील शिवभक्त जनतेचा आपण अनादर केला आहे, हे दुर्दैवी आहे. आ.मंगेश चव्हाण यांचे हे वागणे चाळीसगाव भाजपतील लोकशाही संपली असल्याचे विदारक सत्य असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक, भाजप विधानसभा क्षेत्र प्रमुख घृष्णेश्वर पाटील यांनी केला आहे.शासकीय विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी आ.मंगेश चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले. ते पुढे…
शांतता समितीच्या बैठकीतील चर्चेतून उमटला सूर साईमत/यावल/प्रतिनिधी शहरासह तालुक्यात काही कार्यालयातील अधिकाऱ्यांना काही ठराविक पदाधिकारी आपल्या राजकीय आजी-माजी पदाचा, कार्याचा प्रभाव आणि दबाव टाकून अधिकाऱ्यांना हेतुपुरस्कर त्रास देत आहेत. त्यामुळे अधिकारी वर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. याकडे खासदार, आमदार आणि राजकीय पक्षाच्या जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांनी आपले लक्ष केंद्रित करून आपल्या ‘त्या’ ठराविक पदाधिकाऱ्यांना समज देण्याची वेळ आली असल्याचे संपूर्ण अधिकारी, कर्मचारी, नागरिकांमध्ये चर्चिले जात आहे. यावल शहरातील शांतता कमिटीत ९५ टक्के सदस्य चांगल्या वर्तुणुकीचे, चारित्र्यशील संपन्न तथा शहरात जातीय सलोखा अबाधित राहण्याकामी सक्रिय कामकाज करणारे आहेत. परंतु काही चार-पाच सदस्यांचे उद्योगधंदे आणि वागणूक चारित्र्य लक्षात घेता ते स्वतः कायदा…
पिंगळवाडे शाळेचे उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय सोनवणे जिल्हास्तरीय “आदर्श शिक्षकरत्न” पुरस्काराने सन्मानित साईमत/अमळनेर/प्रतिनिधी तालुक्यातील पिंगळवाडे जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील तथा तंत्रस्नेही शिक्षक दत्तात्रय सोनवणे यांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन जिल्ह्यातील जामनेर येथील जिनियस मास्टर्स फाउंडेशन संस्थेतर्फे दिला जाणारा 2024-25 या वर्षाचा जिल्हास्तरीय “आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार” प्रदान करण्यात आला. फाउंडेशनतर्फे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एक शिक्षक याप्रमाणे १४ शिक्षक व जामनेर तालुक्यातील प्रत्येक केंद्रातून एक शिक्षक तसेच शिक्षण, कृषी, पोलीस, महसूल, आरोग्य आदी विभागातील प्रत्येकी एक अधिकारी-कर्मचारी याप्रमाणे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ४६ पुरस्कारार्थींना सन्मान पदक, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले. जामनेर येथील एकलव्य विद्यालयाच्या सावरकर सभागृहात…