रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल, एकास घेतले ताब्यात साईमत/रावेर/ विशेष प्रतिनिधी तालुक्यातील पाल येथे एक संशयित इसम स्वत: जवळ गावठी पिस्तूल घेवून मध्य प्रदेश राज्यातून पाल गावातून महाराष्ट्रात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक गोपनीय माहिती रावेर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या गोपनीय माहितीप्रमाणे रावेर पोलीस स्टेशन हद्दीतील पाल दुरक्षेत्र अंतर्गत पाल ते खरगोन रस्त्यावरील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लावण्यात आलेल्या नाकाबंदीत जावून पोलिसांचे पथक कार्यवाही करत होते. अशातच शनिवारी, २६ ऑक्टोबर रोजी रात्रीच तात्काळ पाल येथे रवाना होवून शेरी नाका येथील नाकाबंदी येथे थांबलो असतांना मध्यरात्रीच्या सुमारास मिळालेल्या माहितीप्रमाणे पेहराव केलेला इसम गावठी देशी बनावटीचे पिस्तूल विनापरवाना बेकायदेशीररित्या त्याच्या कब्जात बाळगतांना आढळून आला.…
Author: saimat
जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर केलेला नाही साईमत/अमळनेर/प्रतिनिधी तालुक्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार व सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचा पंचनाम्याचा अहवालच अद्यापही जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत कशी मिळणार?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुका प्रशासन निवडणुकांच्या कामात तर पुढारी उमेदवारीत व्यस्त असल्याने ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पंचनामा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचा पंचनामा कोण करेल? शासन दरबारी शेतकऱ्यांनी निवेदन, धरणे आंदोलन करूनही शासन कुंभकर्णी झोप घेत असेल तर भारतासारख्या कृषी प्रधान देशात जगाचा पोशिंदा वाऱ्यावर पडला असल्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पावसाने कापणीला आलेल्या पिकांचे नुकसान होऊनही दखल अद्यापपावेतो घेतली गेलेली नाही.…
विद्यालयातील विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींची मतदार जनजागृती रॅली उत्साहात साईमत/मलकापूर/प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांमध्ये जागृती निर्माण व्हावी, सर्व कामे बाजुला सोडुन शंभर टक्के मतदारांनी निवडणुकीमध्ये मतदान करावे, हा भव्य उद्देश डोळयांसमोर ठेवुन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मलकापूर संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार तहसीलदार शिल्पा बोबडे, गटविकास अधिकारी उध्दव होळकर, मुख्याधिकारी आशिष बोबडे, नायब तहसिलदार श्रीकृष्ण उगले, गटशिक्षणाधिकारी एन.जे.फाळके यांचेमार्फत मलकापूर शहरात शुक्रवारी रोजी ५०० विद्यार्थ्यांच्या भव्य रॅलीचे आयोजन केले होते. नायब तहसिलदार श्रीकृष्ण उगले यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून नूतन विद्यालय येथुन रॅलीला प्रारंभ झाला. त्यावेळी विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीचे समारोपीय भाषणात सर्व अधिकारी यांनी सर्व विद्यार्थी,…
एनसीसीच्या “एक भारत श्रेष्ठ भारत” राष्ट्रीय स्तरीय शिबिरात जनता महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग साईमत/मलकापूर/प्रतिनिधी येथील जनता कला, वाणिज्य महाविद्यालयातील १५ मुले आणि ७मुलींनी १४ ते२४ ऑक्टोबर या कालावधीत जळगाव, खान्देश, भांबोरी, महाराष्ट्र येथे आयोजित केलेल्या एनसीसीच्या राष्ट्रीय स्तरावरील “एक भारत श्रेष्ठ भारत” शिबिरात महत्त्वपूर्ण योगदान दिले. शिबिरात देशभरातील ६०० एनसीसीचे कॅडेट्स सहभागी झाले होते. ज्याचा उद्देश भारताची विविधता आणि सांस्कृतिक वारसा समजून घेणे आणि एकात्मतेची भावना मजबूत करणे होते. शिबिरात जनता महाविद्यालयाच्या २१ विद्यार्थ्यांनी सैनिकी प्रशिक्षण, गटचर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा व विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. त्यांनी केवळ स्पर्धांमध्येच उत्कृष्ट कामगिरी केली नाही तर राष्ट्रीय एकात्मता आणि…
रा.काँ.च्या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांनी घेतली आक्रमक भूमिका साईमत/चाळीसगाव /प्रतिनिधी चाळीसगाव विधानसभा मतदार संघाची जागा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उबाठा गटाला सुटल्यानंतर त्याचे पडसाद गेल्या दोन दिवसांपासून चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात उमटत आहे. चाळीसगाव शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटातील कार्यकर्ते नाराजी व्यक्त करीत आहे. त्या अनुषंगाने माजी आमदार राजीवदादा देशमुख यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थित चिंतन बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, ज्येष्ठ नेते प्रदीपदादा देशमुख, सतीश दराडे, किसनराव जोर्वेकर, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांच्यासह रा.काँ.चे सर्व नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना व्यक्त होतांना दिसून…
विक्रेत्यांकडून समाजातील लोकांची माफी मागून सर्वांचे झाले समाधान साईमत/बोदवड/प्रतिनिधी तालुक्यातील जामठी येथे अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, अशा आशयची मागणी ग्रामस्थांच्यावतीने निवेदनाद्वारे केली होती. दोन दिवस बोदवड पोलीस स्टेशनकडून अवैध दारू विक्रेत्यांवर छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर विक्रेत्यांनी तात्पुरती दारू विकायचे बंद केले. दारूमुळे गावातील १५ ते २५ वयोगटातील मुले व्यसनाधीन झाल्यामुळे काहींचे संसार उद्ध्वस्त झाले. हा रोष अनेक महिलांच्या मनामध्ये असून मोठ्या संख्येने महिला रस्त्यावर उतरून दारूबंदीचे घोषणा दिल्या. पोलिसांची गाडी गावात येताच सर्व दारू विक्रेत्यांनी दारूचे खोके लंपास केले. जामठी येथील काही नागरिकांच्या निदर्शनास आढळून आले की, अवैध दारू विक्रेते दारू विकत आहे, अशी माहिती मिळताच गावातील…
पीआय भोळे यांच्यासह पीएसआय सुजित पाटील यांचे होतेय कौतुक साईमत/बोदवड/प्रतिनिधी बोदवड पोलीस स्टेशनकडील पीएसआय सुजित पाटील हे मॉर्निंग वॉक करत असताना बस स्थानक बोदवड येथे सुरक्षेच्या दृष्टीने फेरफटका मारत असताना दोन मुली तोंडाला स्कार्फ बांधून बसलेल्या दिसल्या. गर्दीतही सुजित पाटील यांच्या चाणाक्ष नजरेने ह्या मुली काहीतरी संशय निर्माण करणाऱ्या आहेत, हे ओळखले. सुजित पाटील यांनी मुलींची विचारपूस केल्यावर त्या मुली जामनेर तालुक्यातील बेटावद बु.येथील असल्याची माहिती समोर आली. सुजित पाटील यांनी मुलींना विश्वासात घेऊन अधिक माहिती विचारल्यावर मुली पालकांना न सांगता घरातून पळून आल्या होत्या. भुसावळ येथुन दूर जाण्याच्या तयारीत होत्या. तेव्हा सुजित पाटील यांनी तत्काळ हा प्रकार पो.नि. श्री.भोळे…
अंत्योदय रेशन योजनेचा लाभ मिळाल्यावर दिव्यागांच्या चेहऱ्यावर उमटला आनंद साईमत/लोहारा, ता.पाचोरा/प्रतिनिधी दिव्यांगांना शासनाच्या अन्नपुरवठा योजनेतून अंत्योदय शिधापत्रिकाचा लाभ मिळत नसल्याने दिव्यांग बांधव योजनेपासून वंचित राहत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या शासन आदेशानुसार दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय शिधापत्रिका कार्ड देताना प्राधान्य देण्यात यावे, असा आदेश आहे, असे असतानाही दिव्यांग कायदा-२०१६ च्या दिव्यांग व्यक्तींना हक्क अधिनियम कायद्यानुसार दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय अन्न शिधापत्रिका योजनेचा लाभ मिळणे गरजेचे आहे. त्यानुसार दिव्यांगांना अंत्योदय रेशन कार्ड मिळावे, यासाठी लोहारा येथील एकता दिव्यांग बहुउद्देशीय संस्थेच्या प्रतिनिधींनी पाचोरा तहसीलदार यांना विविध निवेदने दिली होती. अशातच लोहारा येथील स्वस्त धान्य दुकान येथून दिव्यांगाना अंत्योदय रेशन योजनेचा…
उपकोषागारात होणार जमा : निवडणूक निर्णय अधिकारींची माहिती साईमत/चोपडा/प्रतिनिधी तिरंगा चौक श्रीनाथ प्राईड येथे २४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास होंडाई व्हेन्यू कंपनीची गाडीत तीस लाख रुपयांची रोकड आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून नाकाबंदी तपासणी केली जात असतांना हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही रक्कम कुणाची आणि कुठे घेऊन जात होते, हे अद्याप समोर आलेले नाही. निवडणूक पार्श्वभूमीवर उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. लवकरच सत्यता उघड होईल, असा दावा पोलिसांनी केला आहे. घटनेतील गाडी होंडाई व्हेन्यू कंपनीची क्र.एमपी०९-सीके७४७४ असा अाहे. तिच्यात ३० लाखांची रोकड मिळून आली. त्यात ५०० रुपये दराचे १५ लाख रुपये…
चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल साईमत/चोपडा/प्रतिनिधी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी अधिक तपास करीत अचानक एकाच्या घरी धाड टाकल्यावर २४ ऑक्टोबर रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास मोहम्मद कादिश शेख आयुब (वय ३८, रा.केजीएन कॉलनी, नायरा पेट्रोल पंपच्या मागील गल्ली) राहत असलेल्या घरात घराच्या बाजूस असलेल्या गोडाऊनमध्ये प्रतिबंध असलेल्या पान मसाला व सुगंधित तंबाखू, जर्दा एक लाख ८७ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तो पहाटेच विक्री करतांना आढळून आल्याने चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी त्याला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक, महेश्वर रेड्डी यांनी नाकाबंदी करण्याबाबत आवश्यक त्या सूचना दिल्याप्रमाणे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस…