सातपुडा ऑटोमोबाईलकडून महिंद्राच्या एक्सइव्ही९इ , बीइ६ इ कारचे अनावरण जळगाव ( प्रतिनिधी) – सातपुडा ऑटोमोबाईलकडून महिंद्राच्या एक्सइव्ही९इ , बीइ६ इ कारचे अनावरण नुकतेच करण्यात आले. ना. गिरीश महाजन, ना. गुलाबराव पाटील, प्रमोद पाटील, मनोज पाटील , प्रा. डी. डी. बच्छाव,किरण बच्छाव, विनोद तराळ, छबीराज राणे, दिनेश सोनवणे, राजेश जगताप (एरिया सेल्स मॅनेजर) यांच्या उपस्थितीत हे अनावरण करण्यात आले. महिंद्रा कंपनीच्या दोन इलेक्ट्रिक एसयुव्ही कारने बाजारात दिमाखात प्रवेश केला. या दोन खास कार जळगावच्या बाजारात उतरवण्यात आल्या आहेत. 500 पेक्षा जास्त किलोमीटर रेंज, ॲडास लेवल टू प्लस -प्लस, 19 ईंची टायर, 150 लिटर फ्रंक, Be -6 या मॅाडेलमधे 400 प्लस लिटरपेक्षा…
Author: saimat
विद्यापीठात हेल्मेटसक्ती जळगाव ( प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात दुचाकी वाहनांसाठी हेल्मेटसक्ती करण्यात आली असून १४ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरु झाली आहे. हेल्मेट परीधान न करणाऱ्यांना विद्यापीठ प्रवेशद्वारापासून आत प्रवेश देण्यात आला नाही. १३ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाने सूचना काढून दुचाकी वाहनांसाठी हेल्मेट सक्ती व चारचाकी वाहनांसाठी सिटबेल्टचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. १४ फेब्रुवारी पासून विद्यापीठाच्या राष्ट्रीय महामार्गाजवळील मुख्य प्रवेशद्वार तसेच मुलांचे वसतीगृहाजवळील प्रवेशद्वाराजवळ हेल्मेट न घालणाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. प्रवेशद्वाराजवळ दुचाकी वाहन लावून अनेक जण पायी विद्यापीठात आले. ६० पेक्षा अधिक वाहनांना रोखण्यात आले.
कुसुंबा शिवारातून घोडा चोरणारे कोंबडी बाजार , शिवाजीनगरातील चोर अटकेत जळगाव (प्रतिनिधी ) – कुसुंबा शिवारात मोकळ्या जागेत बांधलेला घोडा चोरणाऱ्या ३ आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी २४ तासांच्या आत शोधून गजाआड केले . त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आलेला घोडा पोलिसांनी मालकाच्या हवाली केला आहे फिर्यादी नामे कृष्णा जोशी ( वय २७, रा सिंधी कॉलनी, गणेश नगर) यांचा घोडाबग्गीचा व्यवसाय आहे. त्यांचा १ लाख रुपये किंमतीचा सिंधी जातीचा घोडा त्यांनी कुसुंबा शिवारात मोकळ्या जागी बांधलेला होता ९ फेब्रुवारीरोजी दुपारी अज्ञात चोरांनी हा घोडा चोरुन नेला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसीचे पो नि संदीप पाटील यांनी पोउनि राहुल तायडे,…
जी. एच. रायसोनी महाविद्यालयाला शिक्षण मंत्रालयाचे ‘३ . ५’ स्टार’ रेटिंग जळगाव (प्रतिनिधी ) — शहरातील स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटला केंद्रीय शिक्षण मंत्रालय व इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल अंतर्गत वर्षभर घेण्यात आलेल्या उपक्रमाचे परीक्षण करून भारत सरकारने सलग तिसऱ्या वर्षी ‘३.५’ स्टार रेटिंग’ देऊन सन्मानित केले. दरवर्षी शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलतर्फे भारतातील महाविध्यालयांमध्ये स्टार्ट-अप संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांसाठी हे रेटिंग दिले जाते. यंदा देशभरातून ५,४५५ संस्थांनी सहभाग नोंदविला होता. यात ‘३.५’ मानांकन मिळविणारे रायसोनी महाविद्यालय उत्तर महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे. तंत्रशिक्षणात रायसोनी इन्स्टिट्यूट सतत नवीन उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या विकासाचा आलेख उंचावत असते. ‘इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल’…
छोटा हत्ती चोरणाऱ्या दोघांना पकडले जळगाव (प्रतिनिधी ) – तालुक्यातील कुसुंबा येथून मालवाहू छोटा हत्ती चोरी केल्याच्या गुन्ह्यातील दोन चोरट्यांना एमआयडीसी पोलीसांनी मास्टर कॉलनीतून अटक केली या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती मंगळवारी दुपारी पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क विभागाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात दिली आहे. स्वप्नील राठोड (रा. कुसुंबा) यांचे ९ लाख रूपये किंमतीचे मालवाहू वाहन क्रमांक (एमएच १९ सीएक्स ०३९०) राहत्या घरासमोरून चोरून नेले होते. २२ जानेवारीरोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या तपास पथकाने घटनास्थळ आणि त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपीने मास्क लावून बनावट चावीने…
अंकलेश्वर – बुऱ्हाणपूर महामार्गासाठी दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांच्याकडून बैठक जळगाव (प्रतिनिधी ) – युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांनी नवी दिल्ली येथील शास्त्री भवनात न्हाईच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी अंकलेश्वर – बुरहानपूर राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचा आढावा घेतला. हा महाराष्ट्र, गुजरात या राज्यांमधून जाणारा प्रस्तावित राष्ट्रीय महामार्ग आहे. हा महामार्ग कृषी उत्पादनांसाठी, विशेषतः केळी क्लस्टरसाठी, व्यापार संधी निर्माण करण्यास उपयुक्त ठरू शकतो. प्रकल्पाच्या डिझाईनच्या अंतिम रूपाला गती देण्याची तसेच जमिनीच्या अधिग्रहणासाठी शेतकऱ्यांना लवकर भरपाई देण्याची आवश्यकता असल्यावर त्यांनी भर दिला. या बैठकीला न्हाईचे भोपाळचे प्रादेशिक अधिकारी आर. पी. सिंग आणि जळगाव येथील प्रकल्प अधिकारी शिवाजी पवार…
राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत उन्हाळी हंगामासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज सादर करण्यास मुदतवाढ जळगाव (प्रतिनिधी ) – राष्ट्रीय खाद्यतेल अभियाना (तेलबिया) मध्ये बियाणे, औषधे, खते विभागाअंतर्गत बियाणे घटकामध्ये भुईमुग किंवा तीळ पिकांसाठी प्रमाणित बियाणे वितरण या घटकासाठी अर्ज करण्यासाठी १० फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र आता ही मुदत. १३ फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. उन्हाळी हंगाम २०२४-२५ अंतर्गत उन्हाळी भुईमुग व तीळ पिक समुहांतर्गत १०० टक्के अनुदानावर प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण व शेतीशाळा कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यासाठी लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. भुईमुग पिकासाठी कोल्हापूर , सातारा , सांगली , पुणे , अहिल्यानगर , नाशिक ,…
चिंचोली – नशिराबाद – उमाळा रस्ता व पुलाच्या कामासाठी 6 कोटी 60 लाख मंजूर जळगाव (प्रतिनिधी ) – जळगाव विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढवण्यास अडथळा ठरणाऱ्या नशिराबाद-उमाळे रस्ता बंद करून पर्यायी मार्ग म्हणून प्रमुख जिल्हा मार्ग 109 चे साखळी क्रमांक 13 / 00 ते 18 / 00 कि. मी. दरम्यान रुंदीकरण , चिंचोली ते नशिराबाद उमाळा रस्त्यापर्यंतचा वहिवाट रस्ता देणे व या रस्त्यावर नाल्यावर पूल बांधकामासाठी 6 कोटी 60 लाख 70 हजार रुपयांच्या निधीस सामान्य प्रशासन विभागाने मंजुरी दिली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी 5 जुलै 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार 10…
राहूल सोलापूरकरच्या अटकेसाठी तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जळगाव (प्रतिनिधी ) — छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत बदनामी कारक वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना १० फेब्रुवारीरोजी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाच्यावतीने सादर करण्यात आले. राहुल सोलापूरकर नामक अभिनेत्याने छत्रपती शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्यासंदर्भात बेताल, संदर्भहीन वक्तव्य करून महाराष्ट्रातील अनुयायांच्या भावनांना ठेच पोहोचवली आहे. सोलापूरकर यांनी या महापुरुषांचे कार्य व बुद्धिमत्तेला कमी लेखून अवमान केलेला आहे. सोलापूरकर इतिहासाचे अभ्यासक, संशोधकदेखील नाहीत त्यांनी संदर्भहीन विधाने करून बहुजन समाजाची दिशाभूल केली आहे. सोलापूरकर यांनी छत्रपती शिवरायांबद्दल…
निर्मल हॉटेलजवळ घडला अपघात : वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल साईमत/वरणगाव/प्रतिनिधी वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निर्मल हॉटेल समोरील महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत काहुरखेडा येथील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार रोजी रात्रीच्या सुमारास घडल्याने वरणगाव पोलिसात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर असे की, अज्ञात वाहनावरील चालक याने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन मयत विशाल सुरेश पाटील (वय २७, रा.काहुरखेडा) यास जोरात ठोस मारुन त्याच्या डोक्याला व डाव्या पायाला गंभीर दुखापत करुन त्याच्या मरणाला कारणीभूत होवून अज्ञात वाहन न थांबता पळुन गेला आहे. म्हणून चंद्रकांत शांताराम पाटील (वय ३५, पोलीस पाटील, काहुरखेडा, ता.भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात…