आ.किशोर पाटील यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : पाचोरा व भडगाव तालुक्यात सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील सर्व पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनानुसार पाचोरा तालुक्यात १६ सप्टेंबर रोजी १८६.८ मिमी, २२ सप्टेंबर रोजी १८६.८ मिमी आणि २३ सप्टेंबर रोजी १३९.८ मिमी असा तब्बल ५१३.४ मिमी पावसाचा विक्रमी आकडा केवळ तीन दिवसांत नोंदवला गेला आहे. भडगाव तालुक्यात २३ सप्टेंबर रोजी ९०.७० मिमी पावसाची नोंद झाली…
Author: saimat
पहूर येथील वाघुर नदीच्या पुलावर रहदारीला अडथळा साईमत/पहूर, ता. जामनेर/प्रतिनिधी : जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफवर वाघूर नदीवरील पहूर येथील पूल चक्क ‘पार्किंग’ मध्ये बदलला असून त्यामुळे महामार्गावरील रहदारीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. रविवारी पहूर येथे आठवडे बाजार भरत असल्याने खरेदीसाठी आलेले नागरिक आपली दुचाकी व चारचाकी वाहने थेट पुलावरच उभी करत आहेत. त्यामुळे पूल वाहनतळाचे रुप धारण करत असून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यासंदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी आवाहन केले आहे की, नागरिकांनी आपली वाहने बसस्थानक परिसरात व पुलावर लावू नयेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी टाळून अपघाताचा धोका कमी होईल. स्थानिक नागरिकांच्या…
एका मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची चाळीसगाव-सम्भाजीनगर मार्गावरील साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : चाळीसगाव-सम्भाजीनगर मार्गावरील कन्नड घाटात अज्ञात वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या घडकेत शहागंज, संभाजीनगर येथील एका मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.२३ रोजी सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान घडली.सिकंदर खान शेर खान (वय 56, शहागंज, संभाजीनगर) असे मयत इसमाचे नाव आहे. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदर खान शेर खान आपल्या मोटारसायकलीवरून (एम.एच.20 – जीएस 9273)ने संभाजीनगरकडे जात होते. दस्तुरी फाटा या ठिकाणी अज्ञात वाहनाने त्यांना मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर सिकंदर खान मोटारसायकलीसह रस्त्याच्या कडेला फेकले गेले व गंभीर जखमी झाले. घटनास्थळी माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे अंमलदार सुनील पाटील घटनास्थळी तातडीने पोहोचले.…
जयजयकार आणि भक्तिगीतांच्या गजरात परिसर दुमदुमूला साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : तालुक्यात नवरात्रोत्सवाची धामधूम जोरात सुरू आहे. शहर व ग्रामीण भागात भक्तिभावाने वातावरण उदंड आहे. यंदा नवरात्रीची पहिली माळ दि.२२ सप्टेंबर रोजी पाटणादेवी येथे संपन्न झाली. जिथे सकाळपासूनच तालुक्यातील विविध भागांतून आलेल्या भाविकांनी पावसाच्या रिमझिम सरींमध्ये देखील देवी दर्शनासाठी गर्दी केली. जयजयकार आणि भक्तिगीतांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला. यंदा शहरातील ६० आणि तालुक्यातील ३५ अशा एकूण ९५ नवरात्रोत्सव मंडळांनी ऑनलाईन नोंदणी करून देवीची स्थापना केली आहे. या काळात मंडळांकडून जल्लोषात देवी मूर्तींची मिरवणूक आयोजित केली गेली. तसेच, धार्मिक विधींसोबतच समाजोपयोगी उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचीही तयारी करण्यात आली आहे. घटस्थापनेसाठी आवश्यक…
मंदिरांमध्ये दिव्यांची रोषणाई; श्री क्षेत्र संगमेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे ‘ज्योतीं’चे स्वागत साईमत/पहूर, ता.जामनेर/प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवास दि.२२ पासून उत्साहात प्रारंभ झाला. येथे देविंच्या सर्व मंदिरांमध्ये दिव्यांची आरास साकारण्यात आली आहे.नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी निवासिनी मातेच्या वनी गडावरून ‘ज्योत ‘ घेऊन आलेल्या भाविकांचे श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टतर्फे ईश्वर हिवाळे यांनी स्वागत केले. गावातील जय भवानी माता मंदिर , संतोषी माता मंदिर , रेणुका माता मंदिर, दुर्गा भवानी माता मंदिर, ग्रामदैवत मरीआई मंदिर या सर्वच मंदिरांमध्ये घटस्थापना करण्यात आली असून विद्युत दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला आहे. यासोबतच गावात विविध ठिकाणी दुर्गा मंडळांनी मुर्त्यांची स्थापना केली असून भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.…
पाळधीत नेत्र तपासणी शिबिर; ५१० रुग्णांची तपासणी साईमत/पाळधी, ता.धरणगाव/प्रतिनिधी : जसे पाणी देणे ही माझी जबाबदारी मानली, तसेच दृष्टीदान देखिल आपली पवित्र जबाबदारी आहे. लोकांच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू पाहून खरी समाधानाची जाणीव होते. हे कार्य पुढेही सुरू राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथे जीपीएस मित्र परिवारातर्फे घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन शिबिराप्रसंगी केले. जिल्ह्यातील लोकसेवेच्या परंपरेत आणखी एक सुवर्ण पान जोडले गेले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रेरणेतून व जि.प. सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या प्रयत्नातून पाळधी येथे जिपीएस मित्र परिवारातर्फे नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन शिबिर…
जमिनीवर पडलेल्या इलेक्ट्रिक वायरचा धक्का लागून ४१ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : तालुक्यातील रुईखेडा येथे शेतात काम करत असताना जमिनीवर पडलेल्या इलेक्ट्रिक वायरचा धक्का लागून ४१ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकनाथ जगन्नाथ कांदले (वय ४१) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते रुईखेडा येथील रहिवासी आहेत. त्यांचा मृत्यू इलेक्ट्रिक शॉक लागून झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे. या घटनेची माहिती मयत एकनाथ कांदले यांच्या भावाने पोलिसांना दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ कांदले हे बटाईने केलेल्या शेतात काम करत होते. त्यावेळी जमिनीवर पडलेल्या बेवारस इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात आल्याने त्यांना विजेचा तीव्र…
काँक्रिटीकरणचे भूमिपूजन ; २७.५० कोटींच्या निधीतून १५ मी.चे रुंदीकरण पाळधी, ता.धरणगाव । जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा मार्ग आर्थिक व सामाजिक विकासाचा महामार्ग ठरणार आहे. अनेक अपघात, धूळधाण आणि रहदारीच्या त्रासातून प्रवाशांना दिलासा मिळणार असून जून २०२६ पर्यंत जरी मुदत असली तरी मार्चमध्येच हा रस्ता जनतेच्या सेवेत आणण्याचा निर्धार आहे. रस्त्याच्या कामावरील ठिकठिकाणी फलक लावून वाहतुकीला अडथळा होणार नाही याची ठेकेदारांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. याप्रसंगी प्रमुख म्हणून आ.राजुमामा भोळे उपस्थित होते. जळगाव शहरालगत दिर्घकाळ प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला अखेर गती मिळाली आहे. पाळधी ते खोटेनगर (५.२० कि.मी.) तसेच कालिंका माता मंदिर ते तरसोद महामार्ग…
भुसावळ प्रतिनिधी : दिपनगर निंभोरा (ता.भुसावळ) येथे वैकुंठवासी निवृत्ती छन्नु चौधरी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ संगीतमय श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा निंभोरा बु. (ता.भुसावळ) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज मंगळवार दि.९ ते १६ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत दैनंदिन श्रीमद् भागवत कथा सकाळी नऊ ते ११ दुपारी २ ते ५ या वेळेत कथेचे प्रवक्ते हभप गजानन महाराज धानोरा वाल्मीक आश्रम (चिंचखेडा, जामनेर) हे लाभले असून दररोज काकड आरती सकाळी ५ ते ६.३०, विष्णुसहस्त्रनाम सकाळी ६.३० ते ७.३०, हरिपाठ सायंकाळी ५.३० वाजता व किर्तन दररोज रात्री ९ ते १० या कालखंडात होणार असूनन काल्याचे कीर्तन…
बोदवड प्रतिनिधी : येथील जिल्हा परिषद जि.प.कन्या नंबर दोन मधील उपशिक्षिका संगिता देविदास शेळके यांना यावर्षीचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व आ.राजू मामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला यावर्षीचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संगीता देविदास शेळके यांनी किशोरवयीन मुलींच्या समस्या व त्यांचे निराकार करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अध्यापन करून त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण केली. संगिता शेळके यांनी विविध स्वरचित कवितांचा संग्रह केला. मनूर बुद्रुक येथील संगीता शेळके या बोदवड येथील बरडिया शाळेतील उपशिक्षक संजय देवकर यांच्या पत्नी असून वरणगाव येथील उपशिक्षक संतोष शेळके यांच्या भगिनी…