कारवाई संशयास्पद? ; सागवान लाकूड तस्कर फरार झाले की केले?, नागरिकांमध्ये चर्चा साईमत/यावल/प्रतिनिधी : यावल वनविभाग गस्ती पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शुक्रवार दि.३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री यावल पूर्व आणि पश्चिम कार्यालयापासून १० कि.मी.अंतराच्या आत असलेल्या कोरपावली गावाजवळ सापळा रचून सागवान लाकूड तस्करांवर कारवाई करण्यात आली.५१ हजार २०० रुपयाच्या साग चौपाटासह मोटरसायकली जप्तची कारवाई करण्यात आली. त्यातील २ आरोपी फरार झाले की फरार करण्यात आले? याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहे. ही कारवाई ३ रोजी रात्री १२.४५ वाजेच्या सुमारास करण्यात आली. याबाबत सातपुड्यातील तथा वनक्षेत्रातील सागवान व आडजात लाकूड व्यवसाय करणाऱ्यांमध्ये व वनविभागातील काही मोजक्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये केलेल्या कारवाईबाबत संशय व्यक्त…
Author: saimat
बऱ्हानपूर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात ५० वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : तालुक्यातील खामखेडा येथील बऱ्हानपूर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात ५० वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू रामा वाघ (वय ५०, रा.खामखेडा) असे मयताचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजू वाघ हे रात्री खामखेडा येथील बसस्थानकाजवळ रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी बाळू बुधा भोई (वय २८, रा. मेळसांगवे) यांच्या ताब्यातील बजाज पल्सर (क्र. एमएच १९ ईएन ६६३०) या दुचाकीने जोरदार धडक दिली. अचानक झालेल्या या धडकेत राजू वाघ यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघातानंतर…
शेतकऱ्यांना मानवी साखळी करून जावे लागतेय शेतात साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील धिंगापूर शिवारात शेतात जाण्यासाठीचा रस्ता शनिवारी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसात पूरात वाहून गेल्यामुळे तीन दिवसापासून निंबायती, जरंडी शिवारातील तीनशेच्यावर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे महत्वाच्या कामासाठी शेतकरी मानवी साखळीने जीव धोक्यात घालून जनावरांना चारा पाणी करण्यासाठी जात आहे धिंगापूर शिवारात जाण्यासाठी निंबायती आणि जरंडी शिवारातील शेतकऱ्यांना एकमेव सुकी नदीच्या पात्रातून रस्ता आहे. परंतु शनिवारी रात्री आलेल्या पुरामध्ये हा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे ३०० शेतकऱ्यांना या शिवारात जाता येत नाही. परंतु दूध काढणे, जनावरांना चारा पाणी करण्यासाठी या शिवारात जाणे आवश्यक झाले असून शेतकरी गटागटाने मानवी साखळी तयार करून…
लखनऊ–मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये भुसावळ आणि भादली दरम्यान ब्रेक सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : १ ऑक्टोबर रोजी लखनऊ – मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये भुसावळ आणि भादली दरम्यान ब्रेक सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने स्लीपर कोचमधून धूर निघाल्याची घटना घडली. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि संभाव्य अपघात टळला. प्रवाशांचा प्रवास सुरक्षीतपणे पुढे सुरू ठेवण्यात आला. ही घटना १ ऑक्टोबर २०२५ रोजी घडली. पुष्पक एक्सप्रेस नियोजित वेळेत भुसावळ स्थानकावरून सुटल्यानंतर भुसावळ–भादली दरम्यान असताना एस-४ क्रमांकाच्या स्लीपर कोचच्या चाकांजवळ अचानक धूर दिसून आला. ब्रेक सिस्टीममधील घर्षणामुळे ही समस्या उद्भवली असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे.घटना लक्षात येताच ट्रेन मॅनेजर आणि रेल्वे कर्मचारी…
इनरव्हील क्लबतर्फे वीटभट्टी कामगारांच्या मुलींना फ्रॉक, गोडधडीसह शालेय साहित्य भेट साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : भुसावळ येथील इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी यांनी आपल्या दत्तक घेतलेल्या नगरपालिका शाळा क्रमांक २ मधील कुमारींचे विधिवत पूजन साजरे केले. या शाळेत मुख्यत्वे वीट भट्टी कामगारांची मुले शिक्षण घेतात. त्यामुळे या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाला चालना मिळाली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील मुलींचे पूजन करून झाली. मुलींना फ्रॉक, सफरचंद, राजगिऱ्याचे लाडू, चिप्स, शृंगारसामग्री आणि हेअर पिन भेटवस्तू म्हणून दिल्या गेल्या. तसेच सर्व मुलं, मुलींना आणि शिक्षकांना क्लबच्या वतीने अल्पोपहार प्रदान करण्यात आला, ज्यामुळे कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे आनंद वाढवला गेला.कार्यक्रमासाठी क्लबच्या सदस्यांनी मनापासून मेहनत घेतली. यात मोना…
‘श्रीं’चे सुर्य वहन आहे साईमत/ पारोळा/प्रतिनिधी : येथे आज मंगळवारी ‘श्रीं’चे सुर्य वहन आहे. हे वहन सायंकाळी ६ वाजता श्री बालाजी महाराजांचा मंदिरापासून निघून बाजार पेठेतून नगरपालीकेजवळून पूर्वेस तलाव गल्लीतून महामार्गाने माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या घराजवळून बसस्थानकापासून पोलीस लाईनीत जाऊन तेथून पूर्वेस महावीर कॉलनीत माजी खासदार मोरेकाका यांचे घराजवळून परत हायवेने मा. आमदार आबासो चिमणराव पाटील यांचे घराजवळून न्यू बालाजी नगर तेथून माजी आ.चिमणराव पाटील यांच्या कार्यालयामार्गे गजानन कॉलनीतून महामार्गाने बोरी कॉलनीत माजी आ.डॉ.सतिष पाटील यांचे घराजवळून, माजी खा.ए.टी.पाटील यांच्या निवासस्थाना जावून दुपारी २ वाजता येईल.
मृत महेश हा विधवा आईचा एकुलता एक मुलगा ; न. पा. चे मुख्याधिकारी, तहसीलदार, तलाठी आदींनी दिली भेट साईमत/पाचोरा /प्रतिनिधी : अतिवृष्ठीमुळे शहरातिल कृष्णापुरी भागातिल टेकडीगल्लीत धाब्याचे घर अतिवृष्ठीमुळे कोसळल्याने एक १२ वर्षाचा मुलगा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मरण पावला तर दुसरा मुलगा जखमी झाला. मरण पावलेला महेश हा विधवा आईचा एकुलता एक मुलगा असून तिच्या वृध्दपकाळाची काठी हरपल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महेश नितिन राणे (वय १२) असे मयत झालेल्या बालकाचे तर योगेश बाळू पाटील असे जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, विठ्ठल काशिनाथ पाटील हे आपल्या मुलासह धाब्याच्या घरात राहत होते. घराच्या मागच्या बाजूस महेश आणि त्याचा…
पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली साईमत/ पारोळा/प्रतिनिधी : तालुक्यातील होळपिंप्री येथील २८ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा विहिरीतून पाणी काढत असताना पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.कल्पेश गोरख पाटील असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. कल्पेश पाटील हे मका कणीस मोडनीसाठी शेतात गेले होते. यावेळी विहीरीवर ते पाणी काढण्यासाठी गेले असता त्यांचा अचानक पाय घसरून तोल जाऊन ते विहीरीत पडले. पावसामुळे विहिरीचे पाणी जास्त असल्याने व पोहता येत नसल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला. बराच वेळ होऊनही मुलगा परत न आल्याने वडील गोरख पाटील हे बघण्यासाठी विहिरीजवळ गेले असता,…
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले. साईमत/ पाचोरा/प्रतिनिधी : राज्य शासनाने केंद्र सरकारची नवीन पीकविमा योजना स्वीकारली असली, तरी जुन्या योजनेतील पाच निकषांपैकी फक्त पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना विविध टप्प्यांवर दिलासा देणारे उर्वरित निकष रद्द झाल्यामुळे शेतकऱ्यांना योजनेतून फारसा फायदा होणार नाही, अशी भावना व्यक्त करत तालुक्यातील शेतकऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र या भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके, गुरे, घरे व शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या गंभीर संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत नवीन योजनेमुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टी, गारपीट, वादळ, पूर यांसारख्या नैसर्गिक…
विटनेर येथे शारदीय नवरात्रोत्सवनिमित्त उद्या यात्रोत्सव साईमत/ चोपडा/प्रतिनिधी : तालुक्यातील विटनेर येथे शारदीय नवरात्रोत्सव निमित्ताने चामुंडा माता मंदिरात उद्या दि.३० रोजी यात्रेचे आयोजन मंदिर समिती कडून करण्यात आले आहे . विटनेर येथे कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिर असून हे मंदिर परिसरातील भाविकांसाठी श्रद्धास्थान मानले जाते. संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या मंदिरात काळभैरव, गणपती यांची स्थापना मंदिर आवारात करण्यात आली आहे. हे मंदिर वर्षभर भक्तासाठी उघडे असते. मंदिरात सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस आरती करण्यात येते. नवरात्र उत्सव काळात संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण असते. तसेच हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रला या मंदिरात विशेष भाविकांची मोठी गर्दी होते.…