जळगावातील दोन मोठ्या चोरीचे गुन्हे उघडकीस साईमत /जळगाव /प्रतिनिधी : शहरातील घरफोडींच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला स्थानिक पोलीसांनी मोठा फटका दिला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या यशस्वी कारवाईत आंतरराज्यीय अट्टल गुन्हेगार चंदन राजू जुनी याला पुण्यातील हडपसर परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून, त्याने जळगावातील दोन मोठ्या घरफोडींच्या गुन्ह्यांची कबुली दिली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी दोन स्वतंत्र पथकांची स्थापना करून तपास सुरू केला होता. शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने विश्लेषण करून संशयित आरोपीची ओळख पटविण्यात पोलीस यशस्वी झाले. चंदन राजू जुनी (वय ४५, रा.…
Author: saimat
मनोरंजनातून मतदानाचे प्रबोधन; प्रभाग १६ मधील महिलांचा उत्साह ओसंडून वाहला साईमत /जळगाव /प्रतिनिधी : जळगाव शहरातील अयोध्या नगर परिसरातील ‘शिवम योगा सेंटर’ येथे प्रभाग १६ मधील महिलांसाठी नुकताच हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले. अपक्ष उमेदवार हर्षाली मनीष कोल्हे आणि इच्छा दीपक अत्तरदे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पारंपरिक सण साजरे करताना महिलांना मतदानाबाबत प्रबोधन देखील देणे. कार्यक्रमाची सुरुवात हर्षाली कोल्हे आणि इच्छा अत्तरदे यांनी उपस्थित प्रत्येक महिलेचे वैयक्तिकरीत्या स्वागत करून त्यांना हळदी-कुंकू लावून केली. दैनंदिन घरगुती कामांच्या व्यापातून महिलांना विरंगुळा मिळावा, या उद्देशाने विविध सांस्कृतिक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांमध्ये संगीत खुर्ची, फुगडी, लंगडी आणि पारंपरिक गाण्यांच्या…
घरांचे कुलूप तोडून रोख रक्कम, दागिने व मौल्यवान वस्तू चोरून नेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले साईमत /जामनेर/प्रतिनिधी : तालुक्यातील सामरोद गावात मध्यरात्री १ ते २ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकाणी धाडसी घरफोडी करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेत अज्ञात चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत इंद्राबाई चौधरी, गोविंद नारायण चौधरी आणि रमेश झाल्टे यांच्या घरांचे कुलूप तोडून रोख रक्कम, दागिने व मौल्यवान वस्तू चोरून नेल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. एका घरात घरमालक झोपेत असतानाच ही घटना घडल्याने चोरट्यांचा धाडसीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. सकाळी घरफोडीचा प्रकार…
निःस्वार्थ अध्यापनाचा गौरव; भगीरथ इंग्लिश स्कूलच्या किरण व किशोर पाटील यांचा टिळक महाराष्ट्र विद्यापीठात सन्मान साईमत /जळगाव /प्रतिनिधी : शिक्षण क्षेत्रात केवळ कर्तव्य म्हणून नव्हे, तर सेवाभावातून ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांचा गौरव होणे ही समाजासाठी प्रेरणादायी बाब मानली जाते. जळगाव येथील कै. सुनिता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूलमधील आदर्श व उपक्रमशील इंग्रजी विषयाचे शिक्षक किरण विठ्ठल पाटील आणि किशोर प्रताप पाटील यांचा टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत शाळांमध्ये घेण्यात येणाऱ्या इंग्रजी प्रि-एलिमेंटरी, इंग्रजी एलिमेंटरी, इंग्रजी ज्युनिअर व इंग्रजी सीनियर या विविध स्पर्धांसाठी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन गेल्या पंधरा वर्षांपासून…
मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतला ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाचा आनंद साईमत /जळगाव /प्रतिनिधी : मराठी भाषेचे महत्त्व, मराठी शाळांची ओळख आणि त्यांची सद्यस्थिती प्रभावीपणे मांडणाऱ्या ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ या मराठी चित्रपटाचा विशेष खेळ जळगाव येथील महानगरपालिका केंद्र शाळा क्रमांक २ मधील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ चित्रपट पाहण्याचा आनंदच मिळाला नाही, तर मराठी भाषेबद्दल अभिमान निर्माण करणारा एक भावनिक आणि प्रेरणादायी अनुभवही मिळाला. या विशेष खेळाला वेगळेच महत्त्व लाभले ते म्हणजे प्रसिद्ध मराठी अभिनेते सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ यांनी स्वतः थिएटरमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. चित्रपटातील कलाकारांना प्रत्यक्ष समोर पाहण्याचा अनुभव अनेक विद्यार्थ्यांसाठी…
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्वरित निलंबनाची कारवाई केली साईमत /जळगाव /प्रतिनिधी : जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागातील दोन कर्मचाऱ्यांवर बोगस दिव्यांगत्व प्रकरण उघडकीस आले असून, मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी दोघांवर निलंबनाची कारवाई केली आहे. ही कारवाई राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार हाती घेतलेल्या तपासणी मोहिमेतून समोर आली आहे. राज्यातील दिव्यांग कर्मचारी व दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांगत्व प्रमाणपत्राची तपासणी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम हाती घेतली होती. या तपासणी दरम्यान पाचोरा पंचायत समितीत कार्यरत वरिष्ठ सहाय्यक लेखा विक्रम सुरेश पाटील आणि धरणगाव पंचायत समितीत कार्यरत कनिष्ठ सहाय्यक लेखा संतोष लक्ष्मण पाटील यांची नियुक्ती दिव्यांग प्रवर्गातून करण्यात आल्याचे दिसून आले. तपासणी दरम्यान जळगाव…
मालेगाव येथील दुचाकीस्वाराचा मृत्यू साईमत /चाळीसगाव/प्रतिनिधी : रस्त्याच्या बाजुला नादुरुस्त उभी असलेल्या पिकअप व्हॅनला मागून येणाऱ्या दुचाकीने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना दि.९ जानेवारी रोजी रात्री सुमारे २ वाजेच्या सुमारास घडली. घटनेची चाळीसगाव पोलिसात नोंद करण्यात आली आहे. तौकीर अली पिरजादे (रा.मालेगाव) असे मयताचे नाव आहे. दि.९ जानेवारी रोजी रात्री सुमारे २ वाजेच्या सुमारास धुळे कडून चाळीसगाव मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाणारे एक पिकअप वाहन भोरस फाट्याजवळ रस्त्यात नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याचवेळी मागून येणाऱ्या एका दुचाकीने उभ्या असलेल्या पिकअप वाहनाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी…
इराण नागरिकेला आश्रय दिल्याप्रकरणी धरणगावात गुन्हा, दोन आरोपींना अटक साईमत /धरणगाव /प्रतिनिधी : शहरातील सराय मोहल्ला परिसरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इराण देशातील फरनाज हमीद रेझा मसाई (रा. तेहरान, इराण) आणि तिचा तीन वर्षांचा मुलगा सुफी अली यांना विनापरवानगी व व्हिजाची मुदत संपलेली असतानाही आश्रय दिल्याप्रकरणी धरणगाव पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक केली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धरणगावच्या कुरेशी मोहल्ल्यात राहणारे शेख रफीक शेख मुसा आणि शेख अहमद रजा शेख मुसा यांनी फरनाज मसाई आणि तिच्या मुलाला त्यांच्या घरी आश्रय दिला होता. तपासात समोर आले की, महिलेच्या व्हिजाची मुदत २०२२…
अप्सरा चौकात मोटारसायकल पार्किंगवरून तणाव; व्यापारी–ठेलेवाले पोलिस ठाण्यात साईमत /भुसावळ/प्रतिनिधी :: शहरातील गजबजलेल्या अप्सरा चौक परिसरात आज सकाळी मोटारसायकल पार्किंगवरून सुरू झालेला किरकोळ वाद काही वेळात तणावात रूपांतरित झाला. या घटनेमुळे थेट छबीलदास कपडा मार्केटमध्ये व्यवहार ठप्प झाले आणि परिसरात चिंता पसरली. अप्सरा चौकात सुमारे ११ वाजता, दुकानासमोर मोटारसायकल उभी ठेवण्याच्या कारणावरून एका लोडगाडी चालक आणि दुकानदारामध्ये शाब्दिक चकमक झाली. सुरुवातीला साधा वाद वाटला असला तरी, काही वेळातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. वादाची माहिती मिळताच आसपासच्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी छबीलदास कपडा मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.…
लहान वयात टोकाचे पाऊल; १४ वर्षीय मुलाचा मृत्यू साईमत /एरंडोल/प्रतिनिधी : एरंडोल तालुक्यातील टोळी येथे १४ वर्षीय निलेश सुरेश पाटील या मुलाने राहत्या घराजवळील पत्राशेडमध्ये गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मृतक निलेश (वय १४, मूळ रा. करवंद, ता. शिरपूर, जि. धुळे) सध्या टोळी येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. ७ जानेवारी रोजी अज्ञात कारणामुळे त्याने घराजवळील पत्राशेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना समजताच नातेवाईकांनी तातडीने त्याला ग्रामीण रुग्णालय, एरंडोल येथे नेले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. एरंडोल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस हेड कॉन्स्टेबल…