घरफोडी करून तब्बल १३१ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. साईमत/सावदा, ता. रावेर/प्रतिनिधी : घर बंद असल्याची संधी साधत रावेर तालुक्यातील चिनावल येथे चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल १३१ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. निवृत्त शिक्षक राजेंद्र मुरलीधर सरोदे यांचे घर फोडून हा सर्व मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली.तुकाराम वाडीतील रहिवासी राजेंद्र सरोदे हे भावाच्या निधनानंतर मूळ गावी खडका येथे गेले होते. विधीनंतर १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता ते चिनावलला परतले असता घराचा लोखंडी दरवाजा उघडा व मुख्य लाकडी दरवाज्याची कडी तुटलेली दिसली. याबाबत त्वरित सावदा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी…
Author: saimat
जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी सांस्कृतिक उपक्रम साईमत/पारोळा/प्रतिनिधी : येथील बोहरा सेंट्रल स्कूल मध्ये क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची जयंती व जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी सांस्कृतिक उपक्रमांतून जागरूकता सप्ताह साजरा करण्यात आला. संस्थेचे चेअरमन सुरेंद्र बोहरा, प्राचार्या शोभा सोनी, ॲडमिनिस्ट्रेटर वीरेंद्र सखा व शिक्षकांनी आदिवासी स्वातंत्र्य सेनानी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण, पूजनाने मानवंदना दिली.आदिवासी दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृती, सण,कला कौशल्य व वारली पेंटिंग,आदिवासी नृत्य इत्यादी सर्व बाबींची माहिती गोळा करून त्या मंचावर सादर केल्या.वर्ग सहावीच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी संस्कृतीचा गोडवा, भाषा,त्यांचे दैनंदिन जीवन,निसर्गाशी असलेले प्रेम व नृत्यातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले.महिला शिक्षकांनी ही आदिवासी नृत्यात सहभाग दर्शवून कार्यक्रमाची रंगत वाढविली.
प्राथमिक व माध्यमिक शाळेत बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. साईमत/जामनेर/प्रतिनिधी : म्हसावद येथील ज्ञानोदय शिक्षण प्रसारक मंडळ संचालित प्राथमिक व माध्यमिक शाळेत बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमास प्रमुख म्हणून संस्थेचे चेअरमन पंकजराव साळुंखे उपस्थित होते. यावेळी पंकजराव साळुंखे व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका तथा संचालिका दिपाली पाटील यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून कार्यक्रमची शोभा द्विगुणीत केली. यावेळी सुनील तापीराम बारेला यांनी विद्यार्थ्यांना बिरसा मुंडा यांच्याबद्दल अधिक माहिती विषद करून त्यांचे कार्य विद्यार्थ्यांसमोर मांडले. कार्यक्रमप्रसंगी शाळेतील शिक्षक, शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. उपक्रमशील शिक्षक एन.डी.चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले.
जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई साईमत/मलकापूर /प्रतिनिधी : जिल्ह्यात बेकायदेशीर बायोडिझेल वाहतूक करणाऱ्या रॅकेटवर जिल्हा प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत तब्बल २९,०३० किलो बायोडिझेल जप्त केले असून याप्रकरणी टँकर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या ऑपरेशनमुळे अवैध इंधन व्यापार करणाऱ्या टोळ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. वडनेर-मलकापूर रोडवर संशयास्पद अवस्थेत उभा असलेला (जी.जे.०३- डब्ल्यू.बी.३०३८) क्रमांकाचा टँकर प्रशासनाच्या नजरेस पडला. माहिती मिळताच तपास पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तपासणीदरम्यान टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात बायोडिझेल आढळून आल्यानंतर जप्तीची कारवाई करण्यात आली. प्रशासनाने जप्त केलेल्या २९,०३० किलो बायोडिझेलची एकूण किंमत ३३ लाख ३३…
दोन-अडीच वर्षांपासून रस्ता दुरुस्ती ठप्प; काम कागदोपत्री, नागरिक मात्र त्रस्त साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : तालुक्यात मंजूर झालेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामांची प्रत्यक्षात कोणतीही प्रगती न दिसता ती फक्त कागदोपत्री दाखवली जात असल्याचे धक्कादायक चित्र उघडकीस आले आहे. तालुक्यातील अनेक भागांत विकासकामांची नुसतीच घोषणा केली गेली, परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र होत नसल्याचे चित्र आता अधोरेखित झाले आहे. रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था असून, नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सन २०२३-२४ मध्ये सार्वजनिक बांधकाम उत्तर विभाग, जळगाव अंतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या दुरुस्तीकरिता तब्बल १५० लाख रुपये (दीड कोटी) निधी विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला होता. या कामाचे भूमिपूजनही आमदार…
टायगर स्कूलमध्ये विविध गीत,नाटिका,नृत्य, स्पर्धांनी बालदिन साजरा साईमत/पारोळा /प्रतिनिधी : येथील टायगर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालदिन सांस्कृतिक नाटिका,नृत्य,विविध स्पर्धांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिनाचे प्रमुख आकर्षण ठरले ते हळूहळू लोप पावत चाललेल्या पत्रलेखन या कला प्रकाराची विद्यार्थ्यांना दिली गेलेली ओळख आणि प्रत्यक्ष सराव. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पत्रप्रेमी व आदर्श शिक्षक स.ध.भावसार,सब पोस्ट मास्टर उमेश रहण तसेच धुळे टायगर किड्स स्कूलचे संचालक भरत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मार्गदर्शनात भावसार यांनी आपल्या आयुष्यात लिहिलेल्या तब्बल ५१ हजार पत्रांच्या अनुभवाचा उल्लेख करत पत्रलेखनामुळे लेखन कौशल्य, अभिव्यक्तीशक्ती आणि संवाद कौशल्य अधिक प्रभावी बनते, यावर प्रकाश टाकत पत्रांचे विविध प्रकार, त्यांची रचना,…
सार्वजनिक बांधकाम विभागाचे झोपेचे सोंग; नागरिकांचा आरोप साईमत/पहूर, ता.जामनेर /प्रतिनिधी : पहूर-शेंदुर्णी मार्गावरील पाण्याच्या टाकीजवळ अवघ्या वर्षभरातच मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक असलेल्या या मार्गावर खड्ड्यांमुळे वाहनचालकांची तारेवरची कसरत होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचा वापर झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “वर्षभरही न टिकणारा रस्ता म्हणजे जनतेच्या पैशांचा सरळसरळ अपव्यय”, असा संताप वाहनचालकांनी व्यक्त केला. खड्डे बुजवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणतीच ठोस कारवाई न केल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. स्थानिकांचा आरोप आहे की, विभाग तात्पुरती डांबरफेक करून वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे खड्डे काही दिवसांनी…
विद्यार्थ्यांनी विविध मॉडेल, देखावा, कलागुणांचे केले सादरीकरण साईमत/पारोळा /प्रतिनिधी : येथील एकमेव सीबीएसई बोहरा सेंट्रल स्कूलमध्ये पंडित जवाहरलाल नेहरू जयंती व बालदिनानिमित्त शाळेचे वार्षिक विज्ञान व कला प्रदर्शन तसेच लहान चिमुकल्यांसाठी आयोजित बालमेला उत्साहात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थाध्यक्ष सुरेंद्र बोहरा, सचिव प्रकाश बोहरा, डायरेक्टर गौरव बोहरा, प्राचार्या शोभा सोनी, ॲडमिनिस्ट्रेटर विरेंद्र सखा यांच्यासह उद्योजक गोपाल अग्रवाल, सीए मुकेश चोरडिया, भगवान गंभीर पाटील, डॉ.दिपाली शेंडे, मनिषा सोनवणे, पीटीए मेंबर डॉ.योगेंद्र पवार, सुप्रिया बिऱ्हाडे, नितेश निकम, शुभांगी राजपूत आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्याहस्ते पंडित नेहरू, देवी सरस्वतींच्या प्रतिमेस पुष्पहार, पूजन, दीपप्रज्वलन करून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रदर्शनामध्ये नर्सरी…
मानसिक विवंचनेतून पाचोरा तालुक्यातील नाचनखेडा येथील ३७ वर्षीय तरुणाने विषारी औषध सेवन केले साईमत/जळगाव/प्रतिनिधी : पत्नी माहेरी गेल्यानंतर निर्माण झालेल्या मानसिक विवंचनेतून पाचोरा तालुक्यातील नाचनखेडा येथील ३७ वर्षीय तरुणाने विषारी औषध सेवन केले. उपचार सुरू असताना शुक्रवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला. याबाबत जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समाधान संतोष पाटील (वय ३७, रा.नाचनखेडा) असे मयत तरुणाचे नाव आहे.नाचनखेडा येथे पत्नी, दोन मुले आणि आई-वडिलांसह वास्तव्यास असलेले समाधान पाटील हे प्लंबरचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांची पत्नी लहान मुलीला घेऊन माहेरी गेली होती आणि ती परत…
भिमटेकडी, छत्रपती संभाजीनगर येथे होणार ऐतिहासिक सोहळा; २५ देशांतील भिक्खु संघ व एक लाख उपासक सहभागी साईमत/मलकापूर /प्रतिनिधी : छत्रपती संभाजीनगर येथील भिमटेकडी परिसर पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर तेजाने उजळणार आहे. सुमारे ७० वर्षांनंतर येथे प्रथमच ‘जागतिक बौद्ध धम्म परिषद’ भव्य आणि ऐतिहासिक पद्धतीने आयोजित करण्यात आली असून २६, २७, २८ फेब्रुवारी ते १ व २ मार्च २०२६ या पाच दिवसांच्या कालावधीत हा सोहळा पार पडणार आहे. परिषदेतील सहभागी देशांची संख्या तब्बल २५ असून, विविध देशांतील तसेच महाराष्ट्रातील भिक्खु व भिक्खुनी संघ मोठ्या संख्येने दाखल होणार आहेत. त्याचबरोबर एक लाखांहून अधिक उपासक-उपासिका या भव्य सोहळ्यात सहभागी होणार असल्याने छत्रपती संभाजीनगर…