Author: saimat

मुजफ्फरनगर ः उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथील एका शाळेत शिक्षिकेने वर्गातील मुस्लीम विद्यार्थ्याला सर्वांसमोर उभे केले. त्याच्या धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले आणि वर्गातील उर्वरित विद्यार्थ्यांना त्याला मारण्यास सांगितले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी मारहाणीचा व्हिडीओ ट्वीट करत तीव्र प्रतिक्रिया दिली. असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “हा व्हिडीओ उत्तर प्रदेशचा आहे. शिक्षिकेने वर्गात इतर मुलांना एका मुस्लीम मुलाला मारण्यास सांगितले आणि त्याचा अभिमान असल्याचे म्हटले. पीडित मुलाच्या वडिलांनी मुलाला शाळेतून काढून घेतले आणि लेखी दिले की, त्यांना कुणावरही कारवाई करायची नाही. वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांना न्यायाची कोणतीही आशा नाही आणि त्यांना वातावरण खराब होईल अशी…

Read More

कोल्हापूर ः हसन मुश्रीफ यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्याने त्यांनी अजित पवार गटासह जात भाजपाला साथ दिली. त्यामुळे शरद पवारांनी त्यांच्या भूमिकेवर टीका केली. यावेळी हसन मुश्रीफांनीही शरद पवारांवर टीका करत शरद पवारांनी सहानुभूती दाखवली नाही, असे म्हटले. यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. पक्षाकडून आणि पक्षातील नेत्यांकडून सहानुभूती मिळाली नाही, असा दावा हसन मुश्रीफांनी केला असल्याबाबत प्रश्न पत्रकारांनी जितेंद्र आव्हाडांना विचारला. त्यावर ते म्हणाले की, काय करायचं साहेबांनी? साहेबांनी काय करावं अशी इच्छा आहे? सहानुभूती म्हणजे काय असते? तुमच्यासह मी उभा आहे हे सांगणे सहानुभूती नाही का? शरद पवारांनी अजून काय करावे…

Read More

मुंबई ः प्रतिनिधी मीरा रोड येथील राहत्या घरी एका ५५ वर्षीय महिलेने तिच्या पतीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, ही महिला मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे समोर आले असून तिला अटक करण्यात आली आहे. रमेश गुप्ता (६९) हे एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले होते. तर त्यांची पत्नी राजकुमारी या गृहिणी असून हे दाम्पत्य त्यांच्या ३० वर्षीय मुलासह मीरा रोड येथे आनंद सरिता इमारतीच्या तळमजल्यावर राहत होते. गुरुवारी सायंकाळी गुप्ता यांच्या फ्लॅटमधून आवाज आल्याने सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या शेजऱ्यांनी गुप्ता कुटुंबाकडे धाव घेतली. तेव्हा रमेश गुप्ता रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तर त्यांची पत्नी राजकुमारी मृतदेहाशेजारी उभी होती.…

Read More

ठाणे : कसारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह सापडले होते. मुंबई नाशिक महामार्गालगत असलेल्या खड्ड्यात मृतदेह फेकले असल्याची माहिती कसारा पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पहिला मृतदेह नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉईंट येथे, तर दुसरा मृतदेह वाशाळा फाटा या ठिकाणी १९ जून रोजी सापडला होता. दोन्ही मृतदेहांबाबत पोलिसांनी डॉग स्कॉड, फिंगर प्रिंट एक्सपर्ट, फॉरेनसिक लॅब यांना पाचारण करून पंचनामा केला असता त्यांचा खून करून मृतदेह घाटात फेकल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यानुसार मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरु केला. एकाच दिवशी दोन मृतदेह सापडल्याने जिल्हा…

Read More

बोदवड ः प्रतिनिधी बोदवड-सोनोटी येथील शिक्षक मुरलीधर पाटील यांंच्या मुलीचे पाच वर्षापुर्वी १८ वर्षी निधन झाले.या दुःखातून सावरत पाटील परिवाराने मुलीच्या नावाने स्व.प्रियंका पाटील बहुऊद्देशिय संस्था स्थापना केली व संस्थेच्या माध्यमातून दर वर्षी स्मृतीदिनानिमित्त विविध उपक्रम आयोजित करतात. यावर्षी सोनोटी गावात दिव्यांग बांधवांना, दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनेची माहिती संस्था अध्यक्ष मुरलीधर पाटील यांनी दिली तसेच कपडे वाटपही करण्यात आले. यावेळी मधुकर राणे,अनिल पाटील, सोपान पाटील, संगीता पाटील, राजेश ननवानी आदींची उपस्थिती होती.

Read More

यावल ः प्रतिनिधी यावल तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत डोणगाव इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालेल्या स्पर्धेत सातपुडा माध्यमिक विद्यालय नायगाव येथील दोन विद्यार्थी डिगंबर रविंद्र ठाकरे(१४ वर्षे वयोगट)व मयूर पंकज नन्नवरे(१७ वर्षे वयोगट)यांनी कुस्ती स्पर्धेत विशेष यश प्राप्त केले. या यशाबद्दल त्यांंचे जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे मानद सचिव तसेच अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, स्कूल कमिटी चेअरमन व संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक वाय.एम.नायदे सर,क्रीडा शिक्षक व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Read More

जळगाव जामोद ः प्रतिनिधी तालुक्यातील पडशी सुपो येथे स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उदयन विद्या महाविद्यालयातील अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी रावे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम या अंतर्गत गावातील अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम यशस्वी केला आहे.या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गावातील आपल्या दिलेल्या अंंधश्रद्धा,रूढी परंपरेच्या नुकसानाबाबत समजावून त्यांंना त्यांच्या विचारातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा प्राजक्ता बोंबटकार व सचिव प्रमिला बोंबटकर या होत्या.यावेळी महिला मंडळाच्या इतर सदस्या व गावकरी तसेच उद्यान विद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अनुराग नारखेडे,आदित्य पाटील,सुरज मुंडे, सुचित मसाज,कृष्णा सूर्यवंशी,रोहित महाले यांनी परिश्रम घेतले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विशाल तायडे, उपप्राचार्य प्रा. सतीश धर्माळ,कार्यक्रमाधिकारी प्रा.प्रितेश वानखेडे व विषय…

Read More

बोदवड ः प्रतिनिधी तालुक्यातील नाडगाव ग्रामपंचायतवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकलेला दिसून येत आहे. श्रीमती अश्विनी नरेंंद्र कुरपाडे या शिवसेना शिंदे गटाच्या महिला सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत. ठरल्याप्रमाणे अडीच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर श्रीमती कविता श्रीकृष्ण लासुलकर यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त झाले होते.त्यामुळे पुन्हा निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली होती त्यामध्ये महिला राज पुन्हा ग्रामपंचायतीवर आले असल्याचे निदर्शनास येत आहे. महिला सक्षमीकरण तसेच महिला विकास होण्यासाठी महिलांना सक्षम होण्याची गरज दिसून येत आहे त्याच पावलावर पाऊल टाकत अश्विनी कृपाळे यांची सरपंच म्हणून निवड झाल्याने गावातील सर्वस्तरातून त्यांंचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे. सामाजिक संघटना तसेच राजकीय संघटनांनी पाठबळ दिल्याने…

Read More

फैजपूर ता.यावल : प्रतिनिधी दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत असून वाहने, कारखाने व हरितगृहातून उत्सर्जित होणाऱ्या विषारी वायु, दूषित पाणी व किरणोत्सारांमुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. ग्लोबल वॉर्मिग, ऋतूमधील अनियमितता आणि तीव्रता वाढली आहे.त्यातच मानवाने जंगलतोड करून जमीन संपादित केली आणि त्यावर सिमेंंटची जंगले व कारखाने उभारले आहेत. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून धनाजी नाना महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक शिवाजी मगर यांनी वाढदिवसाच्या औचीत्याने वृक्षारोपण करून पर्यावरण पूरक वाढदिवस साजरा केला व दर वाढदिवसाला वृक्षारोपणाचा संकल्प सोडला. यासोबत संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, परिसर स्वच्छता व प्रदूषण विरहित वातावरणासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले.प्रा. शिवाजी मगर यांनी…

Read More

फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे विद्यार्थी विकास विभाग आणि नगर परिषद फैजपूर यांंच्या संयुक्त विद्यमाने ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान कार्यक्रम साजरा करण्यात आला. फैजपूर नगरपालिकेचे अधिकारी दिलीप वाघमारे, संगिता बाक्षे, सुहास नेहेते, प्रसन्न डोलारे, टी. एन. चौधरी, प्रविण सपकाळे यांच्या हस्ते ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या शासनाच्या कार्यक्रमांतर्गत स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण घटनेचे पाईक असलेले १९३६ चे राष्ट्रीय ग्रामीण अधिवेशनाच्या भूमीतील माती घेण्यात आली. या ग्रामीण अधिवेशनाची आठवण देणारे धनाजी नाना महाविद्यालय फैजपूरच्या प्रांगणात उभारलेला ‘प्रेरणास्तंभ’ या इतिहास वास्तूला अभिवादन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए.आय. भंगाळे, उप प्राचार्य…

Read More