नैराश्यग्रस्त पत्नीकडून पतीची दगडाने ठेचून हत्त्या

0
2

मुंबई ः प्रतिनिधी

मीरा रोड येथील राहत्या घरी एका ५५ वर्षीय महिलेने तिच्या पतीची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान, ही महिला मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे समोर आले असून तिला अटक करण्यात आली आहे.

रमेश गुप्ता (६९) हे एका खासगी कंपनीतून निवृत्त झाले होते. तर त्यांची पत्नी राजकुमारी या गृहिणी असून हे दाम्पत्य त्यांच्या ३० वर्षीय मुलासह मीरा रोड येथे आनंद सरिता इमारतीच्या तळमजल्यावर राहत होते. गुरुवारी सायंकाळी गुप्ता यांच्या फ्लॅटमधून आवाज आल्याने सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या शेजऱ्यांनी गुप्ता कुटुंबाकडे धाव घेतली. तेव्हा रमेश गुप्ता रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तर त्यांची पत्नी राजकुमारी मृतदेहाशेजारी उभी होती. या प्रकारानंतर शेजाऱ्यांनी तत्काळ त्यांच्या मुलाला बोलावून घेतले.

हे प्रकरण समजातच नया नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी फ्लॅटवर पोहोचले.त्यांनी राजकुमारी गुप्ता यांना अटक केली आहे. तसंच, पोलिसांनी रक्ताने माखलेला दगड जप्त केला आहे. दरम्यान, राजकुमारी आणि रमेश गुप्ता यांच्यात वाद झाले. या वादातून रमेश गुप्ता यांची हत्या केली, अशी कबुली राजकुमारी यांनी दिली आहे परंतु त्यांच्यात कोणत्या कारणाने वाद झाला हे अद्याप समजू शकलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here