मानलेल्या बहिणीचा सोशल मीडियावर छळ करणाऱ्या

0
2

ठाणे :

कसारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन अज्ञात व्यक्तींचे मृतदेह सापडले होते. मुंबई नाशिक महामार्गालगत असलेल्या खड्ड्यात मृतदेह फेकले असल्याची माहिती कसारा पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पहिला मृतदेह नाशिक मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉईंट येथे, तर दुसरा मृतदेह वाशाळा फाटा या ठिकाणी १९ जून रोजी सापडला होता. दोन्ही मृतदेहांबाबत पोलिसांनी डॉग स्कॉड, फिंगर प्रिंट एक्सपर्ट, फॉरेनसिक लॅब यांना पाचारण करून पंचनामा केला असता त्यांचा खून करून मृतदेह घाटात फेकल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यानुसार मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरु केला. एकाच दिवशी दोन मृतदेह सापडल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी घटनास्थळाला भेट देत तपास यंत्रणा कार्यान्वित केली. भर महामार्गावर दोन जणांची हत्या करून त्यांचे मृतदेह खड्ड्यात टाकून देण्यात आले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवत छडा लावला आहे.

या दुहेरी खुनातील मुख्य आरोपी मनोज नाशी याच्या लोणी येथे राहणाऱ्या मानलेल्या बहिणीस मयत सुफीयान सिराबक्ष घोणे (वय ३३ वर्ष, रा. लोणी) व साहिल पठाण (वय २१ वर्ष, रा. सोनगाव) हे अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर त्रास देत होते. याचा राग मनात ठेवून मनोज याने आपल्या साथीदारांच्या मदतीने शिर्डी परिसरात सुफीयाना घोणे व साहिल पठाण यांचा खून केला. नंतर त्यांचा मृतदेह चादरीत गुंडाळून तो कसारा घाटात वेगवेगळ्या ठिकाणी फेकला असल्याची कबुली आरोपींनी पोलिसांना दिली आहे.

दरम्यान पोलिसांनी या दुहेरी हत्याकांडातील आरोपीला तब्बल दोन महिन्यांनी अटक केली आहे. दोन जणांचा खून करून त्यांचे मृतदेह कसारा घाटात फेकणाऱ्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here