आदर्शवत्‌‍‍, मनुदेवीच्या डोंगरराशीत वृक्षारोपणाने केला वाढदिवस साजरा

0
3

फैजपूर ता.यावल : प्रतिनिधी

दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत असून वाहने, कारखाने व हरितगृहातून उत्सर्जित होणाऱ्या विषारी वायु, दूषित पाणी व किरणोत्सारांमुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. ग्लोबल वॉर्मिग, ऋतूमधील अनियमितता आणि तीव्रता वाढली आहे.त्यातच मानवाने जंगलतोड करून जमीन संपादित केली आणि त्यावर सिमेंंटची जंगले व कारखाने उभारले आहेत. या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून धनाजी नाना महाविद्यालयाचे वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक शिवाजी मगर यांनी वाढदिवसाच्या औचीत्याने वृक्षारोपण करून पर्यावरण पूरक वाढदिवस साजरा केला व दर वाढदिवसाला वृक्षारोपणाचा संकल्प सोडला.

यासोबत संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, परिसर स्वच्छता व प्रदूषण विरहित वातावरणासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले.प्रा. शिवाजी मगर यांनी परिवारासोबत मनुदेवीच्या डोंगरराशीत अशोक वृक्ष लावून अत्यंत आनंदाने व उत्साहाने वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांच्यासोबत श्रद्धा मगर, श्रावणी मगर व अनुष्का मगर उपस्थित होते.यावेळी त्यांचे स्नेही प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र राजपूत व मित्रपरिवार उपस्थित होता.

पर्यावरण संवर्धनासाठी खारीचा वाटा का असेना या स्तुत्य उपक्रमाबद्दल परिसरातून प्रा शिवाजी मगर यांचे कौतुक होत असून असाच उपक्रम उपक्रम प्रत्येकाने राबवावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here