फैजपूर नगरपालिकेचा उपक्रम : ‘मेरी मिट्टी मेरा देश’अभियानांतर्गंत १९३६च्या प्रेरणास्तंभास अभिवादन

0
3

फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी

धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे विद्यार्थी विकास विभाग आणि नगर परिषद फैजपूर यांंच्या संयुक्त विद्यमाने ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियान कार्यक्रम साजरा करण्यात आला. फैजपूर नगरपालिकेचे अधिकारी दिलीप वाघमारे, संगिता बाक्षे, सुहास नेहेते, प्रसन्न डोलारे, टी. एन. चौधरी, प्रविण सपकाळे यांच्या हस्ते ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या शासनाच्या कार्यक्रमांतर्गत स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण घटनेचे पाईक असलेले १९३६ चे राष्ट्रीय ग्रामीण अधिवेशनाच्या भूमीतील माती घेण्यात आली.

या ग्रामीण अधिवेशनाची आठवण देणारे धनाजी नाना महाविद्यालय फैजपूरच्या प्रांगणात उभारलेला ‘प्रेरणास्तंभ’ या इतिहास वास्तूला अभिवादन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. ए.आय. भंगाळे, उप प्राचार्य एस. व्ही. जाधव, प्रा. डॉ. राजेंद्र ठाकरे, प्रा. डॉ. ईश्वर ठाकूर, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. विजय सोनजे, प्रा . डॉ. शरद बिऱ्हाडे, फैजपूर नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी,परिसरातील प्रतिष्ठित मान्यवर, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here