बोदवड ः प्रतिनिधी
बोदवड-सोनोटी येथील शिक्षक मुरलीधर पाटील यांंच्या मुलीचे पाच वर्षापुर्वी १८ वर्षी निधन झाले.या दुःखातून सावरत पाटील परिवाराने मुलीच्या नावाने स्व.प्रियंका पाटील बहुऊद्देशिय संस्था स्थापना केली व संस्थेच्या माध्यमातून दर वर्षी स्मृतीदिनानिमित्त विविध उपक्रम आयोजित करतात.
यावर्षी सोनोटी गावात दिव्यांग बांधवांना, दिव्यांग बांधवांसाठी असलेल्या विविध शासकीय योजनेची माहिती संस्था अध्यक्ष मुरलीधर पाटील यांनी दिली तसेच कपडे वाटपही करण्यात आले. यावेळी मधुकर राणे,अनिल पाटील, सोपान पाटील, संगीता पाटील, राजेश ननवानी आदींची उपस्थिती होती.