अन्न, पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके, राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीतधान्य पिके प्रात्यक्षिक साईमत/जळगाव/प्रतिनिधी : अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळीतधान्य पिके सन २०२४-२५ अंतर्गत रब्बी हंगामामध्ये पीक प्रात्यक्षिके तसेच प्रमाणित बियाणे वितरण या बाबींच नियोजन करण्यात आलेले आहे. या करिता चालू वर्षी हरभरा, गहू, जवस, करडई, भूईमुग, व मोहरी या पिकांचे महा-डीबीटी प्रणालीद्वारे बियाणे या घटकासाठी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. पीक प्रात्याक्षिके हि बाब शेतकरी गटामार्फत राबविली जाणार आहेत. पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला १ एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला आवश्यक असणा-या बियाण्याचा २ हेक्टर…
Author: saimat
शानभाग विद्यालयात महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै.श्रीमती ब.गो. शानभाग विद्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री या थोर नेत्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांना या थोर नेत्यांच्या कार्याची ओळख व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर पाटील , विभाग प्रमुख रुपाली पाटील , स्वप्निल पाटील , जगदीश चौधरी आदींचे हस्ते महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सकाळ विभागात या कार्यक्रमाचे निमित्ताने विद्यालयातील शिक्षक गुलाबराव पाटील , सचिन पाटील यांनी तसेच महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल अनमोल अशी…
अध्यक्षपदी योगेश ढगे तर उपाध्यक्षपदी रविराज शिंदे यांची निवड साईमत/मलकापूर/प्रतिनिधी : दुर्गा नगर येथील नवदुर्गा देवी महोत्सवाची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी योगेश ढगे, उपाध्यक्षपदी रविराज शिंदे, कोषाध्यक्षपदी विनोद गायकवाड यांची सर्वानुमते निवड केली आहे. यंदा मंडळाला ७५ वर्ष पूर्ण होत असून मंडळ हे वर्ष अमृतमोहत्सवी वर्ष म्हणून साजरे करणार आहे. दुर्गानगरच्या मुख्य मार्गावर स्थापित असलेल्या मंडळाची वैशिष्ट्ये म्हणजे डिजे, आणि बँडसारख्या ध्वनी प्रदूषण करणारे वाद्यांना बाजुला ठेऊन अनेक वर्षांची परंपरा जोपासत आगमन सोहळ्याला लेझीम पथक आणि अग्नीचा भवरा हे मंडळाचे आकर्षण ठरत असते. यंदा १० फुट उंच अशी आकर्षक देवीची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवाच्या १५…
शेतकऱ्यांना सरसकट पीक नुकसानीची ५० हजार रुपये एकरी मदत द्या जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, काँग्रेसची मागणी साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : सतत बरसणाऱ्या पावसामुळे जळगाव जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट पीक नुकसानीची मदत एकरी ५० हजार रुपये द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. शासनामार्फत जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना सरसकट एकरी पन्नास हजार रुपयाची मदत त्वरित देण्यात यावी, अशी मागणी मुक्ताईनगरचे तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावर्षी जुलै महिन्यापासून सतत मुसळधार व वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात…
यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभासदांना लाभांश वाटप सुरू साईमत/यावल/प्रतिनिधी : यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे सभापती नरेंद्र नारखेडे व सर्व संचालक मंडळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावात संस्थेच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत नोंदणी असलेल्या सर्व सभासदांना यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघातर्फे सभासदांना १० टक्के लाभांश वाटप १ ऑक्टोबर २०२४ पासून सुरू करण्यात आली. लाभांश घेण्यासाठी आलेले प्रथम सभासद जयंत उखर्डू महाजन, रा. सातोद यांना यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे युवा उपसभापती तेजस धनंजय पाटील यांच्या हस्ते लाभांश देण्यात आला. यावेळी मॅनेजर संजय दादा भोईटे, यावलकर साहेब, रामचंद्र भोईटे उपस्थित होते. संस्थेच्या वाटचालीत…
श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांसह वारकऱ्यांतर्फे दुर्गा सप्तशती पारायण सेवा साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवाला गुरुवारी, ३ ऑक्टोबर रोजी सुरुवात होणार आहे. ३ रोजी घटस्थापना असल्याने हा दिवस आदिशक्ती श्री संत मुक्ताबाई साहेबांचा प्रकट दिन आहे. हा जमोत्सव सोहळा भक्तिमय वातावरणात व्हावा म्हणून दरवर्षी प्रमाणे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्र , मुक्ताईनगर व तापी पूर्णा परिसराच्यावतीने हजारो सेवेकऱ्यांतर्फे श्री संत मुक्ताबाई समाधी स्थळ(कोथळी) श्रीक्षेत्र मुक्ताईनगर (जुने मंदिर) येथे “दुर्गा सप्तशती” पारायण सेवेचे आयोजन केले आहे. सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. पारायण सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री संत मुक्ताई संस्थानचे अध्यक्ष ॲड रवींद्र भैय्यासाहेब पाटील, संत मुक्ताई पालखी सोहळा प्रमुख…
वंचित बहुजन आघाडीतर्फे तहसिलदारांसह मुख्याधिकाऱ्यांना निवेदन साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : शहरातील तितूर नदीवरील पंचम कार्यालय ते दयानंद हॉटेलपर्यंत असलेल्या पुलास विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे चाळीसगाव तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार संदेश निकुंभ व नगरपालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, आम्ही चाळीसगाव शहराचे रहिवासी आहोत. आम्ही आपणास विनम्र विनंती करतो की, नुकतेच बांधलेल्या पंचम कार्यालय ते दयानंद हॉटेलपर्यंत असलेल्या नदी पात्रावरील पुलास विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे. चाळीसगाव शहरात यापूर्वीच छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि हिंदूसूर्य महाराणा प्रताप चौक अशी नामकरणे केली आहेत. तसेच विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे…
प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राबविला विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम साईमत/चोपडा/प्रतिनिधी : येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचालित प्रताप विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल चोपडा येथे विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये दररोज यावे, त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा, शाळेबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी, यासाठी शाळेच्या वतीने, ज्या विद्यार्थ्यांची शंभर टक्के हजेरी असेल अशा सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने “शाळेमध्ये शंभर टक्के हजेरी आहे” अशा पद्धतीचा बॅच लावून त्या विद्यार्थ्यांचा सन्मान केला गेला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक जनजागृती त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत आवड निर्माण व्हावी आणि आपण शाळेत दररोज आले पाहिजे. अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होईल. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाबाबतीत कोणत्याही पद्धतीची अडचण निर्माण होणार नाही. एक छोटासा बदल…
जळगाव व जामनेरच्या शेतकऱ्यांना दिलासा : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाठपुरावा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : आज झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या पाठपुराव्यानुसार भागपूर उपसा सिंचन योजनेच्या रु. 3 हजार 533 कोटींच्या सुधारित प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या योजनेच्या सुधारित प्रस्तावामुळे सिंचन क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार असून, जळगाव तालुक्यातील भागपुर- वावडदा सह 25 गावांच्या, तसेच जामनेर व पाचोरा पाचोरा तालुक्यांतील शेतकऱ्यांची 30 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालकमंत्र्यांसह दोन्ही मंत्रीद्वयांना शेतकरी धन्यवाद देत आहे. सन 1999-2000 मध्ये या प्रकल्पासाठी 557 कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता…
खा.स्मिताताई वाघ, आ.लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, यांनी दाखवला झेंडा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील 800 यात्रेकरुंची विशेष वातानुकुलीत भारत गौरव पर्यटन रेल्वे अयोध्येकडे सोमवारी 30 सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात, ढोल ताशांचा गजरात, पारंपारिक नृत्य करून यात्रेकरूंच्या स्वागतात खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते फीत कापून यात्रेकरूंचा रेल्वेत प्रवेश झाला. खासदार स्मिताताई वाघ, आमदार लताताई सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, माजी महापौर सिमाताई भोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी श्री.अंकित, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी वेवोतोलू केझो, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त योगेश पाटील, माजी नगरसेवक उज्वला बेंडाळे यांनी झेंडा दाखवून ही स्पेशल ट्रेन जळगाव स्टेशनवरून अयोध्येकडे रवाना झाली. ढोल, तासे, उत्सव कमानीने…