Author: saimat

पुतळ्यांची उंची, वजन माहित नसताना चबुतऱ्याचे काम कसे सुरु?, नवीन पुतळे विराजमान झाल्याशिवाय जुन्या स्मारकांना हात लावू देणार नाही साईमत/धरणगाव/प्रतिनिधी : धरणगावातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांना शासनाची परवानगी व निधी संदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत सकल मराठा समाज आणि बौद्ध समाजाची शहरात संयुक्त पत्रकार परिषद झाली. माजी उपनगराध्यक्ष दीपक वाघमारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांसंदर्भात माहिती अधिकारातून कागदपत्र मिळवले आहेत. याबाबत पत्रकार परिषदेत लेखी पुरावे सादर करत खळबळ उडवून दिली आहे. यावेळी मराठे समाज अध्यक्ष भरत मराठे, बौद्ध समाजाचे गोवर्धन सोनवणे, साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे, मराठा नेते जानकीराम पाटील, गोपाल…

Read More

तिर्थक्षेत्री मुक्ताईनगरला संत मुक्ताई जन्मोत्सव उत्साहात साजरा साईमत/मुक्ताईनगर /प्रतिनिधी : संत ज्ञानेश्वर आधी चौघा भावंडांमध्ये अतिशय लडिवाळ असलेल्या आदिशक्ती संत मुक्ताबाई या वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ संत, आपल्या परखड अभंग वाणीतून थोर कवयित्री म्हणून ओळख असणाऱ्या मुक्ताबाई यांचा अश्विन मासातील नवरात्रोत्सवात अश्विन शुद्ध प्रतिपदा घटस्थापना शुभदिनी अवतीर्ण झाल्याने मुक्ताई साहेबांचा हा जन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्याचा निश्चय करून श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र तापी पूर्णा परिसर सेवेकरांतर्फे परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्ताई चंडी सेवा अंतर्गत सामूहिक दुर्गा सप्तशती पाठाचे आयोजन केले होते. सामूहिक पारायण सोहळ्यात हजारो सेवेकरी…

Read More

गांधीजींचे विचार अन्‌ त्यांचा जीवन प्रवासावर झाले मार्गदर्शन साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : येथील भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात मेंटल, मोरल आणि सोशियल सायन्स असोसिएशन आणि राष्ट्रीय सेवा योजना एकक यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधीजी यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एस. व्ही.पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रा. डॉ. बी. एच. बऱ्हाटे उपस्थित होते. प्रमुख वक्ते प्रा. वंदना नेमाडे यांनी गांधीजींचे विचार आणि त्यांचा जीवन प्रवासावर मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी महात्मा गांधीजींनी केलेले चंपारण्य सत्याग्रह, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ इत्यादी बाबतीत सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस. व्ही.पाटील यांनी महात्मा गांधीजींचे…

Read More

प्रभागातील १५ जोडप्यांच्या हातून आदिशक्तीची विधीवत पूजा साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : शारदीय नवरात्रौत्सवानिमित्त माजी नगरसेवक नंदकिशोर बाविस्कर व अजिंक्य बाविस्कर यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या आदिशक्तीच्या आरत्यांचा व माहितीचा संग्रह असणाऱ्या पुस्तिकेचे घटस्थापनेच्या दिवशी आनंदा माता मंदिर, सराफ बाजार येथे माजी खासदार उन्मेष पाटील आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर प्रभागातील १५ जोडप्यांच्या हातून आदिशक्तीची विधीवत पूजा अर्चा करून महाआरती करण्यात आली. याप्रसंगी माजी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, जिल्हा समन्वयक महेंद्र पाटील, शिवसेना नेते मोरसिंग राठोड, शिवसेना तालुकप्रमुख रमेश चव्हाण, तालुका प्रवक्ता दिलीप घोरपडे, मा. नगरसेवक शाम देशमुख, मा. नगरसेवक रामचंद्र जाधव, तालुका संघटक…

Read More

आमडदे शाळेत ह.भ.प. रूपालीताई सवणे परतुरकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम उत्साहात साईमत/भडगाव/प्रतिनिधी : येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित सौ साधनाताई प्रतापराव पाटील प्राथमिक माध्यमिक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आमडदे यांच्यावतीने संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शिक्षण महर्षी प्रतापराव हरी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील प्रांगणात महाराष्ट्रातील महिला किर्तनकार ह.भ.प.रूपालीताई सवणे परतुरकर यांच्या किर्तनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता शारदा माता, कर्मवीर तात्या बाबा कै.ताई आजी.कै.सौ.साधनाताई पाटील, कै.युवराज दादा पाटील, कै.अशोक अण्णा पाटील यांच्या प्रतिमांचे प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती…

Read More

शहरातील महत्वपूर्ण रस्त्यांसह इतर विकास कामांचा समावेश साईमत/अमळनेर/प्रतिनिधी : येथील नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरात अजून पाच कोटींच्या विकासकामांना मंजुरी तथा प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यातून महत्त्वपूर्ण रस्त्यांसह इतर विकास कामे मार्गी लागणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली. सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ अंतर्गत सुवर्ण जयंती नगरोथान महाअभियान आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे दलीत वस्ती सुधार योजनेतून ही कामे मंजूर झाली आहेत. त्यात प्रामुख्याने अत्यंत दुरवस्था झालेल्या रेल्वे उड्डाणपूल ते बंगाली फाईलकडून विप्रो कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यांचा समावेश असल्याने या परिसरासह बोरी काठच्या गावांची सोय होणार आहे. तसेच बस स्टँड शेजारील अत्यंत दयनीय अवस्था झालेला गांधी नगरचा रस्ता…

Read More

सहकार महर्षी रामभाऊ जिभाऊ पाटील यांच्या जयंती निमित्ताने चाळीसगाव येथे ११.६९ कोटींच्या भव्य कृषी भवनाचे भूमिपूजन संपन्न साईमत/चाळीसगाव /प्रतिनिधी : तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्वर्गीय रामभाऊ जिभाऊ पाटील यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या शेतकरी हिताच्या कार्याला आदरांजली म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांनी ११ कोटी ६९ लक्ष निधीतून साकारण्यात येत असलेल्या जळगाव भव्य अश्या कृषीभवनाचे भूमिपूजन करत तालुक्यातील ५०० प्रगतिशील शेतकऱ्यांचा सपत्नीक आदर्श शेतकरी म्हणून सन्मान केला. यावेळी माजी आमदार साहेबराव घोडे, भाजपा जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर जळकेकर महाराज. केळीतज्ञ – श्री. के. बी. पाटील (जैन इरिगेशन), जिल्हा कृषी अधिकारी कुर्बान तडवी, से. नि. कृषी संचालक- श्री. अनिल भोकरे, राज्य पुरस्कार प्राप्त कृषी भुषण…

Read More

राज्यपालांच्या हस्ते मंत्र्याच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान साईमत/पारोळा/प्रतिनिधी : महाराष्ट्र शासन कृषी विभागाने नव्याने सुरू केलेल्या “युवा शेतकरी पुरस्काराचा” नाशिक विभागातून पहिलाच पुरस्कार जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील मल्हार कुंभार या युवा शेतकऱ्यास मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, अजित पवार व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार नुकताच देण्यात आला. आपल्या शेतात नाविन्यपूर्ण प्रयोग राबवून यश संपादित केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत नुकताच मुंबई येथे पार पडला. या ठिकाणी जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील चोरवड या गावातील कृषी पदवीधर असलेले तरुण शेतकरी मल्हार प्रल्हाद कुंभार यांना शासनाने नव्यानेच सुरू केलेल्या युवा शेतकरी हा पहिलाच नाशिक विभागातून…

Read More

चित्र रेखाटण्यासाठी पोस्टर कलरचा केला वापर साईमत/जळगाव/प्रतिनिधी : श्रीरामाच्या वहीच्या कागदापासून बनवलेली इष्टिका (कागदापासून बनवलेली विट) व कुलस्वामी देवीचे मनमोहक असे चित्र चित्रकार सुनिल दाभाडे कलाशिक्षक मानव सेवा विद्यालय जळगाव यांनी रेखाटलेले आहे.इष्टिका (कागदापासून बनवलेली विट) बनविण्यासाठी पाच नोटबुकचा वापर केलेला आहे. नोटबुकचा लगदा तयार करून त्यापासून इष्टिका तयार करण्यात आली. त्यानंतर पंधरा मिनिटात देवीचे सुंदर चित्र रेखाटण्यात आले. चित्र रेखाटण्यासाठी पोस्टर कलरचा वापर करण्यात आला. असे नवनवीन कल्पनाचा वापर करुन सुनील दाभाडे नेहमी विविध वस्तूवर चित्र रेखाटत असतात. या इष्टकेवरील चित्राचे व सुनील दाभाडे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read More

प. वि. पाटील विद्यालयाची ‘गांधी तीर्थ’ला भेट साईमत/जळगाव/न.प्र.: के.सी.ई.सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून जैन व्हॅली येथे महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘गांधी तीर्थ’ म्युझियमला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी बालपणाच्या मोहनपासून ते महात्मा गांधी पर्यंतचा जीवनप्रवास अनुभवला. महात्मा गांधी यांच्या जीवनातील विविध प्रसंग व्हिडिओ ग्राफिक्स, ऑडिओ क्लिप, चार्ट, चित्र तथा मॉडेल्स पाहून विद्यार्थी भारावून गेले. जैन व्हॅलीच्या निसर्गरम्य वातावरणाचाही विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. भेटीचे आयोजन मुख्याध्यापिका धनश्री फालक यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक योगेश भालेराव, योगेश पाटील, गायत्री पवार यांनी केले.

Read More