विद्यापीठातर्फे ‘फिरती विज्ञान प्रयोगशाळाची व्हॅन’ साईमत/जळगाव/प्रतिनिधी : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राच्या वतीने नंदूरबार जिल्हयातील सहा माध्यमिक शाळेतील व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ‘फिरती विज्ञान प्रयोगशाळाची व्हॅन’ उपलब्ध करून देण्यात आली. दोन दिवसात २७०० विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेतला. विज्ञानात गोडी निर्माण व्हावी यासाठी ही विज्ञान प्रयोगशाळा व्हॅन नंदूरबार जिल्ह्यातील शहादा, धडगाव या तालुक्यातील शेठ वि.के. शाह विद्यालय, शहादा, कै. सौ. जी.एफ. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, शहादा , एस.टी.ई.एस आणि सहकारी शिक्षण संस्था विज्ञान महाविद्यालय, शहादा. धडगाव तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा, चुलवड, शासकीय आश्रमशाळा, मंडवी बुद्रुक आणि शासकीय आश्रमशाळा, काकरदा येथील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. फिरती विज्ञान…
Author: saimat
वर्षातील आठ थीमद्वारे कौशल्यपूर्ण शिक्षणाचे धडे साईमत/पारोळा/प्रतिनिधी : येथील टायगर इंटरनॅशनल स्कूलमध्ये भगतसिंग यांची नुकतीच जयंती साजरा करण्यात येऊन विद्यार्थ्यांना त्यांची माहिती देण्यात आली. तसेच त्यानिमित्त खेळातून प्रशिक्षण देणाऱ्या संकल्पनेला साजेशी अशी प्रोफेशनल अँड इंडस्ट्रियल थीमचे आयोजन केले होते. प्ले ग्रुप,नर्सरी, ज्युनिअर के.जी.व सिनियर के.जी.तील विद्यार्थ्यांनी डॉक्टर, वकील, इंजिनियर, नर्स, शिक्षक, हॉटेल मॅनेजमेंट, पोलीस, सैनिक, शेतकरी, फिल्म कलाकार, शृंगार करून पालकांनी स्वतः सहभाग म्हणून विविध प्रकारे व्यावहारिक प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी स्वतः प्रदर्शित केले. पालकांनी उत्स्फूर्त पद्धतीने विद्यार्थ्यांना तयार करण्यासाठी मदत केली. विद्यार्थ्यांनी स्कूलमध्ये जशीच्या तशी थीम त्याद्वारे सर्व व्यावसायिक शिक्षण ग्रहण केले. अशा प्रकारचे व्यवहारिक आणि व्यावसायिक ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यात आले.टायगर…
अर्थ, सुरक्षा, संस्कृतीवर चर्चा : डझनभर देशाच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण साईमत / जळगाव / प्रतिनिधी जगातील प्रमुख उद्योन्मुख देशांच्या अर्थव्यस्थांना एकत्र करीत आर्थिक, सुरक्षित आणि सांस्कृतिक देवाण-घेवाणसाठी चीन येथे नुकतीच ब्रिक्स आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत जळगावची रहिवासी तथा अहमदाबाद येथील पंडित दीनदयाल एनर्जी विद्यापीठाची विद्यार्थीनी आश्लेषा राजेश यावलकर हिने सहभाग घेवून देशाचे नेतृत्व केले. भारतात सरकारच्या योजना कशा पद्धतीने राबविल्या जातात या विषयावर आश्लेषाने पेपरचे सादरीकरण केले. ब्रिक्स (BRICS) म्हणजेच ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका आणि आता जानेवारी 2024 पासून इथियोपिया, इजिप्त, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती या देशांचा समावेश असलेला एक अभ्यास गट…
एमआयडीसी पोलीसांची कारवाई साईमत / जळगाव / प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेल्या गुन्हेगाराला एमआयडीसी पोलिसांनी अजिंठा चौफुली येथे सापळा रचून अटक केल्याची कारवाई सोमवारी ३० सप्टेंबर रोजी सकाळी१० वाजता दहा वाजता केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र उर्फ लहाण्या अशोक महाजन वय-३०, रा. तळेले कॉलनी, जुना खेडीरोड, जळगाव असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, शहरातील अजिंठा चौफुली परिसरामध्ये शनिपेठ पोलीस ठाण्याकडून हद्दपार केलेला संशयित आरोपी महेंद्र उर्फ लहाण्या अशोक महाजन हा फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी पथकाला…
जळगाव जनता बँके शून्य टक्के एनपीए पुरस्काराने सन्मानित साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव जनता सहकारी बँक तर्फे २०२३-२४ या आर्थिक वर्षात चांगली कामगिरी करून बँकेचे एन पी ए शून्य टक्के ठेवण्यात यश मिळाल्याबद्दल पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. पुणे यांच्या वतीने जळगाव जनता बँकेला शून्य टक्के एन.पी.ए. या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथील कै विजय तेंडुलकर सभागृहात जीवन गौरव पुरस्कार प्रदान आणि पुरस्कार वितरण समारंभ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास रिझर्व बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन चे अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष ॲड. साहेबराव टकले आदी उपस्थित होते. यावेळी जळगाव जनता बँकेच्या वतीने…
युवासेनेतर्फे उद्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन 9 मुलांचे व 5 मुलींचे संघ होणार सहभागी साईमत/जळगाव/प्रतिनिधी जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने युवासेनेतर्फे उद्या मंगळवार दि. 1 ऑक्टोबर रोजी जी. एच. रायसोनी महाविद्यालय, शिरसोली रोड, जळगाव येथे सलग चौथ्या वर्षी जळगाव जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या फलकाचे अनावरण नुकतेच शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेना तथा युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना संपर्क प्रमुख संजय सावंत, युवासेनेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव विराज कावडीया, युवासेना कॉलेजकक्षचे जळगाव लोकसभा युवाधिकारी प्रितम शिंदे, युवासेना जिल्हा युवाधिकारी निलेश चौधरी, चंद्रकांत शर्मा, सुरज पाटील, उपमहानगर युवाधिकारी प्रशांत वाणी, राहूल चव्हाण,…
खेडी – इंदिरा नगर येथे मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद साईमत/जळगाव/प्रतिनिधी राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत उपमुख्यमंत्री( गृह/विधी व न्याय) यांचे कार्यालय व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या समन्वयाने आणि जय बजरंग मित्र मंडळ यांच्या सहकार्याने प्रभाग क्र. ३ मधील खेडी,इंदिरा नगर येथे २८ सप्टेंबर रोजी मोफत सामुदायिक आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात विनामूल्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरास प्रभाग क्र. ३ चे नगरसेवक प्रवीण कोल्हे , भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ. केतकी पाटील, भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखा वर्मा ,भाजपा महिला मोर्चा महानगर प्रमुख भारती सोनवणे, केमिस्ट…
जिल्ह्यात इफको तर्फे १२ तालुक्यात फवारणी करिता किसान ड्रोन उपलब्ध साईमत/जळगाव/प्रतिनिधी युवकांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावे. शेती ही शाश्वत उत्पन्न मिळण्याचे मोठे साधन आहे. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती सोबत जोड व्यवसाय करावा. शेती व शेतकरी हेच शाश्वत उद्योगाचे साधन असून शासन शेती व शेतकऱ्यांच्या सोबत खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासा व्हावा या दृष्टीने वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते ममुराबाद येथील कृषी विज्ञान केंद्रात कापूस साठवणूक बॅग व बॅटरी चलित फवारणी पंपाचे वितरण प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा अधीक्षक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी होते. कृषी विभाग, आत्मा जळगाव व…
ज्येष्ठ मंडळी समाजाचे आधारस्तंभ, संस्काराचा ठेवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील साईमत/जळगाव/प्रतिनिधी वातानुकुलित जेष्ठ नागरिक भवन हे जेष्ठ नागरिकांना एकत्र येण्यासाठी आणि सुसंवाद साधण्यासाठी एक विरंगुळा केंद्र आहे. आपली वडीलधारी जेष्ठ मंडळी ही आपली संपत्ती असून त्यांचे अनुभव, ज्ञान ही आपल्यासाठी मोठी शिदोरी आहे. ज्येष्ठ मंडळी ही सुसंस्काराचा ठेवा आणि सर्व समाजाचे आधारस्तंभ असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. तालुक्यातील आसोदा येथे जेष्ठ नागरिक भवनाचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक संघाचें अध्यक्ष डीगंबर भोळे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून आ. राजूमामा भोळे होते. पालकमंत्री ना.पाटील पुढे म्हणाले की, जेष्ठांच्या आयुष्यात आनंद आणि समाधानाचे क्षण आणण्यासाठी…
विद्या इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिबिरात योगाचे धडे साईमत/जळगाव/प्रतिनिधी येथील मु.जे.महाविद्यालयाच्या सोहम डिपार्टमेंट ऑफ योग ॲण्ड नेचर थेरपी विभागाच्या वतीने विद्या इंग्लिश मिडीयम स्कूल येथे २६सप्टेंबर पर्यंत मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन प्रा.ज्योती वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.त्यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले. डॉ. देवेंद्र सोनार व प्रा.ज्योती वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिक्षिका स्नेहल लष्करी (अग्रवाल) यांनी योगासने, प्राणायाम यांची प्रात्यक्षिके घेउन योगाचे फायदा व महत्त्व पटवून दिले.योग शिबिराचे आयोजन केल्याबद्दल प्राचार्य सतिष मालकर यांचे योग विभागाच्या वतीने आभार मानले.