Author: saimat

भगीरथ शाळेत देशभक्ती गीतगायन स्पर्धा उत्साहात दहावीची विद्यार्थिनी चेतना सुतार प्रथम साईमत/जळगाव/प्रतिनिधी येथील कै.सुनिता जगन्नाथ वाणी -भगीरथ इंग्लिश स्कूलमध्ये देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा नुकत्याच उत्साहात पार पडल्या. त्यात प्रथम क्रमांक चेतना दिलीप सुतार, द्वितीय तृप्ती महेंद्र माळी, तृतीय तेजस्विनी शरद कंडारे, उत्तेजनार्थ पियुष युवराज मगरे यांनी प्राप्त केला. स्पर्धेचे परीक्षण सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षिका संगीता पवार तसेच सेवानिवृत्त क्रीडाशिक्षक चंद्रशेखर पिंपरकर यांनी केले. स्पर्धेचे आयोजन ज्येष्ठ शिक्षक आर.डी. कोळी, आर. डी. पाटील यांनी केले. याप्रसंगी मुख्याध्यापक एस.पी. निकम, उपमुख्याध्यापक जे.एस. चौधरी, पर्यवेक्षक के.आर. पाटील, गणेशोत्सव समिती प्रमुख संगीता पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन आर.डी. पाटील तर आर.डी. कोळी यांनी आभार व्यक्त केले.

Read More

डॉ. अभिषेक बोरोले यांचा तुर्की येथील इस्तंबूल येथे परिषदेत पोस्टर प्रदर्शित साईमत/जळगाव/प्रतिनिधी मलकापूर येथील रहीवास असलेले डॉ. डी वाय पाटील वैद्यकिय महाविद्यालय तसेच गोदावरी परिवाराचे सदस्य डॉ. अभिषेक बोरोले यांनी नुकतेच तुर्कीदेशात इस्तंबूल येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत मूत्रपिंड प्रत्यार्पण किडनी ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांमध्ये होणारा बुरशीजन्य संसर्ग या विषयावर पोस्टर प्रदर्शित केले.इस्तंबूल येथील द ट्रान्सप्लांट सोसायटीतर्फे आयोजित या आतंरराष्ट्रीय परिषदेत पोस्टरच्या माध्यमातून मूत्रपिंड प्रत्यार्पण शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णांमध्ये होणारा बुरशीजन्य संसर्ग या विषयावर मत मांडतांना त्यांनी २९ वर्षीय महिलेचे आठ महिन्यांपूर्वी मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले होते आणि वडील दाते होते. टॅक्रोलिमस, मायकोफेनोलेट सोडियम आणि प्रेडनिसोलोनच्या इम्युनोसप्रेशनच्या देखभालीवर ती स्थिर ग्राफ्ट…

Read More

शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांची संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी निवड साईमत/जळगाव/प्रतिनिधी येथील पंचायत समिती जळगाव चे शिक्षण विस्तार अधिकारी व विद्यमान ग स सोसायटी संचालक विजय शांतीलाल पवार यांची महाराष्ट्र राज्य शिक्षण विस्तार अधिकारी संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. संघटनेचे राज्य अध्यक्ष कैलास सांगळे नाशिक व राज्य सरचिटणीस दादाराव मुसदवाले  बुलढाणा यांनी नुकतीच ही निवड जाहीर केली. शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांच्या या निवडीबद्दल प्रगती गटाचे रावसाहेब पाटील, सहकार गटाचे उदय पाटील यांचे सह सर्व जिल्हा भरातील शिक्षण विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकवृन्द यांनी अभिनंदन केले आहे. शिक्षण विस्तार अधिकारी पदाच्या पदोन्नती…

Read More

१९ गावांना अखंडित विजेसाठी दिलासा ; शिरसोली १३२ के.व्ही. चे उपकेंद्र मंजुरीच्या अंतिम टप्यात साईमत/जळगाव/प्रतिनिधी म्हसावद ते नागदुली ३३ के. व्हीं. लिंक लाईनचे काम २ महिन्यात पूर्ण होणार असून यामुळे म्हसावद व परिसरातील उन्हाळ्यातील विजेचा लपंडाव कायमस्वरूपी बंद होणार आहे. तसेच  सुमारे ८० कोटीच्या शिरसोली १३२  के. व्हीं उपकेंद्र मंजुरीचे काम अंतिम टप्प्यात असून या उपकेंद्रामुळे जळगाव शहर आणि जळगाव ग्रामीण भागातील प्रमुख उपकेंद्रांना सुरळीत दाबाने वीज पुरवठा होणार आहे. उद्योगधंदे यांच्या विद्युतीकरणाचा प्रश्न या शिरसोली उपकेंद्रामुळे सुटणार असून ३४ कोटी ५२ लक्ष निधीतून  म्हसावद व परिसरातील रुग्णांना आरोग्याची अद्ययावत सुविधा असावी यासाठी सर्व सुविधायुक्त ३० खाटांच्या ग्रामीण रूग्णालयाच्या मुख्य…

Read More

शाळा प्रशासनासह ग्रामस्थांवर होतोय अभिनंदनाचा वर्षाव साईमत/जळगाव/प्रतिनिधी: तालुक्यातील पिलखेडे येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श मराठी शाळा, पिलखेडे या शाळेने ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांत जिल्हास्तर व विभागीय स्तरावर घवघवीत यश संपादित केले आहे. त्याबद्दल शाळा प्रशासन व ग्रामस्थांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या राज्यस्तरावरील आदर्श उपक्रमाचा दुसरा टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. या टप्प्यावरील मुल्यांकन जाहीर झालेले असून त्यात जळगाव तालुक्यातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श मराठी शाळा, पिलखेडे  जिल्हा परिषद शाळेने प्राथमिक गटातून जळगाव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. नाशिक विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त करत घवघवीत यश संपादित केले आहे. पिलखेडे…

Read More

रायसोनी महाविद्यालयात “डिझाईन थिंकींग मेथोडोलॉजी द इंडियन वे”  विषयावर कार्यशाळा साईमत / जळगाव / प्रतिनिधी कोणतीही गोष्टीची निर्मिती करण्याचा डीएनए खरे तर डिझाइनच असतो. तो आपल्याला त्याच समस्यांकडे वेगळ्या पद्धतीने पाहण्याची, त्यावर उपाय शोधण्याची साधने देतो. गुंतागुंतीच्या समस्या छोटे छोटे भाग करून समजून घेणे हा डिझाइन थिंकिंगचा भाग आहे. डिझाइन शिक्षण विद्यार्थ्यांना वास्तवाशी जोडते आणि त्यांना उपायांवर काम करण्यासाठी ज्ञान व अनुभव देते. आजही बहुतांश लोक डिझाइनला केवळ सौंदर्य शिल्प मानतात, पण डिझाइन थिंकिंग हे एक सामाजिक तंत्रज्ञान आहे, त्यामध्ये व्यावहारिक साधनांसह मानवी वर्तन समजून घेणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन व “अमाय डिझाईन सोल्युशन”चे संस्थापक तसेच सीईओ अभिषेक निरके यांनी केले.…

Read More

उज्ज्वल स्कूलमध्ये विषय मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सादर केले अनोखे प्रकल्प साईमत / जळगाव / प्रतिनिधी उज्ज्वल स्कूलमध्ये “विषय मेळावा २०२४” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, ज्यात विद्यार्थ्यांनी विज्ञान, गणित, इतिहास, आणि भूगोल या विषयांवर आधारित नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केले. या प्रकल्पांनी विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचे आणि सखोल शैक्षणिक ज्ञानाचे दर्शन घडवले.कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या अध्यक्षा अनघा गाडगानी, शाळा समितीचे अध्यक्ष प्रविण गगडाणी, मुख्याध्यापिका मानसी गगडाणी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला परीक्षक म्हणून डॉ. रेणुका चव्हाण, प्रा. प्रमोद समाधान भोई, आणि प्रा. डॉ. अतुल सोपानराव इंगळे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे परीक्षण केले. विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात सौर ऊर्जा, रोबोटिक्स, आणि पर्यावरण संवर्धनासारख्या अद्ययावत विषयांवर प्रकल्प सादर केले.…

Read More

रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स सुवर्णसेवेचा सुवर्णमहोत्सवा निमित्त लोगोचे अनावरण साईमत / जळगाव / प्रतिनिधी सोने, हिरे, रत्ने याबद्दल विचार मनात आला की जळगावकरांचे पाय आपसूकच वळतात ते रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सकडेच…! आपल्या मनमोहक कलाकुसरीने जळगावचेच नव्हे तर अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सने ग्राहकांच्या सेवेत ५० वर्षांचा टप्पा पार केला. विश्वासाची परंपरा, दर्जेदार अलंकार, गुणवत्ता उचित दर यामुळे कोट्यवधी ग्राहकांची निष्ठा अशी ख्याती असलेले या प्रतिष्ठानाने ही मजल गाठली. नुकतेच ‘रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘हर्षोत्सव सुवर्णमहोत्सवाचे- सेवेचे आणि विश्वासाचे- १९७४ ते २०२४” हे मुद्रित केलेल्या लोगोचे अनावरण करण्यात आले. या सुवर्णमहोत्सवी उत्सवात  ‘रतनलाल सी. बाफना…

Read More

कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : येथील कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी राष्ट्रसेवेसाठी आपले संकल्प पक्के करण्याबाबत व सामाजिक कार्यात योगदान देण्याचे आवाहन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. संदीप पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलनाने झाली. प्रमुख पाहुणे प्रा. विजय डांगे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून दिलेल्या भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेच्या महत्त्वपूर्ण कार्याची चर्चा केली. त्यांनी समाजासाठी निःस्वार्थपणे कार्य करण्याची प्रेरणा दिली. देशातील विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनासारख्या चळवळींची आवश्यकता स्पष्ट केली. प्रास्ताविकात रासेयोचे कार्यक्रम अधिकारी नामदेव धुर्वे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची पार्श्वभूमी विषद केली. स्वयंसेवकांनी केलेल्या कार्याचा…

Read More

रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, वाचनीय पुस्तके देऊन स्पर्धकांचा गौरव साईमत/चोपडा/प्रतिनिधी : येथील प्रताप विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय वकृत्त्व, गीत गायन, व निबंध स्पर्धा भुसावळ येथील के.नारखेडे विद्यालयात स्व. बाबासाहेब के नारखेडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त नुकत्याच घेण्यात आल्या. त्यात चोपडा येथील प्रताप विद्या मंदिराची विजयी पताका सदैव फडकवित विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कथालेखन स्पर्धेत विद्यालयाचे उपशिक्षक पंकज शिंदे यांनी राज्यस्तरावर दुसरा क्रमांक प्राप्त केला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना पी.एस. ठाकरे, एम.एफ. माळी, पी.बी.कोळी या मार्गदर्शक शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. सर्व विद्यार्थ्यांचे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे विज्ञान विभाग प्रमुख डॉ.दिलीप देशमुख यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व…

Read More