खाजगी वाहनाने पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले साईमत/पारोळा /प्रतिनिधी : तालुक्यातील मुंदाणे प्र.अ.येथे एका ४८ वर्षीय शेतकऱ्याचा विहिरीवरील पाण्याची इलेक्ट्रिक मोटर सुरू करताना शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास घडली.अर्जुन नारायण माळी असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी अर्जुन माळी हे आपल्या मुंदाणे शिवारातील शेतात गाईंना चारापाणी करून त्यांच्यासाठी पाण्याचे कुंड भरण्यासाठी विहिरीवरील पाण्याची इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्यासाठी गेले असता शॉक लागून बेशुद्ध पडले. यावेळी त्यांना भाऊ नामदेव माळी यांनी खाजगी वाहनाने पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत नामदेव माळी यांनी पारोळा पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्युची नोंद करण्यात…
Author: saimat
सेवानिवृत्त चालकासह वाहकांचा सत्कार साईमत/जामनेर /प्रतिनिधी : श्री क्षेत्र मुक्ताईनगर ते श्री क्षेत्र भगवानगड मार्गावर नवीन बस सेवा सुरू केली आहे. यासाठी ‘भगवान सेने’च्या सततच्या पाठपुराव्याला यश आले आहे. जामनेर येथे बस आल्यावर माजी नगराध्यक्षा साधना महाजन यांनी गाडीला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ करुन श्रीफळ प्रदान केले. याप्रसंगी माजी नगरसेवक दीपक तायडे यांनी बस सुरु करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सेवानिवृत्त महारू नाईक यांचा तर मुक्ताईनगर डेपोचे चालक दराडे यांचा भाजपाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर तर न.पा.चे गटनेते डॉ. प्रशांत भोंडे यांनी वाहक घुगे यांचा सत्कार केला. ही गाडी मुक्ताईनगरहुन नियमित ७.३० ला निघणार असल्याचे सांगण्यात आले. याप्रसंगी भगवान सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील,…
वहनाची मिरवणूक सायंकाळी ६ वाजता श्री बालाजी महाराजांच्या मंदिरापासून साईमत/पारोळा/प्रतिनिधी : येथे आज शुक्रवारी ‘श्रीं’चे वाघ वहन आहे. या वहनाची मिरवणूक सायंकाळी ६ वाजता श्री बालाजी महाराजांच्या मंदिरापासून निघून पूर्वेस भावसार यांच्या चक्की जवळून दक्षिणेस मोरफळ गल्लीने मडक्या मारुती मंदिरा जवळून आझाद चौक ते झपाट भवानी मंदिरात देवी पद्मावतींची आरती, मंदिरातून पुढे शेवडी गल्लीतून बारी गल्ली, नास्कर गल्लीने पंचमुखी हनुमान मंदिरा जवळून भोसले गल्ली, जैन मंदिराजवळून पश्चिमेस जडे गल्ली, बागवान गल्ली, शिंदे गल्ली, राम मंदिर चौक राम मंदिर जवळून लष्कर गल्लीतून हिंगलाज माता मंदिराजवळून दक्षिणेस दशरथ पाटील यांच्या घराजवळून अमळनेर रोड शनी मंदिर जवळून बहादरपूर रस्त्याने लालबाग,बालाजी पार्क, व्यंकटेश नगर,…
मनमाड रेल्वे स्थानकाची कार्यपद्धतीसह सुरक्षिततेच्या दृष्टीने पाहणी साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : मध्य रेल्वे भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांनी दि.२४ सप्टेंबर रोजी मनमाड-भुसावळ रेल्वे मार्गाची विंडो ट्रेलिंग तपासणी केली. ही तपासणी विशेषत: ओएमएस (ऑसिलेशन मॉनिटरिंग सिस्टम) कोच मधून करण्यात आली. ज्यामध्ये रेल्वे मार्गावरील ट्रॅकची चालण्याची गुणवत्ता तपासण्यात आली. तपासणीचा उद्देश म्हणजे गाड्यांची सुरक्षित आणि गुळगुळीत धाव सुनिश्चित करणे, जेणे करून प्रवाशांच्या सुरक्षेला अधिक बळकटी मिळेल. ट्रॅकवरील धक्के, कंपनांची तीव्रता, वक्र आणि सिग्नल यंत्रणांची स्थिती तसेच रेल्वे गाड्यांच्या गतीदरम्यान ट्रॅकच्या क्षमतेचा सखोल अभ्यास यामध्ये करण्यात आला. ओएमएस कोचद्वारे या तपासणीतून मिळणारे डेटा रेल्वेच्या देखभाल कार्याला वैज्ञानिक आणि कार्यक्षम बनवण्यास मदत करतो. याच…
तात्काळ मदतीसाठी प्रस्ताव पाठवण्याच्या खासदारांनी दिल्या सूचना साईमत/भडगाव/प्रतिनिधी : भडगाव शहरात मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी खा. स्मिताताई वाघ यांनी शहरातील विविध भागांमध्ये भेट दिली. भेटीदरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला आणि प्रशासनाला त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. सदर भेटीत मुख्याधिकारी रवींद्र लांडे, शेतकरी संघ संचालिका व नगरसेविका योजना पाटील, अध्यक्ष सोमनाथ पाटील, भडगांव मंडळ अध्यक्ष विनोद नेरकर, कजगांव मंडळ अध्यक्ष अनिल पाटील, तालुका चिटणीस भगवान पाटील तसेच शैलेश पाटील, डॉ.पंकज जाधव, शेखर पाटील, कार्यकारी सदस्य नूतन पाटील, प्रमोद पाटील, मनिषा पाटील, रेखा शिरसाठ, जिजाबाई चव्हाण, सुरेखा वाघ, कुणाल पाटील, प्रदीप पाटील, किरण शिंपी, विशाल पाटील, विशाल…
आ.किशोर पाटील यांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदन साईमत/पाचोरा/प्रतिनिधी : पाचोरा व भडगाव तालुक्यात सलग तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील सर्व पिके उद्ध्वस्त झाली असून शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या भीषण परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनानुसार पाचोरा तालुक्यात १६ सप्टेंबर रोजी १८६.८ मिमी, २२ सप्टेंबर रोजी १८६.८ मिमी आणि २३ सप्टेंबर रोजी १३९.८ मिमी असा तब्बल ५१३.४ मिमी पावसाचा विक्रमी आकडा केवळ तीन दिवसांत नोंदवला गेला आहे. भडगाव तालुक्यात २३ सप्टेंबर रोजी ९०.७० मिमी पावसाची नोंद झाली…
पहूर येथील वाघुर नदीच्या पुलावर रहदारीला अडथळा साईमत/पहूर, ता. जामनेर/प्रतिनिधी : जळगाव-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५३ एफवर वाघूर नदीवरील पहूर येथील पूल चक्क ‘पार्किंग’ मध्ये बदलला असून त्यामुळे महामार्गावरील रहदारीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. रविवारी पहूर येथे आठवडे बाजार भरत असल्याने खरेदीसाठी आलेले नागरिक आपली दुचाकी व चारचाकी वाहने थेट पुलावरच उभी करत आहेत. त्यामुळे पूल वाहनतळाचे रुप धारण करत असून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. यासंदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी आवाहन केले आहे की, नागरिकांनी आपली वाहने बसस्थानक परिसरात व पुलावर लावू नयेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी टाळून अपघाताचा धोका कमी होईल. स्थानिक नागरिकांच्या…
एका मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची चाळीसगाव-सम्भाजीनगर मार्गावरील साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : चाळीसगाव-सम्भाजीनगर मार्गावरील कन्नड घाटात अज्ञात वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या घडकेत शहागंज, संभाजीनगर येथील एका मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.२३ रोजी सकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान घडली.सिकंदर खान शेर खान (वय 56, शहागंज, संभाजीनगर) असे मयत इसमाचे नाव आहे. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदर खान शेर खान आपल्या मोटारसायकलीवरून (एम.एच.20 – जीएस 9273)ने संभाजीनगरकडे जात होते. दस्तुरी फाटा या ठिकाणी अज्ञात वाहनाने त्यांना मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर सिकंदर खान मोटारसायकलीसह रस्त्याच्या कडेला फेकले गेले व गंभीर जखमी झाले. घटनास्थळी माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे अंमलदार सुनील पाटील घटनास्थळी तातडीने पोहोचले.…
जयजयकार आणि भक्तिगीतांच्या गजरात परिसर दुमदुमूला साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी : तालुक्यात नवरात्रोत्सवाची धामधूम जोरात सुरू आहे. शहर व ग्रामीण भागात भक्तिभावाने वातावरण उदंड आहे. यंदा नवरात्रीची पहिली माळ दि.२२ सप्टेंबर रोजी पाटणादेवी येथे संपन्न झाली. जिथे सकाळपासूनच तालुक्यातील विविध भागांतून आलेल्या भाविकांनी पावसाच्या रिमझिम सरींमध्ये देखील देवी दर्शनासाठी गर्दी केली. जयजयकार आणि भक्तिगीतांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला. यंदा शहरातील ६० आणि तालुक्यातील ३५ अशा एकूण ९५ नवरात्रोत्सव मंडळांनी ऑनलाईन नोंदणी करून देवीची स्थापना केली आहे. या काळात मंडळांकडून जल्लोषात देवी मूर्तींची मिरवणूक आयोजित केली गेली. तसेच, धार्मिक विधींसोबतच समाजोपयोगी उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्याचीही तयारी करण्यात आली आहे. घटस्थापनेसाठी आवश्यक…
मंदिरांमध्ये दिव्यांची रोषणाई; श्री क्षेत्र संगमेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे ‘ज्योतीं’चे स्वागत साईमत/पहूर, ता.जामनेर/प्रतिनिधी : शारदीय नवरात्रोत्सवास दि.२२ पासून उत्साहात प्रारंभ झाला. येथे देविंच्या सर्व मंदिरांमध्ये दिव्यांची आरास साकारण्यात आली आहे.नवरात्रोत्सवानिमित्त सप्तशृंगी निवासिनी मातेच्या वनी गडावरून ‘ज्योत ‘ घेऊन आलेल्या भाविकांचे श्री क्षेत्र संगमेश्वर महादेव मंदिर ट्रस्टतर्फे ईश्वर हिवाळे यांनी स्वागत केले. गावातील जय भवानी माता मंदिर , संतोषी माता मंदिर , रेणुका माता मंदिर, दुर्गा भवानी माता मंदिर, ग्रामदैवत मरीआई मंदिर या सर्वच मंदिरांमध्ये घटस्थापना करण्यात आली असून विद्युत दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला आहे. यासोबतच गावात विविध ठिकाणी दुर्गा मंडळांनी मुर्त्यांची स्थापना केली असून भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.…