कार्तिक मास व दीपदानाचे महात्म्य उलगडले साईमत/पाचोरा /प्रतिनिधी : श्रील प्रभुपाद मार्ग, वरखेड़ी रोडवरील श्री जगन्नाथ इस्कॉन मंदिरात भगवद्गीता साप्ताहिक सत्संग भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. कार्यक्रमात इस्कॉनचे प्रवचनकार श्रीमान यदुवंशी प्रभुजी यांनी “कार्तिक मास की महिमा एवं दीपदान का महत्व” या विषयावर प्रेरणादायी प्रवचन दिले. प्रभुजींनी सांगितले की, कार्तिक महिना हा भगवान श्रीहरि विष्णूला अत्यंत प्रिय असून या काळात श्रद्धेपूर्वक केलेले दीपदान सर्व पापांचे नाश करून भक्ताला परमशांती व मोक्ष प्रदान करते. स्त्री असो किंवा पुरुष, जो कार्तिक महिन्यात भगवान विष्णूला दीप अर्पण करतो त्याला मृत्यूनंतर यमलोकाचे दर्शन होत नाही. दीपदान हे केवळ बाह्य प्रकाश नसून अंतःकरणातील अंधकार दूर…
Author: saimat
महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे तहसीलदारांना निवेदन साईमत/पारोळा/प्रतिनिधी : तालुक्यात गेल्या आठ-दहा दिवसांमध्ये अतिवृष्टी सदृश्य मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने कापूस, मक्का, सोयाबीन, ज्वारी, केळी आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने सरसकट पंचनामा करावा, एकही शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचित राहू नये, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शेतकरी नेते सुनील देवरे यांनी तहसीलदार डॉ.उल्हास देवरे यांना दिले. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. नुकसान भरपाईचे पंचनामे करताना कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वस्तुनिष्ठ पंचनामे करावे, त्यांनी अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचलेले असेल, अशाच शेतकऱ्यांचा आम्ही पंचनामे करू, असे दिसून येत आहे. परंतु पाऊस जाऊन…
हिंदू जनजागृती समिती यांनी शस्त्र पूजनाचे महत्त्व पटवून दिले. साईमत/पाळधी, ता.धरणगाव/प्रतिनिधी : विजयादशमी निमित्त हिंदू जनजागृती समितीच्या वतीने शौर्य जागरण शस्त्र पूजन कार्यक्रम पार पडला. समिती सेवकांनी पारंपरिक शस्त्रांचे शास्त्रोक्त पद्धतीने पूजन करून विधी संपन्न केला. कार्यक्रमास प्रतापराव गुलाबराव पाटील, हरिभक्त परायण ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर, तसेच खर्ची येथील रहिवासी बीएसएफ जवान सोपान माळी यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात निखील कदम (हिंदू जनजागृती समिती) यांनी शस्त्र पूजनाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर म्हणाले, शास्त्राचे रक्षण शस्त्र शिवाय होऊ शकत नाही. धर्मरक्षणासाठी शस्त्र ही केवळ परंपरा नसून ती आपल्या शौर्याची आणि आत्मसन्मानाची ओळख आहे.शौर्य जागरण शस्त्र पूजन प्रसंगी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे…
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ७ वीची विद्यार्थीनी वृषाली सुनिल पवार हिने आज साईमत/पहूर ता जामनेर/प्रतिनिधी : सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील इयत्ता ७ वीची विद्यार्थीनी वृषाली सुनिल पवार हिने आज चाळीसगाव येथील क्रीडा संकुलात झालेल्या शालेय जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत चमकदार खेळ करत द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील नामांकित शाळांमधील विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. तगड्या प्रतिस्पर्ध्यांशी सामना करत वृषालीने आपल्या चपळतेने, तंत्राने आणि धैर्याने उत्कृष्ट कुस्ती सादर केली. उपांत्य फेरीत तिने प्रतिस्पर्धी खेळाडूवर वर्चस्व गाजवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अंतिम सामन्यातही तिने दमदार खेळ दाखवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि द्वितीय क्रमांकावर समाधान मानले. वृषाली ही शिपाई सुनिल पवार…
आ.अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. साईमत/ फैजपूर/प्रतिनिधी : सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने शहरातील ४ हजार नागरिकांना मोफत आयुष्मान कार्ड उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाची सुरुवात रविवारी शुभ दिव्य मंगल कार्यालयात करण्यात आली. हा उपक्रम सिद्धेश्वर वाघुळदे यांच्या पुढाकाराने आणि आ.अमोल जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. आरोग्य संरक्षणासाठी अत्यंत उपयुक्त असलेले हे कार्ड नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध करून देते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. नागरिकांनी आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी आयुष्मान कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन श्री.वाघुळदे यांनी केले. शिबिराच्या प्रारंभीपासूनच नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसून आली. कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष निलेश राणे, सिद्धेश्वर…
कारवाई संशयास्पद? ; सागवान लाकूड तस्कर फरार झाले की केले?, नागरिकांमध्ये चर्चा साईमत/यावल/प्रतिनिधी : यावल वनविभाग गस्ती पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार शुक्रवार दि.३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री यावल पूर्व आणि पश्चिम कार्यालयापासून १० कि.मी.अंतराच्या आत असलेल्या कोरपावली गावाजवळ सापळा रचून सागवान लाकूड तस्करांवर कारवाई करण्यात आली.५१ हजार २०० रुपयाच्या साग चौपाटासह मोटरसायकली जप्तची कारवाई करण्यात आली. त्यातील २ आरोपी फरार झाले की फरार करण्यात आले? याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहे. ही कारवाई ३ रोजी रात्री १२.४५ वाजेच्या सुमारास करण्यात आली. याबाबत सातपुड्यातील तथा वनक्षेत्रातील सागवान व आडजात लाकूड व्यवसाय करणाऱ्यांमध्ये व वनविभागातील काही मोजक्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये केलेल्या कारवाईबाबत संशय व्यक्त…
बऱ्हानपूर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात ५० वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : तालुक्यातील खामखेडा येथील बऱ्हानपूर मार्गावर झालेल्या भीषण अपघातात ५० वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजू रामा वाघ (वय ५०, रा.खामखेडा) असे मयताचे नाव आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, राजू वाघ हे रात्री खामखेडा येथील बसस्थानकाजवळ रस्ता ओलांडत होते. त्याचवेळी बाळू बुधा भोई (वय २८, रा. मेळसांगवे) यांच्या ताब्यातील बजाज पल्सर (क्र. एमएच १९ ईएन ६६३०) या दुचाकीने जोरदार धडक दिली. अचानक झालेल्या या धडकेत राजू वाघ यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला.या अपघातानंतर…
शेतकऱ्यांना मानवी साखळी करून जावे लागतेय शेतात साईमत/सोयगाव/प्रतिनिधी : तालुक्यातील धिंगापूर शिवारात शेतात जाण्यासाठीचा रस्ता शनिवारी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसात पूरात वाहून गेल्यामुळे तीन दिवसापासून निंबायती, जरंडी शिवारातील तीनशेच्यावर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे महत्वाच्या कामासाठी शेतकरी मानवी साखळीने जीव धोक्यात घालून जनावरांना चारा पाणी करण्यासाठी जात आहे धिंगापूर शिवारात जाण्यासाठी निंबायती आणि जरंडी शिवारातील शेतकऱ्यांना एकमेव सुकी नदीच्या पात्रातून रस्ता आहे. परंतु शनिवारी रात्री आलेल्या पुरामध्ये हा रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे ३०० शेतकऱ्यांना या शिवारात जाता येत नाही. परंतु दूध काढणे, जनावरांना चारा पाणी करण्यासाठी या शिवारात जाणे आवश्यक झाले असून शेतकरी गटागटाने मानवी साखळी तयार करून…
लखनऊ–मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये भुसावळ आणि भादली दरम्यान ब्रेक सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : १ ऑक्टोबर रोजी लखनऊ – मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये भुसावळ आणि भादली दरम्यान ब्रेक सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने स्लीपर कोचमधून धूर निघाल्याची घटना घडली. मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि संभाव्य अपघात टळला. प्रवाशांचा प्रवास सुरक्षीतपणे पुढे सुरू ठेवण्यात आला. ही घटना १ ऑक्टोबर २०२५ रोजी घडली. पुष्पक एक्सप्रेस नियोजित वेळेत भुसावळ स्थानकावरून सुटल्यानंतर भुसावळ–भादली दरम्यान असताना एस-४ क्रमांकाच्या स्लीपर कोचच्या चाकांजवळ अचानक धूर दिसून आला. ब्रेक सिस्टीममधील घर्षणामुळे ही समस्या उद्भवली असल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे.घटना लक्षात येताच ट्रेन मॅनेजर आणि रेल्वे कर्मचारी…
इनरव्हील क्लबतर्फे वीटभट्टी कामगारांच्या मुलींना फ्रॉक, गोडधडीसह शालेय साहित्य भेट साईमत/भुसावळ/प्रतिनिधी : भुसावळ येथील इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटी यांनी आपल्या दत्तक घेतलेल्या नगरपालिका शाळा क्रमांक २ मधील कुमारींचे विधिवत पूजन साजरे केले. या शाळेत मुख्यत्वे वीट भट्टी कामगारांची मुले शिक्षण घेतात. त्यामुळे या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासाला चालना मिळाली. कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील मुलींचे पूजन करून झाली. मुलींना फ्रॉक, सफरचंद, राजगिऱ्याचे लाडू, चिप्स, शृंगारसामग्री आणि हेअर पिन भेटवस्तू म्हणून दिल्या गेल्या. तसेच सर्व मुलं, मुलींना आणि शिक्षकांना क्लबच्या वतीने अल्पोपहार प्रदान करण्यात आला, ज्यामुळे कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे आनंद वाढवला गेला.कार्यक्रमासाठी क्लबच्या सदस्यांनी मनापासून मेहनत घेतली. यात मोना…