पाळधीत नेत्र तपासणी शिबिर; ५१० रुग्णांची तपासणी साईमत/पाळधी, ता.धरणगाव/प्रतिनिधी : जसे पाणी देणे ही माझी जबाबदारी मानली, तसेच दृष्टीदान देखिल आपली पवित्र जबाबदारी आहे. लोकांच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रू पाहून खरी समाधानाची जाणीव होते. हे कार्य पुढेही सुरू राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाळधी येथे जीपीएस मित्र परिवारातर्फे घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन शिबिराप्रसंगी केले. जिल्ह्यातील लोकसेवेच्या परंपरेत आणखी एक सुवर्ण पान जोडले गेले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रेरणेतून व जि.प. सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या प्रयत्नातून पाळधी येथे जिपीएस मित्र परिवारातर्फे नेत्र तपासणी व मोफत मोतिबिंदू ऑपरेशन शिबिर…
Author: saimat
जमिनीवर पडलेल्या इलेक्ट्रिक वायरचा धक्का लागून ४१ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. साईमत/मुक्ताईनगर/प्रतिनिधी : तालुक्यातील रुईखेडा येथे शेतात काम करत असताना जमिनीवर पडलेल्या इलेक्ट्रिक वायरचा धक्का लागून ४१ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. एकनाथ जगन्नाथ कांदले (वय ४१) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. ते रुईखेडा येथील रहिवासी आहेत. त्यांचा मृत्यू इलेक्ट्रिक शॉक लागून झाल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे. या घटनेची माहिती मयत एकनाथ कांदले यांच्या भावाने पोलिसांना दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ कांदले हे बटाईने केलेल्या शेतात काम करत होते. त्यावेळी जमिनीवर पडलेल्या बेवारस इलेक्ट्रिक वायरच्या संपर्कात आल्याने त्यांना विजेचा तीव्र…
काँक्रिटीकरणचे भूमिपूजन ; २७.५० कोटींच्या निधीतून १५ मी.चे रुंदीकरण पाळधी, ता.धरणगाव । जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा मार्ग आर्थिक व सामाजिक विकासाचा महामार्ग ठरणार आहे. अनेक अपघात, धूळधाण आणि रहदारीच्या त्रासातून प्रवाशांना दिलासा मिळणार असून जून २०२६ पर्यंत जरी मुदत असली तरी मार्चमध्येच हा रस्ता जनतेच्या सेवेत आणण्याचा निर्धार आहे. रस्त्याच्या कामावरील ठिकठिकाणी फलक लावून वाहतुकीला अडथळा होणार नाही याची ठेकेदारांनी काळजी घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. याप्रसंगी प्रमुख म्हणून आ.राजुमामा भोळे उपस्थित होते. जळगाव शहरालगत दिर्घकाळ प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला अखेर गती मिळाली आहे. पाळधी ते खोटेनगर (५.२० कि.मी.) तसेच कालिंका माता मंदिर ते तरसोद महामार्ग…
भुसावळ प्रतिनिधी : दिपनगर निंभोरा (ता.भुसावळ) येथे वैकुंठवासी निवृत्ती छन्नु चौधरी यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ संगीतमय श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ व अखंड हरिनाम संकीर्तन सोहळा निंभोरा बु. (ता.भुसावळ) येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज मंगळवार दि.९ ते १६ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत दैनंदिन श्रीमद् भागवत कथा सकाळी नऊ ते ११ दुपारी २ ते ५ या वेळेत कथेचे प्रवक्ते हभप गजानन महाराज धानोरा वाल्मीक आश्रम (चिंचखेडा, जामनेर) हे लाभले असून दररोज काकड आरती सकाळी ५ ते ६.३०, विष्णुसहस्त्रनाम सकाळी ६.३० ते ७.३०, हरिपाठ सायंकाळी ५.३० वाजता व किर्तन दररोज रात्री ९ ते १० या कालखंडात होणार असूनन काल्याचे कीर्तन…
बोदवड प्रतिनिधी : येथील जिल्हा परिषद जि.प.कन्या नंबर दोन मधील उपशिक्षिका संगिता देविदास शेळके यांना यावर्षीचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार पालकमंत्री गुलाबराव पाटील व जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल व आ.राजू मामा भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला यावर्षीचा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संगीता देविदास शेळके यांनी किशोरवयीन मुलींच्या समस्या व त्यांचे निराकार करण्यासाठी प्रयत्न केले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट अध्यापन करून त्यांना शिक्षणाची गोडी निर्माण केली. संगिता शेळके यांनी विविध स्वरचित कवितांचा संग्रह केला. मनूर बुद्रुक येथील संगीता शेळके या बोदवड येथील बरडिया शाळेतील उपशिक्षक संजय देवकर यांच्या पत्नी असून वरणगाव येथील उपशिक्षक संतोष शेळके यांच्या भगिनी…
मुक्ताईनगर प्रतिनिधी : ग्रामसभा न घेणे, पदाचा दुरुपयोग करणे आदी कारणांवरून काकोडा (ता.मुक्ताईनगर) ग्रामपंचायतीचे सरपंच तुळशीराम रामा कांबळे यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यांना पदावरून अनार्ह (अपात्र ) ठरविण्यात आलेले असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ३ ऑगस्ट रोजी काढलेला आहे. कांबळे हे २०२१ पासून काकोडा ग्रामपंचायतचे सरपंच होते. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३६ नुसार सरपंच तुळशीराम कांबळे यांनी ग्रामसभेच्या बैठका घेतल्या नाहीत. तसेच तीन वर्षात केवळ एकच ग्रामसभा घेतली. सरकारी पैशांचा गैरवापर, ग्रामनिधी तसेच विविध योजनांचा निधीचा गैरवापर, पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा गैरवापर, सदस्यांना विश्वासात न घेणे तसेच बोगस बिले काढून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात…
अजित पवारांकडून अर्थसंकल्पातून घोषणांचा पाऊस शेती, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकासावर भरीव तरतूद मुंबई : प्रतिनिधी राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत आपला ११ वा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०४७पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला आहे. त्यांच्या संकल्पपूर्तीला बळ देणारा वर्ष २०२५ – २६ चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’ असे सांगत शेती, शेतीपुरक क्षेत्रं, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद…
शिवजयंतीत जिल्हाधिकाऱ्यांचा भूतदये’चा प्रत्यय येतो तेव्हा… जळगाव। विशेष प्रतिनिधी जळगाव शहरात बुधवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती जल्लोषात साजरी होत असतांना, रथावर निघालेली मिरवणूक सर्वत्र उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरण… अचानक रथाला जुंपलेल्या घोड्याकडे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे लक्ष वेधले जाते. रथाला जुंपलेला घोडा काहीसा अस्वस्थ त्यांना वाटला. त्यांनी घोड्याजवळ जावून त्याचे निरीक्षण केले, पशूवैद्यकीय डॉक्टरांना ही त्यांनी घोड्याच्या प्रकृतीची माहिती घेण्याविषयी सांगितले. पशूवैद्यकीय डॉक्टरांनी तपासणी केली असता घोडा आजारी असल्याचे निष्पन्न झाले. तातडीने घोड्यावर उपचार करण्यात आले आणि रथातून घोड्याला वेगळे केले. ही घटना किंवा हा प्रसंग ‘ भूत दया परमोधर्म याची प्रचिती आणून देणारा ठरला. भारतीय संस्कृतीत ‘भूतदया परमो धर्माचे…
महाराष्ट्र ई-स्पोर्ट्स ओपन चॅम्पियनशिपचे उद्घाटन पुणे ( प्रतिनिधी) – केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आज महाराष्ट्र ई-स्पोर्ट्स ओपन चॅम्पियनशिपचे उद्घाटन करताना त्याला ऐतिहासिक टप्पा म्हणून संबोधित केले. ही चॅम्पियनशिप एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी येथे आयोजित केली आहे, जी राज्याच्या क्रीडा इतिहासातील आणि देशाच्या वाढत्या ई-स्पोर्ट्स उद्योगात महत्त्वाचा टप्पा ठरते. केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी पुण्यातील भाषणात सांगितले की, ई-स्पोर्ट्समध्ये केवळ उत्तम तांत्रिक कौशल्यच नाही, तर मानसिक दृढता, जलद निर्णय क्षमता आणि संघभावना आवश्यक आहे, जे पारंपारिक क्रीडांमध्ये देखील आवश्यक आहेत.२०१८ च्या जाकार्ता-पलंबांग आशियाई क्रीडा स्पर्धेत एक डेमो क्रीडा म्हणून ई-स्पोर्ट्सचा समावेश झाला होता. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने…
जय शिवराय, जय भारत जिल्हास्तरीय पदयात्रेचे आयोजन जळगाव ( प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती१९ फेब्रुवारीरोजी साजरी करण्यात येत आहे. जळगाव शहरात जिल्हास्तरीय जय शिवराय, जय भारत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.केंद्र शासनाच्या वतीने देशपातळीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त जय शिवराय, जय भारत पदयात्रा राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही पदयात्रा सकाळी ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथून सुरु होईल. पदयात्रेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल -कोर्ट चौक – पंडित जवाहरलाल नेहरु स्मारक – डॉ. बाबासाहेब अंबेडकर स्मारक – टॉवर चौक – चित्रा टॉकिज – शिवतीर्थ असा राहणार आहे.…