Author: saimat

 ‘श्रीं’चे सुर्य वहन आहे साईमत/ पारोळा/प्रतिनिधी :   येथे आज मंगळवारी ‘श्रीं’चे सुर्य वहन आहे. हे वहन सायंकाळी ६ वाजता श्री बालाजी महाराजांचा मंदिरापासून निघून बाजार पेठेतून नगरपालीकेजवळून पूर्वेस तलाव गल्लीतून महामार्गाने माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्या घराजवळून बसस्थानकापासून पोलीस लाईनीत जाऊन तेथून पूर्वेस महावीर कॉलनीत माजी खासदार मोरेकाका यांचे घराजवळून परत हायवेने मा. आमदार आबासो चिमणराव पाटील यांचे घराजवळून न्यू बालाजी नगर तेथून माजी आ.चिमणराव पाटील यांच्या कार्यालयामार्गे गजानन कॉलनीतून महामार्गाने बोरी कॉलनीत माजी आ.डॉ.सतिष पाटील यांचे घराजवळून, माजी खा.ए.टी.पाटील यांच्या निवासस्थाना जावून दुपारी २ वाजता येईल.

Read More

मृत महेश हा विधवा आईचा एकुलता एक मुलगा ; न. पा. चे मुख्याधिकारी, तहसीलदार, तलाठी आदींनी दिली भेट साईमत/पाचोरा /प्रतिनिधी : अतिवृष्ठीमुळे शहरातिल कृष्णापुरी भागातिल टेकडीगल्लीत धाब्याचे घर अतिवृष्ठीमुळे कोसळल्याने एक १२ वर्षाचा मुलगा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मरण पावला तर दुसरा मुलगा जखमी झाला. मरण पावलेला महेश हा विधवा आईचा एकुलता एक मुलगा असून तिच्या वृध्दपकाळाची काठी हरपल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. महेश नितिन राणे (वय १२) असे मयत झालेल्या बालकाचे तर योगेश बाळू पाटील असे जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, विठ्ठल काशिनाथ पाटील हे आपल्या मुलासह धाब्याच्या घरात राहत होते. घराच्या मागच्या बाजूस महेश आणि त्याचा…

Read More

पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली साईमत/ पारोळा/प्रतिनिधी :  तालुक्यातील होळपिंप्री येथील २८ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा विहिरीतून पाणी काढत असताना पाय घसरून पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.कल्पेश गोरख पाटील असे मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. कल्पेश पाटील हे मका कणीस मोडनीसाठी शेतात गेले होते. यावेळी विहीरीवर ते पाणी काढण्यासाठी गेले असता त्यांचा अचानक पाय घसरून तोल जाऊन ते विहीरीत पडले. पावसामुळे विहिरीचे पाणी जास्त असल्याने व पोहता येत नसल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागला. बराच वेळ होऊनही मुलगा परत न आल्याने वडील गोरख पाटील हे बघण्यासाठी विहिरीजवळ गेले असता,…

Read More

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले. साईमत/ पाचोरा/प्रतिनिधी : राज्य शासनाने केंद्र सरकारची नवीन पीकविमा योजना स्वीकारली असली, तरी जुन्या योजनेतील पाच निकषांपैकी फक्त पीक कापणी प्रयोग हा एकमेव निकष ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना विविध टप्प्यांवर दिलासा देणारे उर्वरित निकष रद्द झाल्यामुळे शेतकऱ्यांना योजनेतून फारसा फायदा होणार नाही, अशी भावना व्यक्त करत तालुक्यातील शेतकऱ्यांतर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्र या भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिके, गुरे, घरे व शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या गंभीर संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत नवीन योजनेमुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टी, गारपीट, वादळ, पूर यांसारख्या नैसर्गिक…

Read More

विटनेर येथे शारदीय नवरात्रोत्सवनिमित्त उद्या यात्रोत्सव साईमत/ चोपडा/प्रतिनिधी :  तालुक्यातील विटनेर येथे शारदीय नवरात्रोत्सव निमित्ताने चामुंडा माता मंदिरात उद्या दि.३० रोजी यात्रेचे आयोजन मंदिर समिती कडून करण्यात आले आहे . विटनेर येथे कुलस्वामिनी चामुंडा माता मंदिर असून हे मंदिर परिसरातील भाविकांसाठी श्रद्धास्थान मानले जाते. संपूर्ण दगडी बांधकाम असलेल्या या मंदिरात काळभैरव, गणपती यांची स्थापना मंदिर आवारात करण्यात आली आहे. हे मंदिर वर्षभर भक्तासाठी उघडे असते. मंदिरात सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस आरती करण्यात येते. नवरात्र उत्सव काळात संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण असते. तसेच हजारो भाविक येथे दर्शनाला येतात. चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्रला या मंदिरात विशेष भाविकांची मोठी गर्दी होते.…

Read More

 ‘श्रीं’चे हत्ती वहन आहे साईमत/ पारोळा/प्रतिनिधी :  येथे आज सोमवारी ‘श्रीं’चे हत्ती वहन आहे. हे वहन रात्री ८ वाजता श्री बालाजी महाराजांचा मंदिरापासून निघून पूर्वेस नीट वाणी मंगल कार्यालयमार्गे आझाद चौक ते झपाटभवानी मंदिरात देवी प‌द्मावतींची आरती, मंदिरातून समोरुन पश्चिमेस नीट भोई गल्लीने श्री राम मंदिरात येईल.तेथून कासार गल्लीने टोळकर गल्ली,भाटे वाडी मार्गे कुंभार वाडा, ओतार गल्ली गांवहोळी चौकापर्यंत येऊन बाजारपेठेतून रथ चौक मार्गे पहाटे ३ वाजता मंदिरात येईल. आज सकाळी ८ वाजता मंदिरातून बालाजी महाराजांची पालखी निघेल. पालखी रथ चौकातून दक्षिणेस बाजारपेठ गांवहोळी चौक, नगरपालीका चौकातून जुने पोष्ट ऑफीस मार्गे दक्षिणेस डॉ.मोहरीर यांचे दवाखान्याजवळून हायवेने मालक कै.गिरधरशेठ शिंपी यांचे स्मारक…

Read More

नवरात्रीत रणरागिणींकडून ना.गुलाबराव पाटील यांच्याकडे आग्रहाची मागणी साईमत/पाळधी, ता.धरणगाव/प्रतिनिधी :  ‘लव्ह जिहाद’ हा केवळ वैयक्तिक स्तरावरील गुन्हेगारी कृत्य नसून ते एक संघटित, नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे. यामध्ये खोटी ओळख, प्रेमजाळ, विवाह, धर्मांतरण, लैंगिक शोषण, वेश्या-व्यवसाय, निर्घृण हत्या, मान‍वतस्करी आणि विक्री, मानवी अवयवांची विक्री आणि दहशतवादी कारवायांत सहभाग इथपर्यंत गंभीर गुन्ह्यांचा समावेश होत. जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात ‘लव्ह जिहाद’ला असंख्य हिंदू युवती, महिला बळी पडलेल्या आहेत. त्यामुळे हे रोखण्यासाठी राज्यात येत्या हिवाळी अधिवेशनात लव्ह जिहाद विरोधी कायदा पारित करण्यात यावा, अशी मागणी रणरागिणींनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनाव्दारे केलेल्या मागण्या उत्तर प्रदेश आणि राजस्थान…

Read More

पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. साईमत/जामनेर/प्रतिनिधी :  शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, गेल्या ३ दिवसात ३ मोटार सायकली चोरीला गेल्या आहेत.गेल्या दोन दिवसापूर्वी माजी नगरसेवक उल्हास पाटील वाकी रोड यांची मोटार सायकल दिवसा ढवळ्या स्मशान भूमी जवळील ईदगाह मैदान येथून चोरीला गेली आहे.तर रात्री शहरातील साईनाथ नगर भागातून चोरट्यांनी एकाच रात्री दोन दुचाकी वाहने लंपास केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे. रोजी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी दोन्ही शेजारी राहणाऱ्या साईनाथ नगरमधील रहिवासी…

Read More

पर्यटकांसह सामान्य नागरिकांना प्रवेश बंद, पोलिस बंदोबस्त साईमत/धानोरा, ता. चोपडा/ प्रतिनिधी :  यावल तालुक्यातील सावखेडासीम, चुंचाळे, नायगाव येथून जवळच असलेले निंबादेवी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. मंगळवारी धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले. मात्र, सांडव्याच्या भिंतीला तडा गेल्याने ती कोसळण्याची भिती प्रशासनाने व्यक्त केली. ही स्थिती पाहता दुर्घटना रोखण्यासाठी तहसीलदारांनी निंबादेवी धरण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले. वनविभाग व पोलिसांनी बंदोबस्तदेखील लावला आहे. यावल तालुक्यातील पश्चिम भागात सावखेडासीम या गावापासून जवळच सातपुड्याच्या पायथ्याशी निंबादेवी धरण आहे. दरवर्षी पावसाळ्यात ऑगस्टमध्ये धरण भरून सांडवा ओसंडतो. भुशी डॅमसारखे चित्र तयार होते. सांडवास्थळी पायऱ्यांवरून वाहणारे पाणी जिल्हाभरातील पर्यटकांना आकर्षित करून घेते. मात्र, यंदा सातपुड्यात…

Read More

शहरातील बोरावल गेट परिसरात अवैध देशी बनावटीचे गावठी पिस्तूल साईमत/ यावल/प्रतिनिधी :  यावल शहरातील बोरावल गेट परिसरात अवैध देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूस घेऊन विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना यावल न्यायालयात हजर केले असता दि.२८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार युवराज उर्फ युवा राजू भास्कर (वय ३४, रा.बोरावल गेट,यावल) हा आपल्या ओळखीचा भूषण कैलास सपकाळे (वय ३१ रा. वराडसिम, डॉ. आंबेडकरनगर, ता. भुसावळ) याला विक्रीसाठी गावठी पिस्तूल आणला होता. पोलिसांनी सापळा रचून दोघांना पकडले. त्यांच्या अंगझडतीत गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूस व दोन मोबाईल हॅण्डसेट असा एकूण ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. चौकशीत…

Read More