Author: saimat

सहयोग कॉलनी पिंप्राळा परिसरात श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञाची सांगता   जळगाव – शहरातील सहयोग कॉलनी पिंप्राळा परिसरात कै.रविंद्र बाजीराव पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त इस्कॉनच्या सहयोगाने पाटील परिवारातर्फे आयोजित सात दिवसीय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ उत्साहात पार पडला. श्रीमद भागवत कथा प्रवक्ता श्रीमान उद्धव प्रभुजी (भागवत शास्त्री, वृंदावन) होते. कथेचे आयोजन दि.११ ते १७ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आलेले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणूनन जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, इस्कॉन जळगावचे अध्यक्ष पार्थसारथी प्रभुजी, श्रीमान चैतन्य जीवन प्रभुजी, आदित्य वामनदास, उत्तम मोहन दास, डॉ.माधव दास व समस्त पिंप्राळा हरे कृष्ण भक्त उपस्थित होते. शेवटी मधुर कीर्तनाने कथेची सांगता झाली. कथा कै.रविंद्र पाटील यांच्या…

Read More

सौर पंपासाठी १५ दिवसात विज जोडणी; शेंदुर्णी परिसरातील चित्र बदलविणार शेंदुर्णी , ता. जामनेर । प्रतिनिधी जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सीसीआयने बंद केलेली कापूस खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली जाईल. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा उत्पादित माल घरातच राहणार नाही, याची काळजी राज्य शासन घेईल. या परिसराचे चित्र बदलण्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासन करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.दी शेंदुर्णी सेकंडरी को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त अमृत ग्रंथ प्रकाशन आणि नूतन इमारतीचा पायाभरणी समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता…

Read More

सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीकडून उत्कृष्ट मिरवणुकीला पुरस्कार देणार जळगाव (प्रतिनिधी )- सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शहरात १६ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्त पूर्वतयारीसाठी विष्णू भंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली हाउसिंग सोसायटी हॉल येथे बैठकीचे आयोजन केले होते. सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीकडून यंदा उत्कृष्ट मिरवणुकीला पुरस्कार दिला जाणार आहे. यावर्षी शिवजयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा म्हणुन प्रतिभाताई शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. २० वर्षापासून सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शहरात सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा केला जात आहे. सामाजिक ऐक्य, शिवाजी महाराजांचा इतिहास याबाबत बौद्धिक प्रबोधन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे केले जाते . यावर्षीही शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने विविध उपक्रम राबवण्याचे निर्णय घेण्यात आले. यावर्षी 18 फेब्रुवारीरोजी सायंकाळी…

Read More

आरोपीच्या सुटकेसाठी पथकावर हल्ला करीत पोलिसालाच डांबले जळगाव ( प्रतिनिधी ) — गावठी कट्टा विकणाऱ्या आरोपीच्या शोधात चोपडा ग्रामीण पोलीस गेले असता आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर गावातील काहीजणांकडून पोलिसांवरच हल्ला करण्यात आल्याची घटना चोपडा तालुक्यातील महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेलगत उमर्टी इथे घडली. हल्ल्यानंतर एका पोलिसाला डांबून ठेवण्यात आले, मारहाणीत सहायक पोलिस निरीक्षकासह दोन जण जखमी झाले आहेत. चार तासांच्या थरारानंतर या पोलिस कर्मचाऱ्याला सुखरुप परत आणण्यात पोलिसांना यश आले या घटनेने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांचेच अपहरण होऊन डांबून ठेवण्याचा प्रकार होत असेल तर नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर उमर्टी गाव असून एक गाव महाराष्ट्रात तर दुसरे…

Read More

डॉ. होमी भाभा स्पर्धा परीक्षेत प्रसाद कुलकर्णीचे यश जळगाव ( प्रतिनिधी) – विवेकानंद प्रतिष्ठान संचालित कै. श्रीमती ब. गो. शानभाग विद्यालयातील इ 6 वीतील विद्यार्थी प्रसाद संदीप कुलकर्णी याने डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेमध्ये ॲक्शन रिसर्च प्रोजेक्ट या फेरीसाठी नामांकन प्राप्त केले आहे. होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा भारत सरकारच्या शास्त्र आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्चद्वारे आयोजित केली जाते. ही परीक्षा विज्ञान आणि गणितामध्ये प्रगती करणाऱ्या बालकांना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केली जाते. विद्यार्थ्यांना शोध, संशोधन आणि नवीन विचारांचे महत्त्व समजून घेण्यासाठी प्रोत्साहित करते. विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर संशोधन व आवडीचे क्षेत्र वाढवण्यासाठी प्रोत्साहित करणे. त्यांच्या वैज्ञानिक आणि तांत्रिक…

Read More

सातपुडा ऑटोमोबाईलकडून महिंद्राच्या एक्सइव्ही९इ , बीइ६ इ कारचे अनावरण जळगाव ( प्रतिनिधी) – सातपुडा ऑटोमोबाईलकडून महिंद्राच्या एक्सइव्ही९इ , बीइ६ इ कारचे अनावरण नुकतेच करण्यात आले. ना. गिरीश महाजन, ना. गुलाबराव पाटील, प्रमोद पाटील, मनोज पाटील , प्रा. डी. डी. बच्छाव,किरण बच्छाव, विनोद तराळ, छबीराज राणे, दिनेश सोनवणे, राजेश जगताप (एरिया सेल्स मॅनेजर) यांच्या उपस्थितीत हे अनावरण करण्यात आले. महिंद्रा कंपनीच्या दोन इलेक्ट्रिक एसयुव्ही कारने बाजारात दिमाखात प्रवेश केला. या दोन खास कार जळगावच्या बाजारात उतरवण्यात आल्या आहेत. 500 पेक्षा जास्त किलोमीटर रेंज, ॲडास लेवल टू प्लस -प्लस, 19 ईंची टायर, 150 लिटर फ्रंक, Be -6 या मॅाडेलमधे 400 प्लस लिटरपेक्षा…

Read More

विद्यापीठात हेल्मेटसक्ती जळगाव ( प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात दुचाकी वाहनांसाठी हेल्मेटसक्ती करण्यात आली असून १४ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरु झाली आहे. हेल्मेट परीधान न करणाऱ्यांना विद्यापीठ प्रवेशद्वारापासून आत प्रवेश देण्यात आला नाही. १३ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाने सूचना काढून दुचाकी वाहनांसाठी हेल्मेट सक्ती व चार‍चाकी वाहनांसाठी सिटबेल्टचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. १४ फेब्रुवारी पासून विद्यापीठाच्या राष्ट्रीय महामार्गाजवळील मुख्य प्रवेशद्वार तसेच मुलांचे वसतीगृहाजवळील प्रवेशद्वाराजवळ हेल्मेट न घालणाऱ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. प्रवेशद्वाराजवळ दुचाकी वाहन लावून अनेक जण पायी विद्यापीठात आले. ६० पेक्षा अधिक वाहनांना रोखण्यात आले.

Read More

कुसुंबा शिवारातून घोडा चोरणारे कोंबडी बाजार , शिवाजीनगरातील चोर अटकेत जळगाव (प्रतिनिधी ) – कुसुंबा शिवारात मोकळ्या जागेत बांधलेला घोडा चोरणाऱ्या ३ आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी २४ तासांच्या आत शोधून गजाआड केले . त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आलेला घोडा पोलिसांनी मालकाच्या हवाली केला आहे फिर्यादी नामे कृष्णा जोशी ( वय २७, रा सिंधी कॉलनी, गणेश नगर) यांचा घोडाबग्गीचा व्यवसाय आहे. त्यांचा १ लाख रुपये किंमतीचा सिंधी जातीचा घोडा त्यांनी कुसुंबा शिवारात मोकळ्या जागी बांधलेला होता ९ फेब्रुवारीरोजी दुपारी अज्ञात चोरांनी हा घोडा चोरुन नेला होता. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसीचे पो नि संदीप पाटील यांनी पोउनि राहुल तायडे,…

Read More

जी. एच. रायसोनी महाविद्यालयाला शिक्षण मंत्रालयाचे ‘३ . ५’ स्टार’ रेटिंग जळगाव (प्रतिनिधी ) — शहरातील स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटला केंद्रीय शिक्षण मंत्रालय व इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल अंतर्गत वर्षभर घेण्यात आलेल्या उपक्रमाचे परीक्षण करून भारत सरकारने सलग तिसऱ्या वर्षी ‘३.५’ स्टार रेटिंग’ देऊन सन्मानित केले. दरवर्षी शिक्षण मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलतर्फे भारतातील महाविध्यालयांमध्ये स्टार्ट-अप संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांसाठी हे रेटिंग दिले जाते. यंदा देशभरातून ५,४५५ संस्थांनी सहभाग नोंदविला होता. यात ‘३.५’ मानांकन मिळविणारे रायसोनी महाविद्यालय उत्तर महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे. तंत्रशिक्षणात रायसोनी इन्स्टिट्यूट सतत नवीन उपक्रम राबवत विद्यार्थ्यांच्या विकासाचा आलेख उंचावत असते. ‘इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल’…

Read More

छोटा हत्ती चोरणाऱ्या दोघांना पकडले जळगाव (प्रतिनिधी ) – तालुक्यातील कुसुंबा येथून मालवाहू छोटा हत्ती चोरी केल्याच्या गुन्ह्यातील दोन चोरट्यांना एमआयडीसी पोलीसांनी मास्टर कॉलनीतून अटक केली या दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती मंगळवारी दुपारी पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क विभागाने दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात दिली आहे. स्वप्नील राठोड (रा. कुसुंबा) यांचे ९ लाख रूपये किंमतीचे मालवाहू वाहन क्रमांक (एमएच १९ सीएक्स ०३९०) राहत्या घरासमोरून चोरून नेले होते. २२ जानेवारीरोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या तपास पथकाने घटनास्थळ आणि त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात आरोपीने मास्क लावून बनावट चावीने…

Read More