Author: saimat

 ‘आम्ही लोक आदिवासी’ या कवितेची कविकट्टा या व्यासपीठवर निवड झाली. साईमत/भडगाव/प्रतिनिधी :  सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पिंपरखेड (ता.भडगाव) येथील माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेतील माध्यमिक शिक्षक कवी राम सखाराम जाधव यांची ‘आम्ही लोक आदिवासी’ या कवितेची कविकट्टा या व्यासपीठवर निवड झाली. दि.३ जानेवारी रोजी सत्र क्र.११ मध्ये दुपारी १२ ते १ या वेळेत कविताचे सादरीकरण होणार आहे. कवी राम जाधव हे आदिवासी बोलीभाषा व बंजारा बोलीभाषेचे अभ्यासक आहेत.आदिवासी बालकांमध्ये राहून त्यांनी पारंपरिक, मौखिक, लोकगीते जमवून त्यांनी त्या गीतांचा मराठी या प्रमाण बोलीभाषेत काव्यात्मक अनुवाद केला आहे. आदिवासी बोलीभाषेतील गीतांच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना चार ते पाच…

Read More

सांस्कृतिक महोत्सव ‘रेझोनन्स’ नुकताच उत्साहात पार पडला.महोत्सवाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. साईमत/चोपडा/प्रतिनिधी :  येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कला, संस्कृती, इतिहासप्रेम व सर्जनशीलतेचे प्रभावी दर्शन घडवणारा दोन दिवसीय वार्षिक सांस्कृतिक महोत्सव ‘रेझोनन्स’ नुकताच उत्साहात पार पडला.महोत्सवाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब घोलप यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शाळेच्या वार्षिक कॅलेंडर २०२६ चे प्रकाशनही करण्यात आले. कार्यक्रमास मानसी धीरज बाविस्कर, उमेश करोडपती, डॉ. विकास हरताळकर, घनश्याम अग्रवाल, वैशाली पंडित, प्रवीण सोनवणे, सुभाष पटेल, प्राचार्य अरुण पाटील, प्राचार्या सुरेखा मिस्त्री आदी मान्यवरांसह संस्थेचे पदाधिकारी व शिक्षकवृंद उपस्थित होते. संस्थेतर्फे सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पहिल्या दिवशी बॉलीवूड…

Read More

सबगव्हाण टोल प्लाझावर वाहनांना लावले रिफ्लेक्टर साईमत/पारोळा /प्रतिनिधी दाट धुके, थंडीची लाट आणि सतत खराब होणारे हवामान लक्षात घेऊन भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जळगाव युनिटतर्फे रस्ते अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष रस्ता सुरक्षा जागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे.टोल संकलन करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापक भूषण सुरेश बागूल, उपव्यवस्थापक सचिन श्रीधर दळवी यांच्या उपस्थितीत सबगव्हाण टोल प्लाझावर वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. तसेच वाहन चालकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती देऊन सुरक्षित वाहन चालवण्यावर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे अपघात टाळण्यास मदत होणार आहे. ही मोहीम साधारणतः एक ते दोन आठवडे सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली.

Read More

नगराध्यक्षांसह २२ जागांवर भाजप विजयी, राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचा ४ जागांवर प्रवेश साईमत/जामनेर /प्रतिनिधी :   जामनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने वर्चस्व कायम राखत नगराध्यक्ष पदासह एकूण २२ जागांवर विजय मिळवला असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाने चार जागांवर विजय मिळवत नगरपरिषदेत प्रवेश केला आहे. जामनेर नगरपरिषदेतील एकूण १७ नगरसेवक पदांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. यापूर्वीच भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधनाताई महाजन यांच्यासह नऊ नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे उर्वरित १७ जागांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते. या निवडणुकीची मतमोजणी २१ डिसेंबर रोजी जामनेर येथील जळगाव रोडवरील शासकीय आयटीआय येथे पार पडली. मतमोजणीदरम्यान भाजपाला सर्व २७ जागा मिळतील,…

Read More

शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये हरित सेनेतर्फे जनजागृती करण्यात आली. साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   येथील खुबचंद सागरमल विद्यालयातर्फे मकरसंक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजा वापरामुळे होणारे धोके लक्षात घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये हरित सेनेतर्फे जनजागृती करण्यात आली. यावेळी नायलॉन मांजामुळे पक्षी, माणसे व प्राणी जखमी होतात. तसेच पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. याबाबत मुख्याध्यापक योगीनी बेंडाळे यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली. नायलॉन मांजा वापरणे कायद्याने गुन्हा असून त्यासाठी दंड व शिक्षा होऊ शकते, याची जाणीव करून दिली. तसेच विद्यार्थ्यांनी कागदी, कापसाची किंवा पर्यावरणपूरक मांजा वापरण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी “नायलॉन मांजा वापरणार नाही व इतरांनाही वापरू देणार नाही” अशी प्रतिज्ञा घेतली. शाळा परिसरात नायलॉन मांजा वापराविरोधात फलक लावून जनजागृती…

Read More

दोन चिमुकल्यांच्या मृत्यूने शहरात संतापाची लाट साईमत/भडगाव/प्रतिनिधी :   येथील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये झालेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ शनिवार दि.२० रोजी संपूर्ण शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. शाळेतील निष्काळजीपणामुळे दोन चार वर्षीय चिमुकल्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप असून या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना तसेच नागरिकांनी एकत्र येत बंदची हाक दिली होती. शहरवासीयांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भडगाव शहरातील मुख्य बाजारपेठेसह अंतर्गत रस्त्यांवरील सर्व दुकाने, व्यापारी संकुले, हॉटेल्स, भाजीपाला विक्रेते, किराणा दुकाने आणि खासगी आस्थापने पूर्णपणे बंद राहिल्या. सकाळपासूनच शहरात शुकशुकाट दिसत होते. नेहमी गजबजलेली बाजारपेठ पूर्णतः रिकामी पडली…

Read More

जिल्हा परिषदेत ‘सकारात्मक शिस्त’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. साईमत/ पहूर, ता. जामनेर/प्रतिनिधी :  तालुक्यातील जोगलखेडे जिल्हा परिषद शाळेत पाचवी शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या डिजिटल मार्गदर्शक सूचनेनुसार परिषदेत ‘सकारात्मक शिस्त’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित शिक्षक आणि अधिकारी मुलांच्या सर्वांगीन विकासासाठी आवश्यक असलेल्या नैतिक मूल्यांची रुजवणूक, आनंददायी शिक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनाबाबत सविस्तर सूचना दिल्या. अध्ययन निष्पत्ती व मासिक नियोजनाबाबत चंदन राजपूत यांनी मार्गदर्शन केले. शिक्षण परिषदेत गुणवत्ता सुधारणा व विचारविनिमयाला महत्त्व दिले गेले. उद्घाटनासाठी पोलीस पाटील विजय पाटील आणि उपसरपंच श्रीकांत चौधरी उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर पाटील यांनी मार्गदर्शन कसे करावे, शिक्षकांचे कर्तव्य…

Read More

रघुनाथराव गरूड यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन साईमत/जामनेर/प्रतिनिधी :   तालुक्यातील पाळधी येथील धी. शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती क.द.नाईक माध्यमिक विद्यालयात स्व.आचार्य गजाननराव रघुनाथराव गरूड यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत सदस्य मनोज नेवे यांच्याहस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी मुख्याध्यापक एस.एन. पाटील, सर्व शिक्षकवृंद तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. स्पर्धा सुरू करण्यापूर्वी उपस्थितांनी स्व. आचार्य स्व.आचार्य गजाननराव करूड यांना अभिवादन करून त्यांच्या कार्याची आठवण व्यक्त केली.मुख्याध्यापक एस.एन. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना क्रिकेटसारख्या खेळांमुळे शारीरिक स्वास्थ्य सुधारते तसेच विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, संयम आणि धैर्य यासारख्या मूल्यांची जोपासना होते, असे सांगितले.…

Read More

वीज ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी व संताप व्यक्त होत आहे. साईमत/भडगाव/प्रतिनिधी :   दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सत्तेत असताना प्रत्येक कुटुंबाला २०० युनिट वीज मोफत दिली होती. त्यानंतर त्यांच्याच पक्षाने पंजाबमध्ये मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सरकारकडून ३०० युनिटपर्यंत प्रत्येक कुटुंबाला मोफत वीजपुरवठा केला. या राज्यांमध्ये या योजनेमुळे वीज कंपनी व राज्याचे बजेट फायदेशीर ठरले आहे. महाराष्ट्रात मात्र महागडा वीजपुरवठा देत वीज दर सतत वाढत असल्याने राज्यातील वीज ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी व संताप व्यक्त होत आहे. दिल्ली व पंजाबमधील यशस्वी योजनांच्या पार्श्वभूमीवर येथेही कमीत कमी २०० युनिट वीज मोफत पुरवावी, अशी मागणी पाचोरा भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, राष्ट्रपती…

Read More

ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष ; पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी साईमत/ पहूर ता. जामनेर/प्रतिनिधी :  जामनेर तालुक्यातील पहूर येथे वाघूर नदीच्या पात्रात गावातील नाल्यांमधील सांडपाणी व कचरा थेट टाकला जात असल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या गंभीर प्रकाराकडे ग्रामपंचायतीकडून सोयीस्कर दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘नमामि गंगे’ अभियान राबविण्यात येत असून नद्यांचे संवर्धन व स्वच्छता हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. मात्र, पहूर येथील वाघूर नदीत वर्षानुवर्षे गावातील सांडपाणी सोडले जात असून, आता त्यात भर म्हणून नाल्यांमधील केरकचरा व उकिरडा थेट नदीपात्रात टाकला जात आहे. परिणामी नदीचे स्वरूप पूर्णतः दूषित झाले असून कचऱ्याचे…

Read More