मलकापूर नगरपरिषद कारभारावर प्रहारची तक्रार साईमत/ मलकापूर/प्रतिनिधी : मलकापूर शहरात सध्या सुरू असलेल्या विविध विकासकामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, ही कामे नगरपरिषदेतील संबंधित अभियंत्यांच्या आशिर्वादानेच सुरू असल्याची जोरदार चर्चा शहरात रंगू लागली आहे. रस्ते, नाले, सौंदर्यीकरण तसेच इतर सार्वजनिक कामांमध्ये निकृष्ट साहित्याचा वापर, नियमांचे सर्रास उल्लंघन आणि अनेक ठिकाणी अपूर्ण व दर्जाहीन कामे सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शहरातील काही भागांत नव्याने झालेल्या रस्त्यांवर काही दिवसांतच भेगा पडल्याचे, नाल्यांची कामे अर्धवट ठेवण्यात आल्याचे तसेच सौंदर्यीकरणाच्या नावाखाली निकृष्ट साहित्य वापरल्याचे प्रकार समोर येत आहेत. या संदर्भात नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी तक्रारी करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक…
Author: saimat
राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) शिबिराअंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साईमत/मलकापूर/प्रतिनिधी : तालुक्यातील पिंप्रीगवळी राष्ट्रीय विद्यालयातर्फे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) शिबिराअंतर्गत कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या पाचव्या दिवशी सावरगाव (ता.मोताळा) येथे कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किरण पाटील होते. दुपारच्या सत्रात ‘बौद्धिक संपदा’ या विषयावर धामणगाव बढे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश जायले यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, कायदा व सुव्यवस्था याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना कायद्याची मूलतत्त्वे समजावून सांगत सामाजिक शिस्त व जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी मलकापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रसिद्ध विधितज्ज्ञ ॲड.जी.डी.पाटील यांनी पॉक्सो (पीओसीएसओ) कायद्याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती…
प्रधानमंत्री सौर घर मोफत वीज योजना अंतर्गत आयोजित जनजागृती शिबिर उत्साहात पार पडले. साईमत/यावल /प्रतिनिधी : तालुक्यातील सांगवी बु.येथे महावितरण कंपनीमार्फत प्रधानमंत्री सौर घर मोफत वीज योजना अंतर्गत आयोजित विशेष जनजागृती शिबिर उत्साहात पार पडले. शिबिर फैजपूर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता नितीनकुमार पाटील व सहाय्यक अभियंता राहुल कवठे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडले. शिबिरात ग्रामस्थांना वीज बिलावरील नाव बदल प्रक्रिया तसेच प्रधानमंत्री सौर घर योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली. सौर ऊर्जेचा वापर करून वीज बिलामध्ये कशी बचत करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. शिबिर यशस्वितेसाठी महावितरणचे सुरेश मोरे, महेंद्र महाजन, हर्षवर्धन तळेले,जुबेर, योगेश बारी, गोविंदा भास्कर,…
सुरळीत व सुरक्षित वाहतुकीसाठी प्रशासन सज्ज साईमत/चाळीसगाव/ प्रतिनिधी: तालुक्यातील औट्रम (कन्नड) घाट मार्गाची जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांना जोडणारा हा महत्त्वाचा घाट मार्ग असल्याने येथे वाहतूक सुरळीत, सुरक्षित आणि अपघातमुक्त राहावी, या दृष्टीने ही पाहणी करण्यात आली. पाहणीदरम्यान घाटातील रस्त्यांची सद्यस्थिती, वाहतुकीतील अडथळे, संभाव्य अपघातप्रवण ठिकाणे तसेच वाहतूक नियंत्रण आणि सुरक्षिततेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा सखोल आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणांना वाहतूक कोंडी होणार नाही याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या. तसेच घाट मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देशही देण्यात आले. अपघातप्रवण ठिकाणी सूचना फलक,…
सहारा नसलेल्या महीला तसेच वृद्ध ,निराधार मनोरुग्ण यांना थंडी पासुन बचाव म्हणून ब्लॅकेट चे वाटप केले साईमत/जामनेर /प्रतिनिधी : सद्या हिवाळ्याचे दिवस असल्याने कडाक्याची थंडीत उघड्यावर राहणारे, आर्थिकदृष्टा दुर्बल कुटुंबे,वृद्ध निराधार व्यक्ती यांना थंडीचा जास्त त्रास सहन करावा लागत असून त्यांना मायेची उब मिळावी या साठी चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशनने ग्रामीण भागातील गरजूंना मोफत ५०० ब्लॅकेटचे वाटप करून त्यांच्या जीवनात मायेची उब निर्माण करण्याचा काहीसा प्रयत्न बोदवड केला आहे. चिल्ड्रन्स हार्ट फाऊंडेशन चे अध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते संवेदनशील व्यक्तीमत्व संदीप सिंग यांनी आत्मसन्मान फाऊंडेशन बोदवड येथील कोणाचाही सहारा नसलेल्या महीला तसेच वृद्ध ,निराधार मनोरुग्ण यांना थंडी पासुन बचाव म्हणून ब्लॅकेट चे वाटप…
कुलगुरूंच्या हस्ते प्रकाशन साईमत /जळगाव /प्रतिनिधी प्राईम पब्लिशिंग हाऊसतर्फे प्रकाशित संरक्षणशास्त्र विषयावरील आठ क्रमिक व संदर्भ ग्रंथांचे प्रकाशन कुलगुरू प्रा. एस. एल. माहेश्वरी यांच्या हस्ते कुलगुरू यांच्या दालनात नुकतेच पार पडले. याप्रसंगी ज्येष्ठ लेखक प्रा. ए. पी. चौधरी, डॉ. देवेंद्र विसपुते, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. विजय पालवे, कला शाखेचे अधिष्ठाता डॉ. जगदीश पाटील, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, सिनेट सदस्य डॉ. सुरेखा पालवे तसेच प्राईम पब्लिशिंग हाऊसचे संचालक प्रदीप पाटील यांच्यासह अनेक शिक्षणतज्ज्ञ, मान्यवर उपस्थित होते. ग्रंथांचे शैक्षणिक व संशोधनपर महत्त्व कुलगुरू प्रा. एस. एल. माहेश्वरी यांनी अधोरेखित केले. संरक्षणशास्त्राच्या अभ्यासासाठी तसेच संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे ग्रंथ मार्गदर्शक…
पिंप्राळा भागात राहणाऱ्या एका तरूणाने विषारी औषध घेतल्याने उपचारादरम्यान मृत्यू साईमत/ जळगाव/ प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा भागात राहणाऱ्या एका तरूणाने विषारी औषध घेतल्याने उपचारादरम्यान १८ डिसेंबर रोजी दुपारी ५ वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी सायंकाळी ८ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, मयत झालेल्या तरूणाचे विनोद अमृत सोनवणे (वय ४०, रा. पिंप्राळा) असे नाव आहे. जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात विनोद सोनवणे हे वास्तव्यास होते. १७ डिसेंबर रोजी त्यांनी काहीतरी विषारी औषध प्राशन केले. त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत विनोद सोनवणे यांना मयत…
शहर पोलिसात पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल साईमत /जळगाव/ प्रतिनिधी फळांचा व्यापार करण्यासाठी ‘माहेरून एक लाख रुपये घेऊन ये’, अशी मागणी करत शिवाजीनगरातील माहेरवाशीणीचा दमण गुजरात येथे सासरी शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी, १७ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता शहर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी आरफा नईम खान (वय २९, रा. शिवाजी नगर, हुडको) यांचा विवाह वापी (दमण, गुजरात) येथील नईम खान रहीम खान यांच्याशी झालेला आहे. लग्नानंतर ३१ मे २०१५ पासून ते २०२२ पर्यंत सासरी वापी येथे आणि त्यानंतर जळगाव येथे फिर्यादी वास्तव्यास असताना सासरच्या मंडळींनी…
२८ वर्षीय महिलेचा हात पकडून अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना साईमत /जळगाव/ प्रतिनिधी शहरातील एका भागात राहणाऱ्या २८ वर्षीय महिलेचा हात पकडून अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना बुधवारी, १७ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी रात्री ९ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात एका संशयितावर गुन्हा दाखल केला आहे. पीडित महिला बुधवारी दुपारी आपल्या घरी असताना संशयित आरोपी अक्षय पांडूरंग मिस्तरी (वय २५, रा. पिंप्राळा) याने तिचा हात पकडून तिला घरात ओढले. त्यानंतर अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेनंतर धक्का बसलेल्या महिलेने तात्काळ रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन…
गटारीतील सांडपाणी परिसरात पसरल्याने दुर्गंधी साईमत /चाळीसगाव/ प्रतिनिधी शहराच्या मध्यवर्ती भागातील बाराभाई मोहल्ला, वॉर्ड क्रमांक १६ येथे गेल्या अनेक दिवसांपासून तुंबलेल्या गटारी व बंद पथदिव्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सत्यविजय फाउंडेशनचे अध्यक्ष तनवीर शेख बदरुद्दीन यांच्या घरासमोरील गटार पूर्णपणे तुडूंब भरली आहे. मागील महिनाभरापासून सांडपाणी पुढे जात नसल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. तुंबलेल्या गटारीमुळे संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना घरात थांबणेही कठीण झाले आहे. दुर्गंधी, साचलेले पाणी आणि घाण यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे. साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच महिलांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे…