Author: saimat

जि.प.,पं.स. निवडणुकीत उमेदवारांच्या मतदानात मोठा खड्डा पडणार? साईमत/ यावल  /प्रतिनिधी : तालुक्यातील मारूळ ते न्हावी रस्त्याच्या आजूबाजूने मोठ्या प्रमाणात काटेरी झाडे-झुडपे झाल्यामुळे तसेच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने ग्रामस्थांसह वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवाराच्या मतदानावर विपरीत परिणाम होणार असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. मारूळ ते न्हावी रस्त्याचे दोन्ही बाजुने मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडप्यांचे साम्राज्य पसरले आहे. झुडपांमुळे मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत असून मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मारूळ ते न्हावी या ४ कि.मी.लांबीच्या रस्त्यावर झाडाझुडपांमुळे समोरून येणारे वाहन दिसत नाही. या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली असल्यामुळे…

Read More

आठ डंपर जप्त; तहसीलदार व पोलीस यांनी संयुक्तपणे केली कारवाई साईमत/मलकापूर /प्रतिनिधी : अवैध रेती उपसा व वाहतुकीमुळे शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणाऱ्या वाळू माफियांना प्रशासनाने जोरदार दणका दिला आहे. दि.२४ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता कोटेश्वर-जमनापुरी घाट, मौजा नरवेल येथे महसूल व पोलीस विभागाने संयुक्त धडक कारवाई करत रेतीने भरलेले आठ डंपर पकडले. जप्त करण्यात आलेल्या रेतीची अंदाजे किंमत सुमारे १ कोटी ६२ लाख रुपये असल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या आदेशानुसार आणि मलकापूर उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मलकापूर तहसीलदार समाधान सोनवणे मलकापूर शहरचे ठाणेदार गिरी यांच्यासोबत थेट मैदानात उतरून वाळू माफियांवर धडक…

Read More

पारदर्शकतेसाठी संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओ चित्रीकरण साईमत/​जळगाव /प्रतिनिधी :  मानवी आरोग्याला घातक ठरणाऱ्या आणि तरुणाईला नशेच्या विळख्यात ओढणाऱ्या अंमली पदार्थांविरुद्ध जळगाव जिल्हा पोलीस दलाने कठोर पाऊल उचलले आहे. एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत जिल्ह्यातील विविध १९ गुन्ह्यांमध्ये जप्त केलेला तब्बल ७०९.२८० किलोग्रॅम गांजा आज, २४ डिसेंबर रोजी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस महासंचालक (महाराष्ट्र राज्य) यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ही कार्यवाही करण्यात आली. यासाठी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली ‘जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समिती’ स्थापन करण्यात आली होती. जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या मागील मोकळ्या जागेत ही प्रक्रिया राबवण्यात आली. समितीचे अध्यक्ष डॉ. महेश्वर रेड्डी, सदस्य अपर…

Read More

एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल साईमत/जळगाव /प्रतिनिधी : शहरातील एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना सोमवारी, २२ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी, २३ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. जळगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे. दरम्यान, २२ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास पीडित मुलगी ही घरी असताना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवून तिला ठोस लावून पळून नेले. हा प्रकार समोर आल्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. परंतु तिच्या…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सेवादूत प्रकल्पा’  साईमत/जळगाव /प्रतिनिधी :  जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘सेवादूत प्रकल्पा’ अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना विविध शासकीय सेवा आता थेट घरपोच उपलब्ध करून देण्यात येत आहेत. अभिनव उपक्रमाचा लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांना घेता येणार आहे. योजनेचा मुख्य उद्देश दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, रुग्ण तसेच शासकीय कामासाठी प्रत्यक्ष आपले सरकार सेवा केंद्रावर जाणे शक्य नसलेल्या किंवा अर्ज प्रक्रियेबाबत माहिती नसलेल्या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ सुलभपणे मिळवून देणे हा आहे. ‘ सेवादूत प्रकल्पा’ अंतर्गत नागरिकांनी https://sewadootjalgaon.in या पोर्टलवर आपली अपॉइंटमेंट बुक करायची आहे. त्यानंतर संबंधित भागातील आपले सरकार सेवा केंद्रातील केंद्रचालक (सेवादूत) नागरिकांच्या सोयीच्या वेळेनुसार त्यांच्या घरी भेट देऊन…

Read More

दुचाकी चालविणे आणि पायदळ चालणे अशक्य, राजकीय नेत्यांचे दुर्लक्ष साईमत/ यावल  /प्रतिनिधी : यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाने बांधकाम केलेल्या व्यापारी संकुलनासमोर पार्किंग असलेल्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावर पायदळ चालणे आणि मोटरसायकल चालवणे अशक्य झाले आहे याकडे संबंधितांचे ‘अक्षम्य’ असे दुर्लक्ष होत असल्याने व्यापारी वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. जिनिंग प्रेस व्यापारी संकुलनात लाखो रुपये खर्च करून कराराने व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू केली आहे. दुकानासमोर भव्य अशी पार्किंगची व्यवस्था जागा, रस्ता आहे. परंतु या रस्त्यावर दगड-गोटे युक्त खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर दुचाकी चालवणे आणि दुचाकी उभी करणे, चार चाकी वाहन दुकानासमोर नेणे,…

Read More

कै.आचार्य गजाननराव गरुड स्मृती व्याख्यानमाले चे तिसरे पुष्प साईमत/पहूर, ता.जामनेर /प्रतिनिधी :  आनंद हा मनात असतो आणि परिस्थिती बदलण्याऐवजी आपल्या विचारांची दिशा बदलल्यास आनंद मिळतो. इतरांशी तुलना केल्यास असमाधान वाढते, त्यामुळे स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहिल्यास समाधान वाढते. वेळेचे नियोजन, नियमित वाचन, व्यायाम आणि चांगली संगत यासारख्या सकारात्मक सवयी आनंद वाढवतात. दुसऱ्यांच्या उपयोगी होणे, सेवा आणि सहानुभूती यांमुळेही आनंद प्राप्त होतो. तसेच, स्पष्ट ध्येय असलेले अर्थपूर्ण जीवन जीवनाला दिशा देऊन आनंद टिकवते, असे व्याख्यानात अशोक देशमुख यांनी सांगितले. शेंदुर्णी येथील कै.आचार्य गजाननराव गरुड यांच्या ४१ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प प्रसिद्ध वक्ते अशोक…

Read More

 सातत्यपूर्ण गुणवत्ता, शिस्तबद्ध अभ्यास आणि विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग या गुणांमुळे हा सन्मान मिळविला. साईमत/भडगाव /प्रतिनिधी :  भडगाव येथील कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या वतीने स्व.सौ. साधनाताई प्रतापराव पाटील यांच्या नवव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कार्यक्रमात दर्शन विठ्ठल पाटील यांनी ‘साधनाई गुणवंत्त विद्यार्थी’ पुरस्कार सलग तिसऱ्यांदा मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले. दर्शन पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात सातत्यपूर्ण गुणवत्ता, शिस्तबद्ध अभ्यास आणि विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग या गुणांमुळे हा सन्मान मिळविला. सातत्याने तिन्ही वर्षे हा पुरस्कार पटकावणे संस्थेच्या इतिहासातील अभिमानास्पद बाब मानली जाते. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते हेरंब कुलकर्णी, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ व समाजसेवक, यांच्या हस्ते दर्शन पाटील यास सन्मानचिन्ह व…

Read More

युनिव्हर्सल इंटरनॅशनल स्कूलमध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. साईमत/पारोळा /प्रतिनिधी : भारताचे माजी पंतप्रधान व शेतकरी नेते चौधरी चरण सिंग यांच्या जन्मदिनानिमित्त दरवर्षी २३ डिसेंबर रोजी साजरा होणारा राष्ट्रीय किसान दिवस पारोळा येथील युनिव्हर्सल इंटरनॅशनल स्कूलमध्ये वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शेतकऱ्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा सन्मान करण्यासोबतच त्यांच्या समस्या आणि कष्टांविषयी विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या भूमिकेत सहभागी करून घेत शेती कशा प्रकारे केली जाते, शेतकरी शेतात राहून कशा प्रकारे मेहनत घेतात आणि धान्य उत्पादनासाठी कोणत्या प्रक्रिया करतात, याची सविस्तर माहिती देण्यात आली. शाळेच्या परिसरातच लहान स्वरूपाची शेती तयार करून त्यामध्ये विविध…

Read More

विद्यार्थ्यांनी प्राचिन नाणी, वस्तू विनिमय पद्धती, प्राचिन वास्तूंच्या प्रतिकृती यांची माहिती घेतली. साईमत/यावल /प्रतिनिधी :  येथील बाल संस्कार माध्यमिक विद्यालयाची हिवाळी शैक्षणिक सहल उत्साहात पार पडली. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी चंदनपुरी, चांदवड, नाणे संग्रहालय (नाशिक), दादासाहेब फाळके स्मारक, पंचवटी, पांडवलेणी, स्वामिनारायण मंदिर तसेच काळाराम मंदिर या ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना भेटी दिल्या. नाशिक येथील नाणे संग्रहालयात विद्यार्थ्यांनी प्राचिन नाणी, वस्तू विनिमय पद्धती, प्राचिन वास्तूंच्या प्रतिकृती यांची माहिती घेतली. तसेच विविध प्रकारचे जीवाश्म व समुद्री जीवाश्म यांविषयी सविस्तर ज्ञान मिळविले. स्वामिनारायण मंदिरातील सुबक कोरीव काम व स्थापत्यशैलीने विद्यार्थ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले. पंचवटी, पांडवलेणी व काळाराम मंदिर येथील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वाची…

Read More