Author: saimat

श्रीमद् भागवत गीतेचे संपूर्ण १८ अध्याय तोंडी पाठ करण्याचा विशेष उपक्रम राबविण्यात आला. साईमत/ फैजपूर  /प्रतिनिधी : फैजपूर येथील श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समितीच्या वतीने महिला वर्गासाठी श्रीमद् भागवत गीतेचे संपूर्ण १८ अध्याय तोंडी पाठ करण्याचा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेली परीक्षा फैजपूर येथील श्रीराम मंदिरात पार पडली. या परीक्षेसाठी गीतादास चंद्रकांत महाराज साक्रीकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयोजन समितीचे सचिव व डिंगंबर महाराज मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे हे उपस्थित होते. परीक्षेत चार महिलांनी श्रीमद् भागवत गीतेचे संपूर्ण १८ अध्याय तोंडी पाठ म्हणून सादर करून यशस्वीरीत्या परीक्षा उत्तीर्ण केली. उत्तीर्ण झालेल्या महिलांमध्ये कुंदा लक्ष्मण…

Read More

सत्रासेन येथील शाळेत सात दिवसांचे ग्रामीण हिवाळी शिबीर यशस्वी साईमत/चोपडा  /प्रतिनिधी :  ध्येय निश्चितीशिवाय जीवनात यशाचा पर्याय नाही. विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय लवकरात लवकर ठरवून त्याच्या पूर्ततेसाठी सातत्याने आणि कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. जितके मोठे ध्येय ठेवाल, तितके यशही मोठे मिळते, असे प्रतिपादन चोपडा तालुक्याचे गटविकास अधिकारी नरेंद्र पाटील यांनी केले. भगिनी मंडळ चोपडा संचलित समाजकार्य महाविद्यालयाच्या ग्रामीण हिवाळी शिबिराच्या समारोपप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका वंदना सरदार पावरा उपस्थित होत्या. चोपडा संचलित भगिनी मंडळ समाजकार्य महाविद्यालयातील प्रथम वर्ष समाजकार्य स्नातक व प्रथम वर्ष समाजकार्य पारंगत (एमएसडब्ल्यू) वर्गाचे ग्रामीण हिवाळी शिबीर सत्रासेन (ता. चोपडा) येथील…

Read More

पशुवैद्यकीय उपचारांमुळे त्या गोवंशाचे प्राण वाचले. साईमत/पारोळा /प्रतिनिधी :  पारोळा शहरात शौचखड्ड्यात पडलेल्या मोकाट गोवंशाला बजरंग दलाचे कार्यकर्ते व पोलिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ रेस्क्यू करत बाहेर काढले, तर पशुवैद्यकीय उपचारांमुळे त्या गोवंशाचे प्राण वाचले.येथील पोलिस लाईनच्या मागील बाजूस असलेल्या शौचखड्ड्यात मंगळवारी (दि. २३) दुपारी सुमारे चार वाजेच्या सुमारास एक गोवंश जखमी अवस्थेत पडलेला असल्याचे पोलिस कर्मचारी संदीप सातपुते व भुषण पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ याबाबत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता बजरंग दलाचे कार्यकर्ते मनोज चौधरी व डॉ. विशाल देवरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस कर्मचारी संदीप सातपुते व भुषण पाटील यांच्या मदतीने शौचखड्ड्यात अडकलेल्या गोवंशाचे…

Read More

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल साईमत/जळगाव /प्रतिनिधी :  तालुक्यातील वावडदे गावातील मातोश्री नास्ता सेंटरजवळ वाहनाला कट मारल्याच्या किरकोळ कारणावरून एका तरूणाला चार जणांनी धारदार वस्तू आणि लोखंडी रॉड डोक्यात टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी, २२ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता घडली. याप्रकरणी २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जळगाव तालुक्यातील वावडदे गावातून लोकेश धनसिंग पाटील (वय २६, रा.दहीगाव, ता. पाचोरा) दुचाकीने २२ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता घरी जात होता. त्यावेळी रस्त्यावरील मातोश्री नास्ता सेंटर दुकानासमोर लोकेश पाटील याची दुचाकी अडविली. वाहनाला कट का मारला, या कारणावरून संशयित आरोपी बंटी उर्फ दीपक…

Read More

भुसावळ पोलिस उपअधीक्षकपदी नागपूर शहराचे सहाय्यक पोलिस आयुक्त केदार प्रकाश बारबोले यांची नियुक्ती करण्यात आली. साईमत/भुसावळ /प्रतिनिधी :  भुसावळ पोलिस उपअधीक्षकपदी नागपूर शहराचे सहाय्यक पोलिस आयुक्त केदार प्रकाश बारबोले यांची नियुक्ती करण्यात आली. राज्य शासनाच्या गृह विभागाचे कार्यासन अधिकारी मृणाल कृष्णा सावंत यांनी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत.केदार बारबोले यांनी यापूर्वी सन २०२४ मध्ये जळगाव येथे प्रोबेशनरी अधिकारी म्हणून काम केले असून जिल्ह्याची त्यांना इत्यंभूत माहिती आहे. शांत, संयमी व शिस्तप्रिय अधिकारी अशी त्यांची ओळख असून त्यांच्या नियुक्तीमुळे भुसावळ पोलिस दलाला अनुभवी नेतृत्व मिळणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, भुसावळचे विद्यमान पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांची पदोन्नतीवर बदली होणार आहे.…

Read More

शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाची सुरुवात साईमत/नेरी, ता.जामनेर/प्रतिनिधी :  शेतकऱ्यांसाठी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रब्बी) २०२५-२६ अंतर्गत जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी देवप्रिंपी गावात दाखल झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा.बी.एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा.व्ही.एस.पाटील व विषयविशेष तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी गावातील शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रम राबवतील. कृषी दूत धिरज गोकुळ पाटील, श्रीकृष्ण पुंडलिक सोनोने, पैदीमरला नरसिंहा रेड्डी, शेखर नाना ठाकरे आणि विवेक प्रेमराज वरखड या गावात राहून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून मार्गदर्शन देतील. शेतजमिनीची माती व पाणी परीक्षण, विविध पिकांची लागवड, तंत्रज्ञानाचा वापर, पिकांवर येणारे रोग व त्यांचे निवारण या विषयांवर शेतकऱ्यांना…

Read More

सेना-भाजपाचे बहुमत असूनही समन्वयाचा हात; ना. गुलाबराव पाटलांची विकासकेंद्री भूमिका साईमत/पाळधी, ता.धरणगाव /प्रतिनिधी :  धरणगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत २३ पैकी १५ नगरसेवक निवडून येत शिवसेना-भाजपा युतीला स्पष्ट बहुमत मिळाले असतानाही, नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर राजकीय अहंकार न दाखवता विकास आणि समन्वयाचा सकारात्मक संदेश देणारी घडामोड घडली आहे. शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आलेल्या नगराध्यक्षा लिलाबाई सुरेश चौधरी तसेच त्यांच्या सोबत निवडून आलेल्या आठ नगरसेवकांनी पालकमंत्री तथा राज्याचे शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी पालकमंत्र्यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करत अभिनंदन केले.विशेष म्हणजे, नगरपरिषदेवर शिवसेना-भाजपा युतीचे स्पष्ट बहुमत असतानाही नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर कोणतीही राजकीय कटुता न ठेवता शहरहिताला…

Read More

‘हसत-खेळत गणित शिकूया’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांसाठी ‘मथ्स वीक’ शिक्षणावर भर देण्यात आला. साईमत/पारोळा/ प्रतिनिधी विद्यार्थ्यांमध्ये गणिताविषयी आवड, आत्मविश्वास व तार्किक विचारशक्ती विकसित व्हावी म्हणून गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त पारोळा येथील टायगर इंटरनॅशनल स्कूलमध्ये आठवडाभर विविध गणितीय उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. हा उपक्रम स्कूलचे अध्यक्ष रवींद्र पाटील व संचालिका रुपाली पाटील यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला. त्यांनी उपक्रमाचे उद्घाटन करत, गणित हा केवळ विषय नसून जीवनातील महत्त्वाचा घटक असल्याचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनात सांगितले. प्राचार्य पी.एस.पाटील यांनी विद्यार्थ्यांना गणिताची भीती दूर करून विविध उपक्रमांतून आनंदाने गणित आत्मसात करण्याचे आवाहन केले. आठवडाभर गणितावर आधारीत शैक्षणिक गाणी, प्रेरणादायी चित्रपट, गणितीय खेळ स्पर्धांचे आयोजन करण्यात…

Read More

जनता कला व वाणिज्य महाविद्यालयात एन.सी.सी. विभागाच्या वतीने घरगुती गॅस अपघात प्रतिबंध व सुरक्षा कार्यशाळा घेण्यात आली. साईमत/मलकापूर /प्रतिनिधी :  घरगुती गॅसच्या सुरक्षित वापराविषयी जनजागृती निर्माण व्हावी व संभाव्य अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारीची माहिती नागरिकांना मिळावी, या उद्देशाने मंगळवार दि.२३ डिसेंबर रोजी जनता कला व वाणिज्य महाविद्यालयात एन.सी.सी. विभागाच्या वतीने घरगुती गॅस अपघात प्रतिबंध व सुरक्षा कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. सुधीर चव्हाण होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेफ्टनंट वाय.एस.राजपूत यांनी केले. प्रमुख उपस्थितीत डॉ. एस. एस. शुक्ला होते. कार्यशाळेत रचना गॅस ॲण्ड अप्लायन्सेसचे व्यवस्थापक कुणाल मिलिंद यावतकार यांनी घरगुती एलपीजी सिलिंडर, रेग्युलेटर, पाईप व इतर उपकरणांचा सुरक्षित…

Read More

ॲड.अर्जुन पाटील यांचे प्रबोधनात्मक भाषण; पिठलं-भाकरीच्या समतेच्या पंगतीतून मानवतेचा संदेश साईमत/बोदवड/प्रतिनिधी : दगडाच्या देवाला नैवेद्य दाखवण्यापेक्षा भुकेल्याला भाकरी द्या, हाच खरा धर्म आहे, असे क्रांतिकारी विचार मांडणारे संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बोदवड दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरात वैचारिक प्रबोधनाचा जागर करण्यात आला. बोदवड वकील संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत माणुसकीचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बोदवड वकील संघाचे अध्यक्ष ॲड. अर्जुन पाटील यांनी भूषविले. आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी भाषणात त्यांनी संत गाडगे महाराज हे केवळ संत नसून समाज परिवर्तनाचे चालते-फिरते विद्यापीठ होते, असे प्रतिपादन केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, व्यसनाधीनता आणि अस्वच्छता याविरोधात महाराजांनी आयुष्यभर लढा दिला.…

Read More