हिंदी–मराठी पत्रकार संघाचा ‘दर्पण रत्न पुरस्कार २०२६’ जाहीर साईमत/लोहारा, ता.पाचोरा /प्रतिनिधी : लोहारा येथील डॉ.जे.जी.पंडित विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या तक्षशिला विद्यालय,महाविद्यालय, मुंबई विभागात कार्यरत असलेले डॉ. अर्जुन भोई यांना हिंदी-मराठी पत्रकार संघ (आयएसओ ९००१-२०१५ मानांकन प्राप्त) यांच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय ‘दर्पण रत्न पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. वृत्तपत्र सेवेबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, चित्रपट, सहकार, नाट्य व राजकीय क्षेत्रातील त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याची देशपातळीवरही ओळख असून यापूर्वी त्यांना नॅशनल आयडियल टीचर अवॉर्ड (कोल्हापूर), राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार (जेजुरी) तसेच राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार (पुणे) देऊन सन्मानित करण्यात आले.याशिवाय अमेरिकन…
Author: saimat
मोतीमाता देविच्या यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ही यात्रा दि.३ व ४ जानेवारी रोजी भरणार आहे साईमत /जामनेर /प्रतिनिधी तालुक्यातील गारखेडा येथून जवळच असलेल्या मांडवेदिगर (ता.भुसावळ) येथे मोतीमाता देविच्या यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून ही यात्रा दि.३ व ४ जानेवारी रोजी भरणार आहे. बंजारा समाजाची कुलस्वामिनी मोतीमाता देवीचे जागृत देवस्थान असून या देवीचा यात्रोत्सव सालाबादाप्रमाणे मोतीमाता मंदिर देवस्थान ट्रस्टतर्फे यावर्षी देखील शाकंभरी(पौष) पौर्णिमेला दि.३ जानेवारीआणि ४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. या यात्रोत्सवामध्ये संपूर्ण खान्देश व महाराष्ट्रातील विविध भागातून बंजारा समाज व अन्य समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. या यात्रोत्सवाला जय सेवालाल बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र…
पशुवैद्यकीय डॉक्टरांनी जनावरांना लस दिली साईमत /जामनेर /प्रतिनिधी माळपिंप्रीत किसान सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या जनावरांचे लसीकरण करण्यात आले. हा उपक्रम डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वर्ष २०२५-२६ साठी आयोजित केला होता.कार्यक्रमाचे मार्गदर्शन प्राचार्य डॉ.शैलेश तायडे, समन्वयक प्रा.बी.एम.गोनशेटवाड, कार्यक्रमाधिकारी प्रा.व्ही.एस.पाटील आणि प्रा.पी.एस.देवरे यांनी केले. तसेच मोहाडी, पळसखेडे आणि देवपिंपरी येथील कृषी दूतही सहभागी झाले. ग्रामपंचायत आवारात लसीकरणाला सुरुवात झाली. सरपंच किरण पाटील आणि पशुवैद्यकीय डॉ.अमोल वऱ्हाडे व डॉ.रवींद्र बिझोटे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात एफ.एम.डी.या रोगाच्या लक्षणांबाबत अमीन मुजावर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. श्रीकृष्ण सोनवणे यांनी लसीकरणाचे फायदे व प्रतिबंधक उपाय सांगितले. तर किरण इंगळे यांनी लसीकरणाची पद्धत आणि व्यवस्थापनाबाबत माहिती…
धनाजी नाना विद्यालयात राष्ट्रीय गणित महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला. साईमत /फैजपूर/ प्रतिनिधी खिरोदा (ता.रावेर) येथील धनाजी नाना विद्यालयात राष्ट्रीय गणित महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्याहस्ते करण्यात आला.गुजरात कौन्सिल ऑफ सायन्स सिटी आणि अखिल भारतीय रामानुजन गणित क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदाबाद येथे राष्ट्रीय गणित महोत्सव तसेच १९वे राष्ट्रीय गणित संमेलन हे २० ते २२ डिसेंबर २०२५ या कालावधीत उत्साहात पार पडले. या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमात भारतातील २१ राज्यांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या महोत्सवात रमण सायन्स टेक्नॉलॉजी ॲण्ड फाउंडेशन इंडिया व जनता शिक्षण मंडळ, खिरोदा संचलित कलाम सायंटिस्ट सेंटर, खिरोदा येथील १० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत उल्लेखनीय यश…
बुलढाणा रोडवरील अतिक्रमणधारकांचे लाखोंचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली साईमत/ मलकापूर/प्रतिनिधी भरधाव ट्रकवरील चालकाचा ताबा अचानक सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानांवर आदळला. ही घटना बुलढाणा रोडवर शनिवार दि.२७ रोजी पहाटे सुमारे २.३० वाजेच्या सुमारस घडली असून अपघातात व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने जीवीतहानी टळली. ट्रक क्र.(एम.एच.४०-बीसी-५६०८) वरील चालकाचा अचानक ताबा सुटला आणि ट्रक थेट बुलढाणा रोडवरील रस्त्याकडेला असलेल्या दुकानांवर आदळला. या अपघातात अतिक्रमणधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. भीषण अपघातात रस्त्यालगत असलेल्या टपऱ्या, हातगाड्या व त्यातील साहित्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. टपऱ्यांमधील वस्तू रस्त्यावर विखुरल्या गेल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने ही…
जिल्हापेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल साईमत/ जळगाव /प्रतिनिधी : शहरातील नवीन बसस्थानक आवारातून दोन तरूणांचे महागडे दोन मोबाईल चोरून नेल्याची घटना मंगळवारी, २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जळगाव शहरात महाविद्यालयीन शिक्षण घेणारे विद्यार्थी निखिल राजू मानके (वय २०, रा. धानवड, ता. जळगाव) आणि मयूर मांगू पाटील (वय २०, रा. चिंचखेडा, ता. जळगाव) हे २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शहरातील नवीन बसस्थानक आवारात असतांना अज्ञात चोरट्यांनी दोघांचे महागडे मोबाईल चोरून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वत्र मोबाईलचा शोध घेतला.…
पोलिसांचा दणका : १३ लाख ७१ हजारांचा दंड वसूल साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जिल्ह्यातील वाढते रस्ते अपघात आणि गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी, २४ डिसेंबर रोजी धडक ‘विशेष वाहन चेकिंग मोहीम’ राबवण्यात आली. मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११०० हून अधिक वाहनधारकांना पोलिसांनी दणका दिला आहे. एकाच दिवसात तब्बल १३ लाख ७१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मोहिमेदरम्यान पोलिसांनी प्रामुख्याने विना नंबर प्लेट फिरणारी आणि फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या ४६३ वाहनांवर कारवाई करून ४ लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, जिल्ह्यात १०७ अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळली. त्यांच्या पालकांकडून…
ग्रा.पं.जवळच पाणीपुरवठ्याची पाईपलाईन दूषित ; प्रशासनाचे दुर्लक्ष साईमत/ जळगाव /प्रतिनिधी : शहरालगत तथा पुनर्वसित रायपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळच तुंबलेल्या गटारीतील घाण पाणी थेट पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनमध्ये जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. रायपूर हे शहरालगतचे पहिले गाव असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची पहिली भेट याच गावातून होते. मात्र, वार्ड क्र.१ मध्ये ग्रामपंचायत कार्यालयापासून अवघ्या १५० ते २०० फूट अंतरावरील गटारींची भीषण दुरवस्था झाली आहे. याठिकाणी घाण पाणी साचून राहते. तसेच मोकाट डुक्करे फिरताना दिसतात. याच ठिकाणी गटारीच्या घाण पाण्यातून घरगुती नळ कनेक्शन…
मलकापूर शहर पोलीस ठाण्यात मारहाण, जीवघेणा हल्ला, शस्त्रांचा वापर, दहशत निर्माण करणे तसेच सार्वजनिक शांततेचा भंग अशा गंभीर स्वरूपाचे एकूण आठ गुन्हे दाखल . साईमत/ मलकापूर /प्रतिनिधी : शहरात सातत्याने दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात आरोपी आरिफ खान उर्फ खेबड्या कौसर खान याच्यावर अखेर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. मलकापूर शहर पोलिसांनी सादर केलेल्या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असून आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आरिफ खान (वय २४, रा. माळीपुरा, मलकापूर) हा सन २०२३ पासून गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असून त्याच्याविरुद्ध मलकापूर शहर पोलीस ठाण्यात मारहाण, जीवघेणा हल्ला, शस्त्रांचा वापर, दहशत…
माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली वाहिली साईमत/ जामनेर /प्रतिनिधी : भारतरत्न तसेच माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात जामनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी नवनिर्वाचीत लोकनियुक्त नगराध्यक्षा साधना महाजन यांनी स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली वाहिली आणि त्यांना आदरांजली व्यक्त केली. अभिवादन समारंभात शहराध्यक्ष रवींद्र झाल्टे, तालुकाध्यक्ष मयुर पाटील, कमलाकर पाटील, माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बाविस्कर, दीपक तायडे, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, मुकुंदा सुरवाडे, आतिष झाल्टे, दत्तू जोहरे, श्रीराम महाजन, सुहास पाटील, प्रल्हाद सोनवणे, दीपक महाराज आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने…