Author: saimat

नवीन वर्षाची सुरुवात स्वच्छतेने होणार का? प्रश्न उपस्थित साईमत /यावल /प्रतिनिधी यावल पोलीस स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ साचलेला केरकचरा आणि तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या ये-जा मार्गावर एका चहावाल्याकडून सर्रासपणे टाकले जाणारे घाण पाणी, यामुळे यावल शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या परिस्थितीत नवीन वर्षाचा शुभारंभ चांगला व स्वच्छ होईल का? असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. यावल पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश करताना उजव्या बाजुला मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला असून, त्याच मार्गावरून तहसीलदार, पोलीस निरीक्षक, शाळकरी विद्यार्थी, ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणारे रुग्ण, भारतीय स्टेट बँक, सेंट्रल बँक, शनी मंदिर, तहसील कार्यालय तसेच पोलीस स्टेशनमध्ये कामानिमित्त ये-जा करणारे हजारो नागरिक दररोज…

Read More

छाननी प्रक्रियेला सुरुवात साईमत/जळगाव /प्रतिनिधी : जळगाव महानगरपालिकेच्या ७५ जागांसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेला बुधवार (३१ डिसेंबर) रोजी सकाळी १० वाजेपासून सुरुवात झाली आहे. छाननीच्या पहिल्याच दिवशी महापालिका परिसरात उमेदवार व समर्थकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ७५ जागांसाठी १०३८ उमेदवार महापालिकेच्या ७५ जागांसाठी तब्बल १०३८ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून, प्रत्येक जागेसाठी सरासरी १४ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ६ कक्षांत छाननी अर्जांची तांत्रिक व कायदेशीर तपासणी करण्यासाठी महापालिका आवारात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे ६ स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहेत. प्रत्येक अर्जाची बारकाईने छाननी केली जात आहे. हरकती, वकिलांची उपस्थिती छाननीदरम्यान…

Read More

संस्कृती महिला मंडळातर्फे महिला बचत गट व गृह उद्योगाला प्रोत्साहन साईमत /पारोळा/ प्रतिनिधी लाडशाखीय वाणी समाज मंडळ व संस्कृती महिला मंडळातर्फे महिला बचत गट व गृह उद्योगाला प्रोत्साहन मिळावे यासाठी एक दिवसीय ‘खाना खजाना’ आनंद मेळाव्याचे आयोजन वाणी मंगल कार्यालयात उत्साहात पार पडले. मेळाव्याचे उद्‌घाटन वाणी समाज मंडळाचे उपाध्यक्ष हेमकांत मुसळे व सीमा मुसळे यांच्याहस्ते करण्यात आले. मेळाव्यात महिला, युवतींनी उत्स्फुर्त सहभाग घेत विविध खाद्यपदार्थ, कलात्मक हस्तकौशल्याच्या वस्तू, सुती विणकामाच्या वस्तू ,मोत्यांच्या स्वतः तयार केलेल्या वस्तू, पुजेचे साहित्य, संक्रांतीसाठी वाणाच्या वस्तू तसेच गृहोपयोगी घर सजावटीचे साहित्य, असे अनेक प्रकारचे स्टॉल महिलांनी लावले होते. मेळाव्यात आलेल्या बंधु भगिनींनी खरेदीचा व खाण्याचा…

Read More

परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत आरोपीला जागीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. साईमत/जळगाव/प्रतिनिधी शहरातील गोलाणी मार्केट परिसरात १८ वर्षीय तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी ३१ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, परिसरातील नागरिकांनी तत्परता दाखवत आरोपीला जागीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. साई गणेश गोराडे (वय १८, रा. डीएनसी कॉलेजजवळ, जळगाव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास साई हा गोलाणी मार्केट परिसरात होता. यावेळी संशयित आरोपी शुभम सोनवणे (रा. कलिंका माता मंदिर परिसर) याने जुन्या किंवा अज्ञात कारणावरून साईशी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत…

Read More

२० हजारांचा मुद्देमाल जप्त, एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   शहरातील तांबापुरा भागातील मच्छीमार्केट परिसरात गांजाची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने घरात साठवणूक करणाऱ्या एका संशयिताला एमआयडीसी पोलिसांनी तांबापुरातून अटक केली आहे. कारवाईत पोलिसांनी सुमारे १९ हजार ३२० रुपये किमतीचा ३ किलो २२० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. दरम्यान, संशयित आरोपीवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कारवाईमुळे तांबापुरा परिसरातील अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना तांबापुरा परिसरात एक जण गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची गांभीर्याने दखल घेत त्यांनी त्वरित पथकाला कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके…

Read More

शैक्षणिक साहित्यासह प्रशस्तीपत्र देऊन १२०० विद्यार्थ्यांचा सन्मान साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला. ना.सार्व. विद्यालयात किशोर महोत्सवाचा समारोप बक्षीस वितरण कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात झाला. सुरुवातीस प्रमुख पाहुणे म्हणून हास्यजत्रा फेम हास्य कलाकार प्रा. हेमंत पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यासमितीचे प्रमुख प्रा. शरदचंद्र छापेकर, शाळेचे मुख्याध्यापक सचिन देशपांडे, ज्येष्ठ पर्यवेक्षक संजय वानखेडे, पर्यवेक्षिका रमा तारे, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख सुवर्णा वंजारी, उपप्रमुख स्मिता करे यांच्या हस्ते माता सरस्वती पूजन करण्यात आले. तसेच प्रमुख पाहुण्यांचा सत्कार प्रा. शरदचंद्र छापेकर यांच्या हस्ते भेटवस्तू, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ, शाल देऊन करण्यात आला. उपस्थित मान्यवरांचे स्वागत झाल्यानंतर किशोर महोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या…

Read More

लाडक्या मैत्रिणीचा मृतदेह पाहताच विद्यार्थिनींनी एकच आक्रोश केला साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   शहरातील शिरसोली रस्त्यावरील गुलाबराव देवकर महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थिनीचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला आहे. ही हृदयद्रावक घटना २८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. मयत विद्यार्थिनीचे महिमा चंदन वासनिक (वय-१९, मूळ रा. भंडारा) असे नाव आहे. तिच्या निधनाने शैक्षणिक वर्तुळात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिमा ही देवकर कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहून नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करत होती. २८ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता तिने नेहमीप्रमाणे कपडे धुतले आणि त्यानंतर तिला अचानक अस्वस्थ वाटू…

Read More

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कामांचे कौतूक साईमत/ अमळनेर /प्रतिनिधी :  तालुक्यातील दहिवद ग्रामपंचायतीअंतर्गत गाव विकास आराखड्यानुसार महात्मा गांधी रोजगार हमी योजना (बिहार पॅटर्न) अंतर्गत करण्यात आलेल्या वृक्षलागवडीची पाहणी नामवंत शास्त्रज्ञ व तज्ज्ञांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी त्यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतील कामांचे कौतूक केले. पुणे येथील किमया अग्रो कंपनी प्रा.लि. यांच्या जळगाव येथील कार्यालयाच्या उद्घाटनानिमित्त शास्त्रज्ञ डॉ.विजया पाटील (इंटरनॅशनल रिसर्च हेड-हिंदुस्तान लिव्हर कंपनी), किमया अॅग्रोचे मॅनेजिंग डायरेक्टर, सॉफ्टवेअर इंजिनिअर मिलिंद बारगजे यांनी इंजिनिअर संगीता दिनेश पाटील यांच्या सहकार्यातून दहिवद पंचक्रोशीस भेट दिली.यावेळी तिरखी मारोती मंदिर परिसरातील वृक्षलागवड पाहून महिला मजुरांनी पाहुण्यांचा सत्कार केला. त्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांची पाहणी करण्यात…

Read More

महेंद्र नगर परिसरातील नवयुवकांनी ग्रामपंचायतीकडे अर्जाव्दारे केली आहे. साईमत/पहूर,ता. जामनेर /प्रतिनिधी :   पहूर कसबे येथील प्रभाग क्रमांक ६, महेंद्र नगर परिसरात तरुण व नागरिकांच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी ओपन स्पेस उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी येथील नवयुवकांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सध्या पोलीस भरती, आर्मी भरती तसेच शासकीय नोकरीसाठी शारीरिक चाचण्यांची तयारी करणाऱ्या युवकांना नियमित व्यायामासाठी योग्य जागेचा अभाव आहे. महेंद्र नगर परिसरातील मोकळी जागा व्यायामासाठी अत्यंत उपयुक्त असून, त्या ठिकाणी ओपन स्पेस विकसित केल्यास युवकांना मोठा लाभ होणार आहे. व्यायामासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध झाल्यास युवकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल तसेच स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना…

Read More

मान्यवरांच्याहस्ते आचार्य कै.बापुसाहेब गजानन गरुड व बालविर जोरावर सिंह व फतेहसिंह यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले साईमत/पहूर,ता.जामनेर/प्रतिनिधी :  पाळधी (ता.जामनेर) येथील श्रीमती क.द.नाईक माध्यमिक विद्यालयात वीर बाल दिन सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर होते. प्रारंभी अध्यक्ष व मान्यवरांच्याहस्ते आचार्य कै.बापुसाहेब गजानन गरुड व बालविर जोरावर सिंह व फतेहसिंह यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास स्नेहदीप गरुड, शेंदुर्णी नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष गोविंद अग्रवाल, भाजपा पश्चिम तालुकाध्यक्ष कमलाकर पाटील, अमर पाटील, सरपंच प्रशांत बाविस्कर, हर्षल चौधरी, तुकाराम निकम, नाना पाटील, सुभाष पाटील, सुमनबाई माळी,…

Read More