Author: saimat

डॉ.सुभाष तलरेजा यांची जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली साईमत /मलकापूर /प्रतिनिधी सामाजिक कार्यातील अनुभव, सर्वधर्म समभाव राखण्याची वृत्ती, नि:स्वार्थ भावनेने कार्य करण्याची प्रामाणिकता लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे डॉ.सुभाष तलरेजा यांची जिल्हा संघटक म्हणून नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष ॲड.नाझेर काझी यांच्याहस्ते डॉ.तलरेजा यांना नियुक्ती पत्रक देण्यात आले असून, त्यांच्यावर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी आणि जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी काम करण्याची नैतिक जवाबदारी ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव यांनी प्रसाद जाधव व अरुण अग्रवाल यांच्या पुढाकाराने डॉ.तलरेजा यांचा पक्षात प्रवेश घडवून आणला.डॉ.तलरेजा यांनी सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात…

Read More

नागरिकांच्या मूलभूत गरजा प्राधान्याने पूर्ण करण्यावर भर साईमत/फैजपूर/प्रतिनिधी फैजपूर नगरपालिकेच्या नव्या नगराध्यक्ष दामिनी पवन सराफ यांनी १ जानेवारी रोजी पदभार स्वीकारला. सराफ गल्ली येथील निवासस्थानापासून सर्व नगरसेवक आणि नागरिकांच्या उपस्थितीत, टाळ-मृदुंगाच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीसह मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक पेहेड वाडा-खुशाल भाऊ रोड मार्गे नगरपालिकेपर्यंत गेली. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी पुष्पगुच्छ देऊन दामिनी सराफ यांचे स्वागत केले. सभागृहात नगराध्यक्ष, भाजपा गटनेते सिद्धेश्वर वाघुळदे, उपगटनेता सुरज गाजरे तसेच उपस्थित नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देऊन मुख्याधिकाऱ्यांनी स्वागत केले. सभागृहात मुख्याधिकारी अविनाश गांगोडे, नगराध्यक्ष दामिनी सराफ तसेच नगरसेवक…

Read More

जळगाव महापालिकेतील निवडणुकीत बिनविरोध निवडींची संख्या वाढली साईमत /जळगाव /प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेत महायुतीचा तिसरा, तर शिवसेना शिंदे गटाचा दुसरा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. प्रभाग क्रमांक ९ (ड) मधून शिवसेनेचे उमेदवार मनोज सुरेश चौधरी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. यापूर्वी प्रभाग क्रमांक १८ मधून डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली होती. या घडामोडींमुळे महापालिकेतील सत्तासमीकरणात शिवसेना शिंदे गटाने आपली ताकद दाखवून दिली आहे. जळगाव महापालिकेच्या १९ प्रभागांतील एकूण ७५ जागांसाठी दाखल झालेल्या १,०३८ उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये १३५ अर्ज विविध कारणांमुळे बाद ठरले असून ९०३ अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. छाननीदरम्यान तांत्रिक त्रुटी तसेच राजकीय…

Read More

 प्रभाग १८-अ मधून डॉ. गौरव सोनवणे बिनविरोध विजयी साईमत/जळगाव/ प्रतिनिधी : जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानंतर आता शिवसेना (शिंदे गट) यांनीही बिनविरोध विजयाचे खाते उघडले आहे. प्रभाग क्रमांक १८-अ मधून शिवसेनेचे उमेदवार डॉ. गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. डॉ. गौरव सोनवणे यांच्याविरोधात अपक्ष उमेदवार मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. छाननीअंती दोन्ही अर्ज वैध ठरले होते. मात्र गुरुवारी, १ जानेवारी रोजी नववर्षाच्या सुरुवातीलाच मयूर सोनवणे यांनी माघार घेतल्याने डॉ. गौरव सोनवणे यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला. डॉ. गौरव सोनवणे हे चोपड्याचे आमदार प्रा. डॉ. चंद्रकांत सोनवणे आणि माजी आमदार लताताई सोनवणे…

Read More

दहा लाखाच्या निधी मंजूर साईमत /पारोळा/ प्रतिनिधी तालुक्यातील वंजारी(महाराणा प्रताप नगर) येथे गेल्या सात वर्षापासून स्मशानभूमीची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण झाली आहे.स्मशानभूमी बांधकामासाठी शासनाच्या योजनेअंतर्गत व आमदार अमोल पाटील यांच्या अथक प्रयत्नांतून १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तालुक्यातील वंजारी खुर्द महाराणा प्रतापनगर येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्मशानभूमीची व्यवस्था नव्हती. दीर्घकाळापासून स्मशानभूमीच्या अभावामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते.येथील ग्रामस्थांनी या समस्येवर प्रशासनाचे वेळोवेळी लक्ष ही वेधले.यासाठी काही वेळा उपोषण‌,आंदोलन केले तर १५ ऑगस्ट रोजी ज्येष्ठ नागरिक बाळासाहेब पाटील यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. प्रशासनाने याकडे लक्ष वेधले.आमदार अमोल पाटील…

Read More

जिल्ह्यात एकूण १ लाख २२ हजार ६३ एकल महिला असल्याचे प्राथमिक सर्वेक्षणातून आले समोर साईमत/जळगाव /प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक व प्रशासकीय सक्षमीकरणाच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनामार्फत सर्वसमावेशक, वस्तुनिष्ठ व धोरणात्मक सर्वेक्षण राबविण्यात येत असून, या सर्वेक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय बैठक संपन्न झाली. या सर्वेक्षणामध्ये विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता, निराधार, दिव्यांग तसेच विविध कारणांनी एकट्या राहणाऱ्या महिलांची अचूक संख्या, त्यांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती, शासकीय योजनांचा लाभ, आवश्यक कागदपत्रांची उपलब्धता आदी बाबींची सविस्तर माहिती संकलित करण्यात येणार आहे. संकलित माहितीनुसार गरजाधारित व परिणामकारक उपाययोजना राबविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.…

Read More

एडवंटा कंपनीच्या वतीने पार पडला. साईमत/जामनेर /प्रतिनिधी  तालुक्यातील नाचनखेडा कार्यक्षेत्रातील भीलखेडा येथे पशुवैद्यकीय दवाखाना, श्रेणी २, दूध संस्था चालक व पशुपालकांसाठी “चारा लावा, पशुधन वाढवा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम एडवंटा कंपनीच्या वतीने पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रगतिशील शेतकरी श्री सुधाकर पाटील (भीलखेडा) आणि श्री प्रकाश पाटील (दोंदवाडे) यांच्या हस्ते गीरगायींचे गो पूजन करून करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विठुरायांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनही झाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा नाचनखेडा येथील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ.संदीप पाटील यांनी शेतकऱ्यांना चारा लागवड करून पशुधन वाढवण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी “चाऱ्याची लागवड करा व पशुधन वाढवा” या घोषवाक्यानुसार प्रशिक्षण दिले.…

Read More

भडगावमध्ये वाळू माफियांचा उन्माद ; जेसीबी, दोन डंपर, एक ट्रॅक्टरसह ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त साईमत/भडगाव/ प्रतिनिधी तालुक्यातील गिरड परिसरातील गिरणा नदीच्या पात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाई करताना वाळू माफियांनी थेट महसूल व पोलिस प्रशासनालाच लक्ष्य केले. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या कारवाईदरम्यान महसूल अधिकारी व पोलिसांना शिवीगाळ व धमक्या दिल्या गेल्या. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात रितेश पाटील उर्फ आबा (रा.पाचोरा) यांच्यासह २० ते २५ अज्ञात वाळू माफियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भडगाव तहसीलदार यांच्या आदेशानुसार गिरणा नदीपात्रात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल पथक तैनात करण्यात आले होते. दि.३० डिसेंबर रोजी रात्री १०.४२ वाजेच्या सुमारास गिरड-मांडकी…

Read More

बाजार समिती शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांच्या संरक्षणासाठी?; निलेश नारखेडे यांचा संतप्त सवाल साईमत/मलकापूर /प्रतिनिधी शेतकऱ्याची तूर बाजारात उतरते तेव्हा दर उतरतो; व्यापाऱ्यांचा नफा वाढतो आणि बाजार समिती प्रशासन मात्र गप्प बसते, हे नेमके कुणाच्या हिताचे राज्य आहे? असा संतप्त सवाल उपस्थित करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष निलेश नारखेडे यांनी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यपद्धतीवर जोरदार हल्लाबोल केला. तुरीच्या खरेदीत शेतकऱ्यांची उघड लूट सुरू असताना बाजार समिती प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. शासनाकडून जाहीर करण्यात आलेला हमीभाव प्रत्यक्षात केवळ कागदावरच राहिला असून, मलकापूर बाजार समितीत तूर व्यापाऱ्यांच्या मनमानी दराने खरेदी केली जात असल्याचे वास्तव त्यांनी अधोरेखित केले.…

Read More

माजी जिल्हा परिषद सदस्य स्व.निखिल खडसे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन साईमत/मुक्ताईनगर/ प्रतिनिधी  सहकार आणि समाजकारणाच्या पटलावर आपला वेगळा ठसा उमटवणारे, अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले तसेच ‘आदिशक्ती मुक्ताई’ सूतगिरणीचे माजी अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य स्व.निखिल खडसे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करण्यासाठी चांगदेव येथील मुक्ताई सहकारी सूतगिरणीत ‘अभिवादन सभा’ घेण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांनी स्व.निखिल खडसे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहून केली. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पाणावले. यावेळी बोलताना माजी सभापती निवृत्ती पाटील यांनी सांगितले, स्व. निखिल खडसे आज आपल्यात नसले, तरी त्यांच्या आठवणी आणि कार्य आपल्यासोबत चिरंतन आहे. परिसरातील युवक…

Read More